Home > मॅक्स ब्लॉग्ज > सत्याची ताकद फार मोठी असते: तुषार गायकवाड

सत्याची ताकद फार मोठी असते: तुषार गायकवाड

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जागतिक पातळीवर साद घालत असताना ऑल्ट न्यूज चा सह संस्थापक मोहम्मद झुबेर अटक करण्यात आली आहे. अभिव्यक्तीला रोखणाऱ्या या षडयंत्रावर भाष्य केले आहे लेखक तुषार गायकवाड यांनी..

सत्याची ताकद फार मोठी असते: तुषार गायकवाड
X

९ फेब्रुवारी २०१७ रोजी भारतात सोशल मेडीयावर, टिव्ही न्यूज चॅनेल्सवर सर्रास सुरु असलेल्या फेक न्यूज चा फॅक्ट चेक करण्यासाठी साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रतिक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर या जबाबदार व सुजाण नागरिकांनी 'ऑल्ट न्यूज' या भारतीय नॉन-प्रॉफिट फॅक्ट चेकिंग वेबसाइटची स्थापना केली.

अतिशय निस्पक्षपणे या वेबसाइटने दोन्ही गटांकडील फेक न्यूज चे फॅक्ट चेक आजवर केले. प्रत्येक राजकीय पक्षाच्या आयटी सेलने पसरवलेल्या फेक न्यूजचे पोस्टमार्टेम ऑल्ट न्यूज हिंदी व इंग्रजी भाषेच्या माध्यमातून करत आहेत.

काल मोहम्मद झुबेरला दिल्ली पोलिसांनी अटक केली. कारण काय तर म्हणे २०१८ मध्ये त्याने केलेल्या ट्विट वरुन कारवाई केली आहे. आयपीसी कलम १५३-अ आणि आयपीसी कलम २८५-अ नुसार कारवाई केली. अशी माहिती आजच्या इंग्रजी वृत्तपत्रात वाचली. मुळात हि कलमे काय आहेत ते समजून घेऊया.

१) आयपीसी कलम १५३-अ : धर्म, वंश, जन्मस्थान, निवास, भाषा इत्यादी कारणांवरुन निरनिराळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि एकोपा टिकण्यास बाधक अशा कृती करणे. दखलपात्र व अजामीनपात्र.

२) आयपीसी कलम २९५-अ : कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासनास्थानाचे नुकसान करणे अगर अपवित्र करणे, किंवा अपवित्र ठरविण्यासाठी वक्तव्य करणे. हे कलम देखील दखलपात्र व अजामीनपात्र आहे.

आता खरे कारण काय? ते सांगतो.

बेपत्ता असलेली भाजपची हकालपट्टी केलेली प्रवक्ता आरोपी नुपूर शर्मा हिने नाविका कुमारच्या शोमध्ये मुस्लीम धर्माच्या पैगंबराविषयी अवमानकारक वक्तव्य केले. तीचे वक्तव्य चुकीचे असल्याचे व फॅक्ट काय आहे? ते स्पष्ट करणारे ट्विट मोहम्मद झुबेरने केले.

झुबेरच्या ट्विट मुळे तोंडावर पडलेल्या ट्विटरवरच्या आयटी सेल व भक्तांनी मोहम्मद झुबेरला ट्रोल करायला सुरुवात केली. साहजिकच मोहम्मदच्या ट्विटला आपसूकच प्रसिद्धी मिळाली. भक्तांनी त्याच्याविरुद्ध हॅशटॅग चालवले. या मोहिमेत अरब राष्ट्रांमध्ये उदर भरणासाठी गेलेल्या अनिवासी नवहिंदुत्ववादी भक्तांनी सहभाग नोंदवला.

त्यामुळे या प्रकरणाची दखल टाईम्स नाऊ नवभारत या न्यूज चॅनेलवरील मुख्य संपादक असलेल्या नाविका कुमार यांच्या शोमध्ये आरोपी नुपूर शर्माने वक्तव्य केल्यानंतर सुमारे ४-५ दिवसांनी अरब राष्ट्रांनी घेतली. त्यानंतर अरब राष्ट्रांमध्ये पडसाद उमटले. अरब राष्ट्रांमध्ये भारतीय उत्पादनांवर बंदी घालण्यासाठी सोशल मेडीयावर मोहिम सुरु झाली.

अरब राष्ट्रांनी भारतीय राजदुतांना फैलावर घेतले. भारत सरकारने अरब राष्ट्रांना माफिनामा सादर केला. व सदर प्रकरणी वक्तव्य करणारे नुपूर शर्मा, नविन कुमार जिंदाल यांच्यावर कारवाई करुन त्यांना अधिकृत 'Fringe Element' घोषित केले.

सरकारच्या या धोरणाचा कडाडून विरोध आयटी सेल व नवहिंदुत्ववादी गटाने ट्विटरवर केला. देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध ट्विटरवर समर्थकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोध करुन इज्जतीचा नाविका करण्याची हि गेल्या आठ वर्षांतील पहिलीच वेळ.

साहजिकच ईगो दुखावलेल्या जयकांत शिक्रेंनी मोहम्मद झुबेरला टार्गेट केलेय. प्रत्यक्षात दोषी नाविका कुमार, नुपूर शर्मा आणि आयटी सेल आहे. पण हे लोक्स सत्य बोलणाऱ्या मोहम्मद झुबेरला घाबरले.

सत्याची ताकद फार मोठी असते. तीच ताकद मोहम्मद झुबेरकडे आहे. त्यामुळे त्याला घाबरलेत. दुर्दैवाने आम्ही एक आहोत म्हणणारे भारतीय मुस्लीम अग्निवीर योजनेच्या समर्थनार्थ रस्त्यावर उरले. पण मोहम्मद झुबेरसाठी चकार शब्द काढायला तयार नाहीत.

मित्रा मोहम्मद तु घाबरणार नाहीयेचस. आणि माझ्यासारखे असंख्य हिंदू तुझ्यासोबत आहेत. हि लढाई आता कोणत्याही पक्षाची नसून सत्य विरुद्ध असत्याची आहे. कसलीही किंमत चुकवावी लागली तरी बेहत्तर आपण सत्याचा मार्ग सोडायचा नाही!!

शहिद अशफाक उल्ला खान यांना वंदन.

Updated : 2022-06-28T19:32:59+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top