Home > मॅक्स ब्लॉग्ज > हिमाचल प्रदेशाच्या डोंगराळ भागातील लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत का?

हिमाचल प्रदेशाच्या डोंगराळ भागातील लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत का?

हिमाचल प्रदेशाच्या डोंगराळ भागात संविधान पोहोचलं आहे का? या ठिकाणच्या भागातील लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत का? माजी सनदी अधिकारी इ झेड खोब्रागडे सध्या हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी शेअर केलेला अनुभव नक्की वाचा

हिमाचल प्रदेशाच्या डोंगराळ भागातील लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत का?
X

स्पिती valley टूर: हिमाचल प्रदेश नाको येथील होम स्टे आणि गावाबाबत काही माहिती व अनुभव शेअर केला होता. अनेकांनी प्रतिसाद चांगला आला. आम्ही आभारी आहोत. मला प्रवास वर्णन लिहिता येणार नाही. परंतु काही निरीक्षणे नोंदविता येतील. त्यापैकी एक निरीक्षण पुढीलबाबत आहे. टाबो येथील होम स्टे सुखकर होता. चुनपा यांचेकडे मुक्काम होता. त्यांची मुलगी मंजू बौद्ध यांनी आमचे आदरातिथ्य त्यांचे पाहुणे म्हणूनच केला. हे सदन कुटूंब आहे.
ट्रॅडिशनल ड्रेस मध्ये आमचे फोटो काढलेत. चुनपा यांनी अजिंठा एलोरा, मुंबई चा गेट वे पहिला असे सांगितले. बोधगया ला गेलो होतो असे ही म्हणाले. चूनपा हे विद्युत विभागात कामाला आहेत. आम्ही त्यांना नागपूर ला येण्याचे निमंत्रण दिले. संवाद साधताना, एकूणच छान वाटले.

नाको नंतर टाबो नंतर काझा कडे जाताना धनकड मोनास्ट्री ला भेट दिली. Bendurya hotel and restaurant मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो दिसला. old धनकड मोनास्ट्री कडे जाताना हे हॉटेल दर्शनी भागी आहे. विचारले तर मालकाने लावला असे काउंटरवरील व्यक्तीने सांगितले.मोनास्ट्री मधील लामा यांना डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे बाबत विचारले असता फार माहिती नाही म्हणाले. आम्ही जेथे होम स्टे केला तेथील व्यक्तींना बाबासाहेब यांचे बद्दल माहीती नाही. ज्यांना नाव माहीत आहे त्यांना बाबासाहेबांचे कार्य माहीत नाही. नागपूर ची दीक्षाभूमी-1956 ची धम्मक्रांती माहीत नाही, संविधान माहीत नाही.
टाबो होम स्टे च्या वेळी, कुटुंबातील 11 वित शिकणाऱ्या मुलीस विचारले, संविधानाबद्धल माहिती नाही. संविधान दिवस माहीत नाही. भारताचे संविधान अजून येथपर्यंत पोहोचले नाही. अर्थातच ज्यांच्याशी संवाद झाला त्यावरून हे निरीक्षण आहे. आमचा संवाद शिक्षित व समाजसेवी मध्यमवर्गीय कुटुंबाशी झाला. जे उच्चशिक्षित असतील किंवा सामाजिक व राजकीय कार्यकर्ते/ नेते असतील त्यांना माहीत असणार. पहाडी भागातील हे निरीक्षण आहे.

मात्र, प्रकर्षाने लक्षात आलेली गोष्ट म्हणजे या पहाडी भागात सर्वत्र जिओ आहे. BSNL सुद्धा या भागात आहे. याशिवाय दुसरी कनेक्टिव्हिटी नाही. जिओ घरोघरी पोहोचले आहे. इलेक्ट्रिक line आहे. सोलर चा वापर होतो. देशाचे संविधान पहाडी भागात आणि देशभर सर्वत्र पोहचवावे लागेल. संविधान पोहचले की संविधान निर्मितीची वाटचाल, संविधान सभेचे कार्य, प्रारूप समितीचे अध्यक्ष व संविधान निर्माता डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे नाव पोहोचेल. संविधान सभेने देशासाठी आणि विशेषतः ट्रायबल, अनुसूचित जाती, महिला व इतर मागासवर्ग, अल्पसंख्यांक यांच्यासाठी जे कार्य व योगदान दिले ते ही कळू लागेल.
हा प्रांतच पूर्ण बुद्धिस्ट आहे आणि ट्रायबल सुद्धा. आम्ही चर्चा करून महत्वाच्या बाबी सांगण्याचा प्रयत्न केला. एक आढळले की लोक बुद्धिस्ट असल्यामुळे शांतताप्रिय आहेत, समाधानी आहेत. कायदा पाळणारे आहेत. बुद्धिझम चा प्रभाव आहे. शांततेकडून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग म्हणजे बुद्धिझम. संविधानाचा पाया बुद्धतत्वावर आधारित आहे. त्यामुळे हे तत्वमुल्ये समजण्याची व अंगिकरण्याची आवश्यकता आहे. बंधुत्वाचे व देशाच्या अखंडतेचे कार्य यातूनच घडेल.

पूजनीय दलाई लामा यांची प्रतिमा सर्व मॉनेस्ट्री मध्ये दिसते. कालचक्र 2000 च्यावेळी, 14 वे दलाई लामा अनेक मॉनेस्ट्री मध्ये गेले असल्याचे आढळले. नवीन मॉनेस्ट्री, लायब्ररी इत्यादी कामे सरकारच्या निधीतून आणि काही कामे लोकसहभाग यातून होत आहेत. हा आदिवासी बेल्ट असल्यामुळे निधी मिळतो. मोनास्ट्रीमध्ये मैत्रेय बुद्धा, प्रोटेक्टर च्या प्रतिमा आहेत.संविधान सांगण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नी पुढाकार घेतला तरच संविधानाचे अधिकार,कर्तव्य आणि विकास इत्यादी बाबत मूलभूत गोष्टी समजतील. आदिवासी लोक मुळातच दुर्गम अतिदुर्गम भागात, जंगल दऱ्या खोऱ्यात, पहाडी भागात राहतात. अशा भागात राहतात म्हणूनच आदिवासी म्हटले जाते. शिक्षणापासून मूलभूत गरजा व सेवा सुविधा पासून दूर. तरी आनंदी. शिकण्यासारखे आहे. गडचिरोली जिह्यातील आदिवासी पासून मी आनंदी व समाधानी राहण्याचे शिकलो.
इ झेड खोब्रागडे, भाप्रसे नि

संविधान फौंडेशन, नागपूर

Updated : 2021-09-22T10:22:50+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top