Third Municipal Corporation : पुण्यात तिसरी महापालिका आवश्यक आहे की नाही?
राज्यात महापालिका निवडणुकांसाठी आज मतदाना होत असताना पुण्याला तिसऱ्या महापालिकेची गरज आहे की नाही ? यावर ब्लॉगर राजेंद्र कोंढरे यांचं विश्लेषण
X
PMC, PCMC महापालिका दोन कि तीन निर्णय लवकर व्हावा. निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा!!!
एखादा नवीन जिल्हा निर्मिती करताना नवीन प्रशासकीय रचनेपासून ते सर्व विभागाच्या शासकीय इमारती उभ्या कराव्या लागतात. त्याचप्रमाणे पुण्यात आता तिसऱ्या महापालिकेची चर्चा सुरु आहे. मी या क्षेत्रातील तज्ञ् नाही पण एक मत मांडले आहे. यापूर्वी दापोडी हे गाव पुणे महापालिकेत होते ते नंतर पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट केले ते करताना तेथील पुणे महापालिकेच्या निर्वाचित नगरसेविका यांना पिंपरी महापालिकेचे सभासदत्व दिले होते.
आपल्याकडे फुरसुंगी साठी नवीन नगरपरिषद उभी केली आहे. परंतु प्रत्यक्षात सर्व यंत्रणा नव्याने उभी करणे नव्याने सर्व प्रशासकीय रचना कार्यलये विकास आराखडा हे लहान नगर पालिकेला लगेच उभे करणे शक्य नसते. पुणे महापालिकेचे भौगोलिक क्षेत्र ४८४ चौ.कि.मी. नगरसेवक १६१ व पिंपरी चिंचवड महापालिकेचे १८१ चौ.कि.मी. आहे नगरसेवक १२८ आहे.
तिसरी महापालिका अस्तित्वात आणताना संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा नव्याने उभी करावी लागणार आहे. पुणे शहराचा नदीच्या पलीकडील वाघोली पर्यंतचा भाग, बालेवाडी, बाणेर हा भाग पिंपरी चिंचवड महापालिकेला जोडला गेला तर तिसरी महापालिका अस्तित्वात आणण्याची लगेच आवश्यकता नाही. यावर चर्चा झाली पाहिजे.
क्रेडाईचे माजी अध्यक्ष व मगरपट्टा सिटीचे निर्माते सतीशदादा मगर यांनी देखील हीच सूचना मांडली आहे. सध्याच्या पुणे कॅंटोन्मेंट च्या पलीकडचा पूर्व बाजूचा भाग म्हणजे हडपसर महापालिका करण्याची देखील चर्चा आहे. पुढच्या टप्प्यात पुणे कॅन्टोन्मेंट व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत समावेश करण्याच्या हालचाली सुरु आहेत.याशिवाय PMC, PCMC च्या हद्दी बाहेर PMRDA ची हद्द आहे. त्यानंतर रिंगरोडच्या बाजूने MSRDC हे नियोजन प्राधिकरण आहे. एका मोठ्या अफाट महानगराच्या मध्ये 2 महापालिका 3 कॅन्टोन्मेंट बोर्ड 2 नियोजन प्राधिकरण, जिल्हा परिषद एवढा महाप्रचंड व्याप आहे.
दोन्ही महापालिकेच्या निवडणुकीत “एकच ध्यास प्रभागाचा विकास” एवढा लहान विषय राहिलेला नाही. शहर नियोजनातील आणि प्रशासकीय रचनेतील तज्ज्ञांनी लोकप्रतिनिधींनी यावर लवकर निर्णय घेतला पाहिजे. एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाची लोकसंख्या असलेली महापालिका चालवणे एक जिकिरीचे काम आहे.
Third Municipal Corporation, PMC-PCMC Merger, Urban Development, Civic Infrastructure, Local Governance, Cantonment Boards, Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA)






