Home > मॅक्स ब्लॉग्ज > #Hathras: राजकारण कुणाच्या भल्याचं?

#Hathras: राजकारण कुणाच्या भल्याचं?

#Hathras: राजकारण कुणाच्या भल्याचं?
X

देशभक्ती, राष्ट्र निर्माण वगैरे जडजड मोठमोठे शब्द वापरले की सगळेच दिपून जातात. म्हणूनच भामट्या, अट्टल चोर डाकू मंडळींचा कुठलंही कांड अंगाशी आलं की या झुलीखाली लपण्याचा प्रयत्न असतोय. देशाची यंत्रणा उलथून लावण्याचा कट कुणीतरी रचलाय म्हटलं की, सगळ सोयीस्करपणे लपवून टाकता येत आणि जे जे म्हणून आपल्या विरोधात आहेत हे देशद्रोही म्हणून लेबल लावून मोकळ होता येत.

लोकहो, नीट लक्षात ठेवा, सबका नंबर आयेगा, सगळ्यांना हे धक्क्याला लावणारेत.

मुस्लीम

दलित

ओबीसी

सवर्ण

सबका नंबर आयेगा.

मुस्लिम तसेही शक्य तेवढे बदनाम करून झालेतच, त्यांना पाकिस्तानी ठरवणे फार सोप झालेलं आहे.

पुढचा नंबर दलितांचा आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात एनआयए ने उडी घेऊन अर्बन नक्षलवादी संज्ञा रुजवली आणि नक्सलवाद कसाही खातात हेही माहित नसलेले दीड जीबीचे आणि ४० पैशाचे भिकारचोट वेठबिगार कुणालाही अर्बन नक्षल म्हणायला लागलेत. हाथरस प्रकरणात नेमक हेच केलं जातंय.

गरीब, दलित कुटुंबातल्या मुलीवर अत्याचार झाला, मारहाण झाली, जीभ कापली, जखमी झाली, तिचा इस्पितळात मृत्यू झाला. अत्याचार झाल्यापासून तिच्या मृत्युपर्यंत तिचे धिंडवडे निघाले आणि त्यानंतर तिला बेवारस असल्यागत आईबापाला तोंड बघूही न देता जाळून टाकली.

हे सगळ अंगांशी यायला लागल्यावर आणि यांची व्होटबँक असलेला माजोरडा गायपट्ट्यातला सवर्ण समाज जातपंचायती बसवायला लागल्यावर यांना अंग झटकायला दुसरं कारण सापडेना म्हणून मीडियाला हाताशी धरून परदेशी कटाचा आणि सरकार उलथवण्याचा कट वगैरे स्टोरी सुरु झाल्यात.

अरे मठ्ठ लोकहो,

एवढे दिवस झाल्यावर तुमच्या गावठी जेम्स बाँड आणि गावठी चाणक्याला या गोष्टी का कळल्या नाहीत ?

एवढे दिवस झाल्यावर तुमच्या ५६ इंची छातीला ज्याला कथितरित्या जगातले लोक विश्वनेता समजतात त्याला का लक्षात आल्या नाहीत ? हे कोण कट करणारे आहेत. ते थेट देशात घुसून सरकार उलथून टाकायला हाथरस मध्ये पोहोचलेत आणि तुम्ही काय मग गोट्या खेळत होतात का ? कारण मुळातच हे सगळं परदेशी कट वगैरे थोतांड आहे.

हाथरस प्रकरण तुमच्या अंगाशी आलेलं आहे.

आरोपींवर कारवाई करावी, त्या लेकराला बेवारस जाळून टाकायला जबाबदार पोलिसांना आणि बेताल बडबडणारे नेते मुसक्या बांधून गप्प करावेत, जात पंचायती उधळून लावाव्यात. तर बिहार मध्ये उच्चवर्णीय मतांना दांडू लागण्याची भीती आणि कारवाई करू नये. तर बिहार मध्ये दलित मतांना गमवण्याची भीती.

या निवडणुकीच्या निर्लज्ज राजकारणापायी आणि मतांच्या आशेने तुम्ही हे परकीय हात आणि सत्ता उलथून टाकण्याचा कट वगैरे थोतांड उभ केलेलं आहे एवढच.

इस्लामिक फंडिंग च्या गप्पा मारणाऱ्या भामट्यांनी आधी आयपीएल बघायला गेलेल्या राजकुमाराला आधी माघारी बोलवावं, अंबानी च्या कंपनीची सौदी अरमको सोबतची भागीदारी मोडीत काढावी आणि सगळ्या इस्लामिक देशाकडून क्रूड ऑइल खरेदी बंद करावी, मग इस्लामिक फंडिंग चा बागुलबुवा दाखवावा.

शेतकरी आंदोलन करतात की लगेच तुमची सत्ता उलथून टाकण्याचा कट ? हाथरस मध्ये सगळी लोक त्या लेकराला न्याय मिळावा म्हणून आंदोलन करतात की, लगेच तुमची सत्ता उलथून टाकण्याचा कट ?

अरे तुमची सत्ता आहे की बिनबुडाच गाडगं? कुणीही कधीही उलथून तुम्हाला उताण पाडाव ? लाजिरवाण्या बाबी झाकायला उभं केलेलं थोतांड म्हणजे परकीय कट वगैरे बाजारगप्पा. लोकहो, भारतातल्या थोडीतरी न्यायाची चाड असलेल्या लोकांनो, यापुढे हाथरस प्रकरणात सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवलं जाईल. सरकार म्हणजेच देश हे पुन्हा पुन्हा ठसवलं जाईल. तुमच्यावर देशद्रोही असल्याचे आरोप केले जातील.

त्याला भिऊ नका, खरे देशद्रोही, देशाला विकून खाणारे चोर भामटे हेच आहेत. म्हणून यांना आपली काळी कृत्य झाकायला मोठ्याने आरडाओरडा करून लोकांवर आरोप करावे लागतात.

#ShameOnYouBJP

#JusticeForUPRapeVictim

-आनंद शितोळे

Updated : 7 Oct 2020 6:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top