Home > मॅक्स ब्लॉग्ज > बदलत्या हवामानाच्या संकटात शेतीला कसे संरक्षण द्याल

बदलत्या हवामानाच्या संकटात शेतीला कसे संरक्षण द्याल

बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्याला बसतोय. गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हे सिद्ध केले आहे. पण आता या संकटाला तोंड देण्याची तयारी करण्याची गरज आहे. यासाठी कृषी क्षेत्रात काय बदल केले गेले पाहिजे, बदलत्या याचा आढावा घेणारा हा लेख...

बदलत्या हवामानाच्या संकटात शेतीला कसे संरक्षण द्याल
X

राज्यात गेल्या काही दिवसात अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले, गेल्यावर्षी कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनच्या संकटात शेतकऱ्यांच्या हातचा हंगाम गेला. यावर्षी तरी चांगले पीक येईल आणि मुला बाळांना आपण काही तरी चांगले देऊ शकू या आशेने शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नेला आहे. पण गेल्या काही वर्षांचा विचार केला तर हवामानातील बदल हे दरवर्षी दिसत आहेत. त्यामुळे आता शेती क्षेत्रात देखील या बदल्या हवामानामुसार बदल करण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यासाठी सरकारी आणि सामाजिक पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. एकीकडे शेतकऱ्यांना नवीन पीक पद्धतीबद्दल जागृत केले गेले पाहिजे तर सिंचनाच्या सोयी सरकारने निर्माण करुन त्याचा फायदा शेतीपर्यंत येईल याची खबरदारी घेतली पाहिजे.

साधारण २० वर्षांपूर्वी भारताचे हवामान वर्षभरात तीन ऋतुंमध्ये विभागलेले असायचे ते म्हणजे उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. साधारणत: ७ जूननंतर पावसाला सुरुवात व्हायची आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्वत्र पाऊस पडायचा. ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत थंडी, फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत कडक ऊन...असे ऋतुचक्र असल्याने आपण कामांचे नियोजन करत असू....परंतु अनियंत्रित लोकसंख्या वाढ, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अनियोजित वापर, भरमसाठ औद्योगीकरण, जंगलतोड, वाढते प्रदूषण यामुळे संपूर्ण ऋतुचक्र गडबडले आहे. या बदललेल्या ऋतुमानाचा परिणाम आपण विविध घटकांवर पाहतोय. त्यामुळे हवामान बदल, पर्यावरणीय समस्या आणि जागतिक तापमानवाढ हे आता चर्चासत्रे आणि परिसंवादांपुरते राहिलेले नाहीत, तर आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्यातील अनेक समस्यांमागील मूळ कारण ठरते आहे. त्याचाच परिणाम आपण पाहतोय कुटे दुष्काळाच्या तर कुठे गारपीटीच्चा आणि अवकाळी पावसाच्या रुपता....


जागतिक तापमान वाढ मोठा धोका

सध्या खूप जलदगतीने तापमानवाढ होते आहे. ही तापमानवाढ मानवनिर्मित जास्त आहे. त्यामुळे निसर्ग लहरी झाला आहे. जागतिक तापमान १.५ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोच्याने नैसर्गिक संकटांना सुरुवात झाली आहे. तापमान यापेक्षा जास्त झाले तर याचे भारताला गंभीर परिणाम भोगावे लागतील. म्हणजे उष्णतेच्या लाटेचे मोठे संकट भारतावर येईल', असा इशारा हवामान बदलाबाबत संशोधन करणाऱ्या Intergovernmental panel on climate change या संस्थेने कोरियामध्ये झालेल्या परिषदेत दिला आहे. बांगलादेशाच्या पूर्व किनारपट्टीजवळच्या गावात गर्भपातांचं प्रमाण वाढतं आहे, असे आढळले. याबद्दल अधिक अभ्यास केल्यावर याचं एक कारण पर्यावरणीय बदल आहेत, असे दिसले. हवामानाचा जमिनीवर होणारा परिणाम दिसून येतो पण मानवी शरीरावर होणारा परिणाम तुलनेनं चटकन दिसत नाही. गेली तीस वर्षं ICDDRB संस्थेतर्फे बांगलादेशात सातत्याने आरोग्य आणि लोकसंख्येची पाहणी केली जात आहे. ICDDRB संस्थेला दिसले की किनारपट्टीपासून दूरच्या भागात पाहणी केल्यावर जवळ ११ टक्के गर्भपात झाले. तर दुसरीकडे ८ टक्के गर्भपात झाले. हा परिणाम पिण्याच्या पाण्यातील मिठाच्या जास्त प्रमाणामुळं झाला..

