Home > मॅक्स ब्लॉग्ज > Oxford University Press apology : जिजाऊ-शिवरायांबद्दलच्या आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी सैयद मंझर खान, डॉ. श्रीकांत बहुळेकर, सुचेता परांजपे आणि व्ही. एल. मंजूळ यांचा माफीनामा

Oxford University Press apology : जिजाऊ-शिवरायांबद्दलच्या आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी सैयद मंझर खान, डॉ. श्रीकांत बहुळेकर, सुचेता परांजपे आणि व्ही. एल. मंजूळ यांचा माफीनामा

Oxford University Press apology : जिजाऊ-शिवरायांबद्दलच्या आक्षेपार्ह मजकूरप्रकरणी सैयद मंझर खान, डॉ. श्रीकांत बहुळेकर, सुचेता परांजपे आणि व्ही. एल. मंजूळ यांचा माफीनामा
X

Oxford University Press apology अखेर माफी मागितली... छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल आक्षेपार्ह, अवमानकारक मजकूराबाबत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने दोन दशकानंतर माफी मागितली आहे. २००३ साली प्रकाशित अमेरिकन इतिहास अभ्यासक जेम्स लेन James Laine book controversy लिखित 'शिवाजी: द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' Shivaji: Hindu King in Islamic India या पुस्तकात Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराज आणि Rajmata Jijabai राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा मलिन करणारा मजकूर होता.




या पुस्तकामुळे Maharashtra महाराष्ट्रात मोठे वादळ उठले होते. विशेषतः पुण्यात Pune हिंसक पडसादही उमटले होते. एवढ्या वर्षांनंतर या पुस्तकाचे प्रकाशक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने जाहीर नोटीस प्रसिद्ध करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांची माफी मागितली आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सैयद मंझर खान, डॉ. श्रीकांत बहुळेकर, सुचेता परांजपे आणि व्ही. एल. मंजूळ यांनी देखील माफी मागितली आहे.




दरम्यान, Udayanraje Bhosale reacts to Oxford University Press apology याप्रकरणी उदयनराजे भोसले यांनी एक्स वर एक पोस्ट केली आहे ते म्हणतात..

जेम्स लेन प्रकरणी चौघांचे माफीनामे उच्च न्यायालयात सादर….

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाने २००३ साली जेम्स लेन यांनी लिहिलेली "शिवाजी: द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" हे पुस्तक प्रकाशित केले होते व या पुस्तकातील काही परिच्छेद व उतारे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा मलिन करणारे आणि अपमानास्पद होते. या विरोधात सातारा येथील माननीय मुख्य न्यायाधीश दंडाधिकारी समोर फौजदारी केस क्र. ३२३०/२००४ ही खासगी तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये "शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" हे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल आरोपींविरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा अपमान केल्याचा आरोप होता.

या प्रकरणी माननीय मुख्य न्यायाधीश दंडाधिकारी, सातारा यांनी तक्रार व पुस्तकातील संपूर्ण मजकूर विचारात घेऊन दिनांक २/०४/२००५ रोजी सर्व आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० अंतर्गत प्रक्रिया जारी करण्याचा आदेश दिला. हा आदेश जारी झाल्यानंतर आरोपी- · सैयद मंझर खान, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियाचे संपादक, · डॉ. श्रीकांत बहुळेकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत विषयाचे प्राध्यापक, · सुश्री सुचेता परांजपे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे प्राध्यापिका, · श्री. व्ही. एल. मंजूळ, भांडारकर संस्थेचे ग्रंथपाल. या आरोपीनी माननीय उच्च न्यायालयात दंडविषयक रिट याचिका दाखल केली होती. या आरोपीनी दाखल केलेल्या रिट याचिका आणि दंडविषयक अर्ज न्यायालयासमोर प्रलंबित होत्या. वरील रिट याचिका दिनांक १७/१२/२०२५ रोजी माननीय बॉम्बे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट पीठासमोर, माननीय न्यायमूर्ती श्री. शिवकुमार सी. दिगे यांच्या समोर यादीत होत्या. दिनांक १७/१२/२०२५ रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्ते/अर्जदार/आरोपी व्यक्तींच्या वकिलांनी न्यायालयात आपले म्हणणे सादर केले की ते तक्रारदार-श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची माफी मागण्यास तयार आहेत आणि अधिक सादर केले की माफीपत्र राष्ट्रीय स्तरावर विस्तृत प्रसारण असलेल्या मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केले जाईल. सदर माफीपत्राचा मजकूर पुढीलप्रमाणे आहे:

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने २००३ साली जेम्स विल्यम लेन यांनी लिहिलेले पुस्तक प्रकाशित केले होते. मी या गोष्टीची जाणीव आहे की, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे लाखो लोकांच्या हृदयात एक सन्मानाचे आणि अगाध स्थान आहे. मी त्यांच्या वारशाशी निगडित तीव्र सार्वजनिक भावनांचा सखोल आदर करतो आणि सामान्य जनतेला झालेल्या कोणत्याही दुःखाबद्दल आम्ही मनापासून खेद व्यक्त करतो. तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना झालेल्या कोणत्याही त्रासाबद्दल किंवा वेदनेबद्दल मी माझी बिनशर्त माफी मागतो. प्रतिवादी क्र. १/तक्रारदार-श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे प्रतिनिधित्व ॲड. शैलेष धनंजय चव्हाण, ॲड. रणजित पाटील, सुजित निकम आणि धवलसिंह पाटील यांनी केले होते व योग्य आदेश पारित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, दिनांक १७/१२/२०२५ रोजी, माननीय उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. एस. सी. दिगे यांनी याचिकाकर्त्यांना/अर्जदारांना १५ दिवसांच्या आत राष्ट्रीय स्तरावर विस्तृत प्रसारण असलेल्या वृत्तपत्रांमध्ये माफी प्रकाशित करण्याचे आदेश दिले.

Updated : 8 Jan 2026 3:57 PM IST
Next Story
Share it
Top