Pune City Challenges-2 : रस्ते लहान मतदारसंख्येपेक्षा वाहने अफाट !
एकेकाळी सायकलींचे शहर असलेल्या पुण्याची वाटचाल रस्ते लहान मतदारसंख्येपेक्षा वाहने अफाट अशी झाली आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा पुणेकरांनी विचार केलाय का ? महानगरपालिकेच्या तोंडावर या प्रश्नासंदर्भात सांगताहेत राजेंद्र कोंढरे
X
एकेकाळी सायकलींचे शहर असलेल्या पुण्याची वाटचाल
रस्ते लहान मतदारसंख्येपेक्षा वाहने अफाट अशी झाली आहे.
आपल्याकडे वाहन परवाना व मतदानाचा अधिकार 18 व्या वर्षी मिळत असल्याने मतदार संख्या व वाहन संख्या यांची तुलना केली आहे. पुण्यासारख्या शहरात वर्दळीच्या ठिकाणी चार चाकी सोडून द्या. पण दुचाकी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे. पुणेमध्ये दर 15 दिवसात 10 हजार वाहनांची नोंदणी सीरिज संपत आहे. रस्ते तेवढेच आहेत. रस्ता तर रुंदी होतच नाही. नवीन इमारती होताना रस्ता रुंदीचा FSI घेऊन इमारती बांधल्या गेल्या तरी त्यांनी जुन्या हद्दीवर अतिक्रमण करून ओटे बांधून व्यवसाय /Stall थाटले आहेत.
इमारतीच्या पार्किंगमध्ये वाहने लावायची सुविधा तोकडी आहे. सकाळी संध्याकाळी रहदारी वाहतूक कोंडीत आयुष्यातील दोन तास रोज पुणेकर अडकत आहेत. सिंहगड रस्ता उड्डाणपूल, चांदणी चौक उड्डाणपूल, मिसिंग लिंक काही सुधारणा झाल्या व होत आहेत.
तरीही वाढत्या लोकसंख्येने वाहनांच्या वाढत्या संख्येने होणाऱ्या प्रदुषणाचा विचार पुणेकरांनी केलाय का ? प्रभागांच्या पुरते पुणे सिमित नसून त्यापुढे संपूर्ण पुणे शहर नव्हे महानगर आहे याचा विचार व योग्य कृती अपेक्षित आहे.
राजेंद्र कोंढरे
अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष






