बेसिकली आम्ही निर्लज्ज आणि कोडगे आहोत!
X
बलात्कार पीडित मुलगी आमच्या जातीची नाहीये ना ? मग तिचे जातवाले बघून घेतील हा आमचा कायम स्टॅण्ड असतोय. आम्ही एवढे निर्लज आणि कोडगे आहोत की, आरोपी आमच्या जातीचे किंवा समकक्ष असतील तर आम्ही ते असे अनाडी, मूर्ख, बालिश वगैरे आहेत. या बचावाची तयारी करतो.
आम्ही माणूस नेमके कधी होणार आहोत ?
जगाला उद्धारी वगैरे म्हणणारी एक मुलगी, महिला बलात्कार होऊन निर्घृणपणे खून करून हालहाल करून मारली जाते, बलात्कार सामूहिक असतो. तेव्हा एक स्त्री पीडित आहे. हे पुरेस नाहीये. आपलं रक्त पेटून उठायला?
की आपल्या रक्ताचे रंग बदललेत? वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळे रंग? तुम्ही शहरात आहात म्हणून असं काही होणार नाही या भ्रमात आहात? तुम्ही त्यांचे समर्थक आहात. या भ्रमात आहात की आपली जात श्रेष्ठ या भ्रमात आहात?
लांडग्यांच्या जातीला फक्त बाईची योनी आणि स्तन दिसतात बाकी काहीही नाही. हे ठाऊक नसेल तुम्हाला तरी हेच उघडनागड सत्य आहे.
वाट्टेल ते करा, रडा ,ओरडा, आक्रोश करा, लिहा,बोला, चित्र काढा, रस्त्यावर या, पण त्या लेकरासाठी आज ठाम उभे राहा. कारण हे लांडगे सोकावले तर उद्या तिच्या जागी कुणीही असेल, अगदी कुणीही !!