“समाज प्रबोधनाचे काम करणाऱ्यांनी लग्न समारंभ मर्यादित साजरा करावा”
X
कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुडा सोहळ्यानिमित्त सर्वत्र टीकेची झोड उठलेली असताना समाजात होणाऱ्या लग्न कार्यक्रमाचे काही नियम आणि पद्धती ठरवल्या गेल्या पाहिजे असं राजेंद्र कोंढरे यांनी म्हटलं आहे.
इंदुरीकर यांच्यावर बोलताना ते सांगतात की, समाज प्रबोधनाचे काम करणाऱ्यांनी विवाहसोहळा मर्यादित करण्याचा पायंडा घातला पाहिजे जेणे करून त्याचे समाजात अनुकरण होईल. इंदुरीकर यांनी आपल्या २५ वर्षाच्या कारकीर्दीत लग्नातल्या अनेक प्रथा, परंपरांवर कायम टीका केली आहे. आणि प्रत्यक्षात त्यांच्या मुलीच्या लग्नाला गाड्यांचा ताफा, मोठ्याप्रमाणात समुदाय जमलेला होता या गोष्टी त्यांनी मर्यादित ठेवल्या असत्या तर समाजापुढे अधिक आदर्श गेला असता. उर्वरित महाराष्ट्रातल्या पुढारलेल्या लोकांनी तुम्ही जे शब्द मागच्या काळामध्ये दिलेले होते. त्याप्रमाणे ते पाळून त्यांनी विवाह समारंभामध्ये एक आचारसंहिता, एक आदर्श परंपरा आणि एक व्यवस्थित अशी पद्धत आखून दिली तर पुढच्या काळात लग्नसमारंभाच्या निमित्ताने वारंवार निर्माण होणाऱ्या प्रश्नांना एक चांगली प्रथा आणि परंपरा पुन्हा एकदा सुरु होईल अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्ती केली.
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजात विवाहसोहळा कसा झाला पाहिजे ? यावर बैठक घेण्यात आली होती त्यात नेमकं काय झालं सांगताहेत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे






