Home > मॅक्स ब्लॉग्ज > चक्रवर्ती सम्राट अशोक

चक्रवर्ती सम्राट अशोक

जागतिक इतिहासकारांनी चक्रवर्ती सम्राट अशोकास जगातील सर्वश्रेष्ठ अशा सहा राजा पैकी एक राजा म्हणून मान्यता दिली आहे. अशोकाची तुलना जगश्रेष्ठ अलेक्झांडर, ज्युलियस सीझर या सारख्या जगदविख्यात राजां सोबत केली जाते.पण जनकल्यानाचा ध्यास घेतलेला व त्यासाठी जीवन समर्पित करणारा अशोक हा निर्विवाद पणे जगश्रेष्ठ राजा होता. अशोक हंडोरे यांनी सम्राट अशोकाच्या कार्याचा घेतलेला आढावा नक्की वाचा...

चक्रवर्ती सम्राट अशोक
X

The great Ashoka | MaxMaharashtra, Marathi News 

जागतिक इतिहासकारांनी चक्रवर्ती सम्राट अशोकास जगातील सर्वश्रेष्ठ अशा सहा राजा पैकी एक राजा म्हणून मान्यता दिली आहे. अशोकाची तुलना जगश्रेष्ठ अलेक्झांडर, ज्युलियस सीझर या सारख्या जगदविख्यात राजां सोबत केली जाते.पण जनकल्यानाचा ध्यास घेतलेला व त्यासाठी जीवन समर्पित करणारा अशोक हा निर्विवाद पणे जगश्रेष्ठ राजा होता. अशोक हंडोरे यांनी सम्राट अशोकाच्या कार्याचा घेतलेला आढावा नक्की वाचा...

जागतिक इतिहासकारांनी चक्रवर्ती सम्राट अशोकास जगातील सर्वश्रेष्ठ अशा सहा राजा पैकी एक राजा म्हणून मान्यता दिली आहे. अशोकाची तुलना जगश्रेष्ठ अलेक्झांडर, ज्युलियस सीझर या सारख्या जगदविख्यात राजां सोबत केली जाते.पण जनकल्यानाचा ध्यास घेतलेला व त्यासाठी जीवन समर्पित करणारा अशोक हा निर्विवाद पणे जगश्रेष्ठ राजा होता असे ठामपणे म्हणता येते.

सम्राट हे नामाभिमान अशोकाच्या नावासमोर लागले असले तरी अशोक खऱ्या अर्थाने चक्रवर्ती सम्राट होते. चक्रवर्ती या नामाभिमानात पराक्रम, शौर्य या सोबतच प्रजेचा सर्वांगीन विकास, साम्राज्याचा विकास, स्थैर्य, प्रजेचा विश्वास, आर्थिक भरभराट या सर्वांचा समावेश होतो म्हणूनच या नामाभिमानाला अशोक खऱ्या अर्थाने पात्र ठरतो.

अशोक कालीन अर्थ व्यवस्था:

प्राचीन काळातील इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातील अर्थव्यवस्थे मधील अशोक कालीन अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्था होती. आजच्या जी.डी. पी. च्या भाषेत ३० ते ३५ टक्के जी.डी.पी. अशोकाच्या काळात होता. म्हणजे जगातील एक तृतींश संपत्ती अशोकाच्या जंबुद्विपाची होती . अशोक काळात समाजातील सर्वात मोठा वर्ग हा शेतकरी वर्ग होता. सर्व शेती ही राजाची मालकिची असे. शेतकऱ्याला ती कसायला दिली जात असे. त्या काळात जंगल तोड मोठ्या प्रमाणात करून शेते निर्माण करून शेतकऱ्याना कसायला दिली जात असत. त्यावर वेगवेगळ्या पध्दतिचे कर आकारले असे होते. नदी किणाऱ्या नजीकच्या सुपिक जमिनीवर पिकाच्या एक चतुर्थांश (१/४)कर आकारला जात असे. सर्वसाधारण शेतीवर एक षष्टमांस कर आकारला जात असे तर खडकाळ जमिनीवर एक अष्ठमांस कर आकारला जाई. जा वर्षी दुष्काळ पडत असे तेव्हा शेतकऱ्यांचा कर माफ केला जात असे.

विशेष म्हणजे शेतीसाठी कालव्यांचे जाळे निर्माण करण्यात आले होते त्यामुळे पिकांना मुबलक पाणी मिळत असे.वर्षातून दोन पिके काढली जात असे. शेतकर्यांना मोफत दर्जेदार बी बियाणे सुगीच्या हंगामात दिली जात असत. त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग अत्यंत आनंदी असे व पिकही भरपुर घेत असे त्यामुळे राज्य कोषात कररूपाने भरपुर धनधान्य जमा होत असे. शेतकऱ्या सोबतच कारागीर व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात साम्राज्यात होता. व्यापाऱ्यांच्या श्रेण्या निर्माण झाल्या होत्या . शेतकऱ्या प्रमाणेच त्यांच्यावरही कर बसविण्यात आला होता. जंबूद्विपातील एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातांना व्यापार्यांना कर द्दावा लागत असे.

