“जन गण मन हेच राष्ट्रगीत, वंदे मातरम् हेच राष्ट्रगान”
X
वंदे मातरम् : हे माते मी तुला प्रणाम करतो. पाण्याने परिपूर्ण, फळांनी बहरलेली, दक्षिणेच्या वायू लहरींनी शामल (शांत) भासणारी, बहरलेल्या पिकांनी समृद्ध अश्या माझ्या मातेला मी प्रणाम करतो.
शुभ्र चांदण्यांमुळे बहरलेल्या इथल्या रात्री आल्हाददायक असतात. फुलांच्या राजींनी, वृक्षांनी मढवलेली इथली जमीन शोभून दिसते. पाण्याची अवीट गोडी, मधुर बोली, सुख समृद्धी देणारी हे माता, माझा तुला प्रणाम !
संस्कृत भाषेतील या गीताचा प्रदेश गंगाखोर्याचा आहे. हे गीत प्रामुख्याने बंगालचं म्हणजे आजचं पश्चिम बंगाल हे राज्य आणि बांग्लादेश यांचं आहे. १९०५ साली बंगालची फाळणी करण्यात आली त्याच्या निषेधात जे आंदोलन उभं राह्यलं त्यावेळी रविंद्रनाथ टागोरांनी हे गीत एका जाहीर सभेत गायलं होतं. त्यानंतर हे गीत आणि वंदे मातरम् ही घोषणा लोकप्रिय झाली.
(राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा हे गीत महाराष्ट्राचं आहे.)
जनगणमन अधिनायक जय हे, भारतभाग्यविधाता.
(तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो!)
पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग.
(पंजाब , सिंध , गुजरात , महाराष्ट्र , द्राविड म्हणजे दक्षिण भाग , उत्कल म्हणजे आताचा ओडिशा , बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो.)
विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधी तरंग.
(गंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात.)
या गीतामध्ये भारतातील प्रमुख भाषिक संस्कृतींचा गौरव केला आहे. त्यामध्ये हिंदी भाषिक प्रदेशांचा उल्लेख नाही. कारण हे गीत लिहिलं त्यावेळी हिंदी कुणाचीही मातृभाषा नव्हती. खडी बोली, अवधी, बाघेली, छत्तीसगढी, हरयाणवी, ब्रज, बुंदेली, कनौजी, मैथिली, भोजपुरी, मगही, मारवाडी, जयपुरी, मालवी अशा अनेक भाषा होत्या. प्राचीन साहित्य याच भाषांमध्ये आहे. आजच्या हिंदीमध्ये नाही. मात्र गंगा, यमुना, विंध्य, हिमाचल या प्रदेशांची नोंद राष्ट्रगीतामध्ये आहे.
म्हणून जन गण मन हेच राष्ट्रगीत आहे. वंदे मातरम् हे राष्ट्रगान आहे कारण हे गीत स्वातंत्र्य आंदोलनाचं होतं. या गीताचा जप करत हजारो लोक तुरुंगात गेले, शेकडो फाशी गेले. या दोन्ही गीतांचा संबंध राष्ट्रीय आंदोलनाशी आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राष्ट्रीय आंदोलनाशी आणि या दोन्ही गीतांशी काहीही संबंध नव्हता, आजही नाही.
सुनील तांबे
लेखक
(साभार- सदर पोस्ट सुनील तांबे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे)