पृथ्वीचे तापमान वाढते आहे आणि दुसरीकडे बर्फ वितळतो आहे. याबात तज्ज्ञ सांगतात की, एक मिलिबार हवेचा दाब कमी झाल्यास समुद्राची पातळी १० मिलिमीटरने वाढते. त्यामुळे हवेचा दाब कमी झाला तर समुद्राची पातळी वाढण्याची भीती आहे.

हवामान बदलाचा सगळ्याच मोठा परिणाम शेती क्षेत्रावर झाला आहे. आधीच शेतकऱ्यांची वाईट अवस्था आहे त्यातून प्रदुषणामुळे शेतीक्षेत्र अडचणीत आल्यास शेतकरी उध्वस्त होईल. यामुळे अन्नसुरक्षा धोक्यात आल्य़ास भारताला पुन्ह धान्य आयातीच्या दुष्टचक्रात अडकावे लागेल. त्यामुळे हवामान बदलनासर शेतीमध्ये उपाययोजना होणे आवश्यक आहे.


बदलत्या वातावरणानुसार शेतीत काय बदल झाले पाहिजेत?

कापसाचे पेरणी क्षेत्र कमी करून त्याऐवजी सोयाबीन, तूर, मका, मिरची या पिकांना प्राधान्य द्यावे. कापसाचा तयार होण्याचा कालावधी जवळपास सात महिन्यांचा आहे. पण कपाशीचे जवळपास सर्व क्षेत्र कोरडवाहू शेतीचे आहे. पण पाऊस ४ महिनेच असल्याने कपाशीची उत्पादकता प्रती हेक्टर कमी आहे. त्यामुळे उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशा चक्रात शेतकरी अडकला आहे.

शेतीमध्ये पेरणीच्या कोणत्या पद्धथी वापराव्या यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले पाहिजे. पावसाचे पाणी साठवून ठेवण्याकरीता वाफे तयार करणे, जमिनीच्या उताराप्रमाणे ते असतील याची खबरदारी घेणे, या गोष्टींबाबत शेतकऱ्यांना जागृत केले पाहिजे. बागायतदार शेतकऱ्यांनी गव्हाचे क्षेत्र कमी करून ज्वारीची पेरणी केल्या फायदो होऊ शकतो.

हवामानातील बदलामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी या दोनच महिन्यात चांगली थंडी पडते. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात थंडी न मिळाल्याने गव्हाची उत्पादकता कमी होते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात ज्वारीची पेरणी केली तर फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत ज्वारीचे पीक येऊ शकते. अवकाळी पाऊस झाला तरी फरक पडत नाही. यातून जनावारांसाठी चाराही मिळतो. त्याचबरोबर कमी पाण्यावर येणारे हरभरा पीक घेता येते. पाण्याची बचत करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये कमी पाण्यातून द्रवरूपातून खते पीक चांगले येऊ शकते. त्याचबरोबर ढोबळी मिरची, जरबेरा, गुलाब, टोमॅटो या पिकांच्या लागवडीवर भर दिल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. प्रत्येक शेतक-याने छोटेसे का होईना पण पॉलिहाऊसची निर्मिती करून ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि द्रवरूप खते दिले तसेच आंतरपीक पद्ध वापरली तर त्याचा फायदा होऊ शकतो.

त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेसाराख्या योजना राबवल्या गेल्या तर यामुळे मोठ्या प्रमाणात जलसिचंन होऊ शकते. त्यामुळ भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते. याचा फायदा अनेक भागातील पिण्याच्या पाण्याच्या आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटू शकतो. जागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंग आणि आर्थिक प्रगती यांच्यातील परस्पर संबंधांबाबत केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी विल्यम नोरढॉस आणि पॉल रोमर यांना २०१८ साली अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. जगाला भेडसावणाऱ्या किचकट आणि गंभीर प्रश्नांबाबत या दोघांचं काम मोलाचं आहे. शाश्वत विकासासंदर्भात या दोघांचं संशोधन उपयोगी ठरेल अशी आशा बाळगूया.

- डॉ. मुकेश कुलकर्णी

Updated : 22 March 2021 11:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top