विक्रिवरही कर लावण्यात आला होता. लोहकार( लोहार), सुवर्णकार (सोणार), कुंभकार( कुंभार), रथकार( रथ बनविणारे सुतार) विणकर ( कपडे बनविणारे) हे धनाढ्य व्यापारी होते. समाजात त्यांना प्रतिष्ठा होती. हे सर्व व्यापारी बौध्द धम्मीय होते. खोटीवजने मापे, फसवणूक असं काही त्यावेळी घडत नव्हते कारण अशा लोकांवर राजाचा वचक होता व मोठे दंड त्यावर आकरण्यात येत असत. व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी अल्प व्याजदराने राजकोषातून कर्जही उपलब्ध करून दिले जात असे. हे व्यापारी बैलगाडी व नौकेद्वारे एका राज्यातून दुसर्या राज्यात प्रवास करीत असत. पाचशे पाचशे बैलगाड्यांचा ताफा व्यापारासाठी निघत असे.


चोर डाकूंपासून बचाव व्हावा म्हणून सोबत शसस्र सैनिक असत. हा व्यापार चलन ( कहापण) व वस्तू व अन्यधान्याची आदलाबदल अशा दोन्ही स्वरूपात चालत असे. या करातून राजकोषात मोठे धन जमा होत असे. व्यापार नदीमार्गे ही चालत असे. कलिंगातून वाहणाऱ्या मही व इतर नदीतून ही मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. जांबुद्विपातील व्यपारांवर कलिंगामध्ये हल्ले होत असत. त्यांना लुटल्या जात असे. अनेक व्यापाऱ्यांच्या कत्तली केल्या जात असत. अशोकाने हे हल्ले थांबविण्यासाठी अनेकदा कलिंग राजा खारवेल याला संदेश पाठविले होते पण खारवेल राजाने त्याची दखल घेतली नाही . त्यामुळे व्यापाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी व व्यापाराच्या भरभराटीसाठी नाईलाजास्तव अशोकाला कलिंग युद्ध करावे लागले होते.

काही वेगवेगळ्या पध्दतिचे गावे बसविण्यात आली होती. उदा.

कुंभकारांची गावे, सुवर्णकारांची गावे. शेतकर्यांची ( ग्रामीणी ची) गावे, सैनिकांची गावे. सैनिकांच्या गावावर कर लावला जात नसे.

कारागीर आणि कलावंत :

कारागीर आणि कलावंतांना प्रोत्सहान दिले जात असे म्हणून अशोक कालीन कलेला बहार आलेला दिसतो आणि त्यामुळे त्याकाळातील शिल्पकलेतील काही शिल्पे जगातील सर्वश्रेष्ठ शिल्पे समजली जातात उदा. अशोकस्तंभ, स्तंभावरील फोर डायमेंशन सिंहमुद्रा, स्तंभावरील ऋषभ शिल्प. ह्या शिल्पकारांची आर्थिक स्थिती चांगली होती, त्यांना चांगले मानधन मिळत असे त्यामुळे त्यांचावरही कर बसविण्यात आला होता.

पण्यगृहे व हेर :

राज्यामध्ये सरकारमान्य पण्यग्रुहे ( दारुची दुकाने) आजच्या भाषेत बार होते. त्यामध्ये काम करणारे कामगार व सोबत नगरवधू म्हणजे वेश्यांची नेमणूक केलेली असे. ह्या नगरवधू गुप्त हेरांचे काम करीत असतं. ह्या पण्यग्रुहात आलेले धनाढ्य व्यापारी, राजपुत्र यांच्या मनातील गोष्टी त्यांना जास्त मदिरापान करून ह्या नगर वधू काढून घेत असत. ह्या पण्यग्रुहावर कर लावलेला असे शिवाय नगरवधूंचे दरही ठरवून दिलेले असतं. ह्या नगरवधू ही श्रीमंत असतं. त्या कुणाला लुबाडू शकत नव्हत्या. त्यांच्यावर कर आकारण्यात आला होता. हे पण्यग्रुहे सरकार मान्य असत व मालकी ही सरकारची असे. पण्यग्रुहा बाहेर दारू विक्रिस मज्जाव होता. ही व्यवस्था चंद्रगुप्त मौर्यांपासून चालत आली होती.

