Home > मॅक्स ब्लॉग्ज > ठाकरेंच्या राज्यात मराठीचा खून

ठाकरेंच्या राज्यात मराठीचा खून

ठाकरेंच्या राज्यात मराठीचा खून
X

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या विधी व न्याय विभागात फक्त इंग्रजी भाषेतच काम चालतं. या विभागाचे कामकाज नियमानुसार होणं अपेक्षीत आहे. मात्र, असं होत नाही. मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणारी शिवसेना, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. म्हणून सातत्याने प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना देखील मराठी भाषेला महाराष्ट्रातच परक्यापणाची वागणूक मिळत आहे. हाच धागा पकडत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली आहे. तसंच लवकरात लवकर या संदर्भात पावलं उचलण्याची विनंती केली आहे.

ते म्हणतात...

महाराष्ट्रात विधी व न्याय विभाग जो मा. मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यकक्षेत आहे. तेथे संपूर्ण कामकाज फक्त आणि फक्त इंग्रजी भाषेत होते. महाराष्ट्र शासनाचा १९६७ चा मराठी राजभाषा अधिनियमानुसार सर्व कामकाज मराठीतून होणे अपेक्षित आहे. कारण विधी विभागातील इंग्रजीचे महत्त्व आणि पदे कदाचित कमी होतील असा अमराठी नोकरशाही लॉबीचा होरा आहे. शिवाय त्यांना मराठीचे महत्त्वही वाढलेले नको आहे. त्यामुळेच आता आपल्याला शासकिय आदेश/जीआर/ पत्रके सर्व इंग्रजीत दिसू लागलेली आहेत. हे एक षडयंत्र आहे.

तरी यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जातीने लक्ष घालून प्रत्येक शासकिय परिपत्रक,पत्रक, कागद प्रथम मराठीत प्रसिद्ध होईल हे पहावे ही विनंती.

"पाहुणे असंख्य जरी पोसते मराठी

आपुल्याच घरी हाल सोसते मराठी"

असे उद्धवजींनी होऊ देऊ नये.

असं परुळेकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.Updated : 6 Sep 2022 7:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top