Home > मॅक्स ब्लॉग्ज > सामाजिक परिवर्तनाची सुरूवात स्वतःपासून हवी : जयश्री जगदाळे

सामाजिक परिवर्तनाची सुरूवात स्वतःपासून हवी : जयश्री जगदाळे

सामाजिक परिवर्तनाची सुरूवात स्वतःपासून हवी : जयश्री जगदाळे
X

स्त्रियांच्या शिक्षणासाठी महात्मा फुले यांनी अपार कष्ट घेतले. त्यांच्यामुळेच स्त्रियांचा सामाजिक विकास झाला. महात्मा फुले यांच्यापासूनच मानवतेच्या विकासाला सुरूवात केली. त्यांनी सामाजिक परिवर्तनाला सुरूवात केली. त्यांचा वारसा जपत प्रत्येकाने सामाजिक परिवर्तनाची सुरूवात स्वतःपासून करावी, असं मत मुंबईच्या जिल्हा न्यायाधीश जयश्री जगदाळे यांनी केलं.

पिंपरी येथील लोखंडे कामगार भवन येथे भीम प्रतिष्ठानच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोफत काम करणार्‍या संस्था, संघटना व व्यक्‍तींचा सन्मान करण्यात आला. महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्‍त आयोजित कार्यक्रमात मुंबईच्या जिल्हा न्यायाधीश जयश्री जगदाळे अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

हे ही वाचा...

राजकीय, कायदेविषयक व संवैधानिक मुद्दे आणि समर्थकांचे भावनिक होणे!

शेंडी, जानव्यातलं हिंदुत्व मला मान्य नाही !! असं मुख्यमंत्री खरंच म्हणालेत का?

पंकजा मुंडे यांचं राजकारण संपत चाललं आहे का?

या वेळी फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, गुलाब पानपाटील, के. के. युवा मंचचे अध्यक्ष के. के. कांबळे, आकाश दौंडे आदी प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी जिल्हा न्यायाधिश जगदाळे यांच्या हस्ते रयत विद्यार्थी विचार मंचचे धम्मराज साळवे, अंजना गायकवाड, संतोष शिंदे, विजय जगदाळे, रॉबिनहुड संस्थेचे आकाश अगरवाल, राहुल गुप्‍ता, सुमित मंडल यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी काशिनाथ नखाते म्हणाले की, महात्मा फुले यांनी नव्या पिढीला शिक्षणाद्वारे घडविण्याचे काम केले. महात्मा फुलेंनी अनेक सामाजिक आदर्श घालून दिले. केशवोपनाची प्रथा त्यांनी बंद केली. त्यांनी अनेक पोवाडे लिहिले, शिवजयंती सुरू केली. त्यांच्या आदर्शावर चालणारे मानवतावाद पुढे घेऊन जात आहेत. त्यांचा विचार जोपासणे गरजेचे असल्याचं मत या वेळी नखाते यांनी केले.

या वेळी हैद्राबाद येथे झालेल्या सामुहिक अत्याचाराचा निषेध करत संबंधीत पिढीतेला आदरांजली वाहण्यात आली. लोखंडे कामगार भवन येथे महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्‍त आयोजित कार्यक्रमावेळी जिल्हा न्यायाधिश जयश्री जगदाळे, काशिनाथ नखाते, आकाश दौंडे आदीसह पदाधिकारी.

Updated : 3 Dec 2019 6:02 AM GMT
Next Story
Share it
Top