सैनिक सोडून समाजातील सर्व घटकांवर कर आकारण्यात आला होता, मात्र कुणाचीही पिळवणूक होत नसे उलट आणिबाणी च्या प्रसंगी, नैसर्गिक आपत्ती प्रसंगी प्रजेचे कर माफ केले जात असत. प्रजा आनंदी व सुखासमाधानाने जगत असल्यामुळे कुणी ही कर चुकवित नसत त्यामुळे राज्यकोषात विपुल धनधान्य व पैसे जमा होत असतं. जमा झालेले हे विपुल धन अशोक प्रजेच्या कल्याणासाठी खर्च करीत असे.

बौद्ध विहारे शिक्षणाचे केंद्र :

अशोकाने बौध्दविहारांना शैक्षणिक केंद्रांत रूपांतरीत केले होते. अनेक विद्दार्थी आणि बौध्द भिक्खूंना तेथे विनामूल्य प्रशिक्षण दिले जात होते. जेवणाची व निवासाची ही सोय केली जात असे. आयुर्वेदाचे शिक्षण देवून, तज्ञ आयुर्वेदाचार्य निर्माण करून प्रत्येक ग्रामाग्रामात जाऊन हे वैद्द जनतेवर मोफत इलाज करीत व औषधेही प्रजेला मोफत पुरविले जात असत. जनतेला मोफत औषध उपचार मिळावे म्हणून राजकोषातून खर्च करणारा हा एकमेव राजा होय . केवळ जनतेसाठीच नव्हे तर जनावरांसाठीही दवाखाने निर्माण करणारा अशोक हा जगातील पहिला राजा होय.

अशोक आणि बौद्ध धम्म :

अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार केला असला तरी त्याने मृत्युदंडाची शिक्षा बंद केली नाही. चोर दरोडेखोर व दुष्ट प्रवृत्तीवर वचक राहावा म्हणून त्यांना कडक शिक्षा केली जाई प्रसंगी मृत्युदंड ही दिला जात असे. कलिंग युद्धा नंतर अशोकाने शेवट पर्यत युद्ध केले नाही. अशोकाचे सैन्य इतके अफाट होते की अनेक देश त्याला जिंकून घेता आले असते पण त्यांनी लढाईने जग जिंकण्यापेक्षा धम्माने जग जिकायचे होते, म्हणजेच जग बुद्धमय करायचे होते म्हणूनच दुसऱ्या देशांवर आक्रमण करण्या ऐवजी अशोकाने वेगवेगळ्या देशात धम्म दूत पाठवले. मात्र परकीयांनी मगधावर आक्रमण करण्याची कुणाची हिम्मत होऊ नये म्हणून सैन्य कपात ही केली नाही. अशोकाने जगातील सर्व राज्यांना तसा इशारा दिला होता की मी कुणावरही आक्रमण करणार नाही, मला धम्माने जग जिंकायचे आहे पण जर कुणी मगधावर आक्रमण केले तर त्यास क्षमा केली जाणार नाही, त्याचा विनाश अटळ असेल.

पुरोगामी मौर्य राजे :

मौर्य कालखंड म्हणजे चंद्रगुप्त मौर्य ते अशोक मौर्य हा कालखंड सर्वच बाबतीत समृद्ध असा कालखंड होता. हे तीनही राजे आजच्या भाषेत पुरोगामी विचारांचे राजे होते. चंद्रगुप्त मौर्य यांनी आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात जैन धर्माचा स्वीकार केला. अशोकाचे वडील राजा बिंदूंसार हे आजीविकी पंथाचे अनुयायी होते तर चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी बुद्ध धम्माची दिक्षा घेतली. हे तीनही धर्म वैदिक धर्माला प्रखर विरोध करणारे धर्म होते. अशोकावर बालपणापासूनच बौद्ध धम्माचे संस्कार झाले होते . अशोकाची प्रथम पत्नी विदिशा देवी ही बौद्ध धम्मीय होती. अशोक सिंहसानावर बसण्या पूर्वीच अशोकाचे लग्न झाले होते. केवळ कलिंग युद्धामुळे अशोक बौद्ध धम्माचा अनुयायी बनला असे नसून अशोकावर पूर्वीपासूनच बौद्ध धम्माचा प्रभाव होता.

जगातील सर्वात बळकट अर्थव्यवस्था अशोकाने निर्माण केल्यामुळे व बलाढ्य सैन्य पाठीस असल्यामुळे अशोकाने आपले सर्व आयुष्य जनकल्याणासाठी समर्पित केले होते. अशा ह्या जगश्रेष्ठ राजास त्यांच्या जयंतीदिना निमित्त मनस्वी प्रणाम व सर्वाना मन:पूर्वक मंगल कामना.

Updated : 29 March 2023 2:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top