Ultra Processed Foodsमुळे भारतात सर्व आजारांचे प्रमाण वेगाने वाढतेय !
Lancet Report जगभरातील ४३ संशोधकांनी बनवला UPF उद्योगावरचा अहवाल, भारतात का वाढतायेत सर्व विकारांचे आजार? उद्योग इंडस्ट्री सर्वसामान्यांच्या जीवावर का उठली ? वाचा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचा लेख
X
जन हो, नवउदारमतवादाने ठरवून brainwashed ब्रेनवॉश केलेल्या डाव्या उजव्या बायनरी मधून बाहेर येऊया. कारण तुम्ही Corporate Influence कॉर्पोरेट क्षेत्राचे कट्टर पाठीराखे असलात तरी तुम्हाला हे कॉर्पोरेट क्षेत्र या प्रणालीच्या दुष्परिणामापासून कोणतेही कन्सेशन मिळवून देऊ शकणार नाहीये. तंबाखू, दारू Tobacco and Alcoholयांच्या जोडीला आता अती प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे ( Ultra Processed Foods- UPF ) नाव घेण्याची वेळ आली आहे.
यात स्नॅक्स, मिठाई, शीतपेये अशा अनेक वैविध्यपूर्ण पदार्थांचा समावेश होतो. तंबाखू, दारू यांना “पाप” वस्तू (Sin Goods) किंवा समाज विघातक वस्तू म्हणतात. त्यांना तसे का म्हणतात हे सर्वांना माहीत आहे. पण UPF पदार्थ देखील असेच पाप करत आहेत हे सत्य अजून समाजापर्यंत पोहोचलेले नाही, पोचलेले असेल तर रुजलेले नाही असे दिसते. Food Industry Regulation
लॅन्सेट (Lancet) हे दोनशे वर्षे जुने नियतकालिक आहे. त्याचा जगभरच्या वैद्यकीय संशोधन क्षेत्रात दबदबा आहे. त्यांनी जगभरातील ४३ संशोधकांनी बनवलेला UPF उद्योगावरचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. India भारतासकट, जगातील अनेक देशात या पदार्थांचे सेवन वेगाने वाढत आहे. हे पदार्थ तयार झाल्यानंतर त्यांचे प्रत्यक्ष सेवन होण्यापर्यंतचा काळ बराच असतो. नेहमीच. साहजिकच त्याचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी त्यात काही preservatives घातले जातात.
त्याशिवाय त्यांना चवदार आणि स्वादपूर्ण बनवण्यासाठी, आकर्षक दिसण्यासाठी त्यात मीठ, साखर, चरबी सढळ हस्ते वापरली जाते. चटक किंवा व्यसन लागण्याची मुळे यामध्ये आहेत. त्यातून अशा पदार्थांचे अतिरिक्त सेवन होते. जे मानवी शरीराला घातक सिद्ध होते. त्यातून रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, पचनसंस्थेचे विकार, लठ्ठपणा blood pressure, heart disease, diabetes, digestive system disorders, obesity वाढतो. शालेय वयात या पदार्थांची चटक लागणे नैसर्गिक आहे. त्यामुळे लहान मुलांमधील लठ्ठपणा पूर्वी कधीही नव्हता एवढा वाढला आहे. UPF चे सेवन व वरील विकार, आजार यांचा परस्परसंबंध संशोधनाअंती प्रस्थापित झाला आहे.
अहवालाने भारतीय आकडेवारी दिली आहे. त्यानुसार भारतात वरील सर्व विकार आजारांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्याचे महत्वाचे कारण या पदार्थांची विक्री वेगाने वाढत आहे हे आहे. २००६ मध्ये भारतात UPF पदार्थांची विक्री ८०० कोटी रुपये होती ती २०१९ मध्ये चाळीस पटींनी वाढून ३,२०,००० कोटी रुपये झाली. २०२५ मध्ये किती असेल ? यातून त्याचा वेग लक्षात येईल. UPF पदार्थांची वेगाने विक्री वाढण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे या क्षेत्रात उतरलेल्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या. या उद्योगात प्रचंड प्रॉफिट मार्जिन्स आहेत. याच कंपन्या या पदार्थांच्या आक्रमक आणि आकर्षक जाहिराती करतात. म्हणून या पदार्थांच्या व्यसनाला जाहिरातीमुळे लागलेले व्यसन (advertisement addiction) असे म्हटले जाते.
भारतीय शासन Food Safety and Standard Authority of India मार्फत या उद्योगाचे कागदोपत्री नियमन करते असे म्हटले जाते. पण त्यांचा सारा भर फक्त disclosure norms वर असतो. पदार्थाबद्दल माहिती लेबल किंवा पॅकिंग वर छापा…बास्स एवढेच. हे म्हणजे पसरणाऱ्या रोगावर चकचकीत बँड अॅड लावण्यासारखे आहे. विशेषतः भारतासारख्या निरक्षर, फारशा सक्रिय ग्राहक संघटना नसणाऱ्या देशात. तयार खाद्य पदार्थ उद्योगातून मोठी कॉर्पोरेट, ग्लोबल कॅपिटल, आणि मुख्य म्हणजे लिस्टेड कंपन्या बाहेर ठेवल्या पाहिजेत. नागरिकांचे हित, पर्यावरण यांचा बळी गेला तरी चालेल आपल्या प्रॉफिट मर्जिन्स, शेयर प्राईस वाढत्या राहिल्या पाहिजेत हे यांचे तत्त्वज्ञान आहे. त्यांना बाहेर ठेवले तर विकेंद्रित पद्धतीने महिला केंद्री काही दशलक्ष रोजगार निर्मिती होऊ शकेल.
या मांडणीचा डाव्या उजव्याशी काहीही संबंध नाही. या आयडियोलॉजी मध्ये सुसायडल टेंडेन्सी आहेत. ती मरेल पण सर्वांना घेऊन मरेल. मी जिवंत नसेन. पण हे होणार आहे हे नक्की. सामान्य लोकच ती राजकीय मागणी नजिकच्या काळात करणार आहेत. कारण आपल्या नातवंडांना, पतवंडांनावर त्यांचे जिवापाड प्रेम आहे. मानवी उपजत शहाणपण या सगळ्यावर मात करेल याबदल मला विश्वास आहे..
संजीव चांदोरकर
अर्थतज्ज्ञ






