Home > मॅक्स ब्लॉग्ज > शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाजाचे नाते

शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाजाचे नाते

शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाजाचे नाते
X

कुळवाडी भूषण , शेतकऱ्यांचा कैवारी , मानवतावादी , बहुजनवादी , उत्तम राजकारणी , युग धुरंधर, रयतेचे राजा ,बहुजनप्रतिपालक , समतावादी व अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे आणि विद्रोहाची मशाल पेठवणारे , हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतिंनिमित्ताने महाराजांना मानाचा मुजरा . छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फरवरी ई.सं १६२७ मध्ये किल्ले शिवनेरी येथे झाला होता. राजमाता जिजाऊने शिवाजी महाराजांना युद्धातले सर्व डावपेच शिकवीत स्वराज स्थापन करण्यासाठी प्रेरित करून रयतेचे राज्य निर्मितीसाठी वेळोवेळी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले , शिवाजी महाराजांनी कमी कालावधीत अनेक गड व किल्ले जिंकत इथल्या आदिलशाही , निजामशाही , ब्रिटिश इत्यादि राजवटी विरोधात बंडचा पावित्रा घेतला आणि संघर्षाची बीजे रोवत रयतेचे राज्य निर्माण केले , या अनेक लढाईत महाराजांनी अठरापगड जातीला सोबत घेत राज्यातील मुस्लिम बांधवांनापण आपल्या सैन्यात भर्ती करत त्यांनाही स्वराज निर्मितीचे शिलेदार बनवले जे पुढे जावून महाराजांच्या अनेक प्रमुख विभागांची जबाबदारी पार पाडू लागले , याच दरम्यान महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला परंतु इथल्या ब्राम्हणी व्यवस्थेने महाराजांचे क्षत्रीयपण नाकारत शूद्र ठरविले म्हणून पुन्हा ४ ऑक्टोबर १६७४ रोजी महाराजांच्या राज्यभिषेक करण्यासाठी काशी वरुण गागाभट्ट या पूरोहितला बोलवण्यात आले आणि महाराजांचा राज्यभिषेक सोहळा पार पाडले .

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यात कोणताही भेदभाव न ठेवता अठरापगड जातींना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी इथल्या प्रस्थापित व विषमतावादी व्यवस्थेच्या विरुद्ध विद्रोह पुकारून मानव जातीसाठी समतावादी व समतामूलक समाजाची निर्मिती करत मानवतावादी धर्म जोपासला आणि अन्याय व अत्याचार याचा बिमोड करीत इथल्या ब्राह्मणशाहीला व पुरोहितवाद नाकारून खऱ्या अर्थाने जनतेला रयतेचे राज्य निर्माण केले आणि जगाला आदर्श राजा म्हणून उदाहरण दिले . ज्यात महाराजांनी मोगलांच्या विरोधातील लढाई लढण्यासाठी आपल्या सैन्यात मुस्लिम समाजातील शूर योद्धे घेत आपण मुस्लिमद्वेषी नसून सर्वधर्म समभाव मानणारे एक उमदे व जाणकार राजा असल्याचे दाखवून दिले म्हणून शिवाजी महाराज हे एक कुशल और उत्तम प्रशासक असल्याचे ओळखले जावू लागले . त्यांच्या कारकीर्दमध्ये कुठेही जातीय किंवा सांप्रदायिक दंगल अथवा हिंसा झाल्याची नोद दिसत नाही . यावरून महाराज किती समतामुलक आणि न्याय तत्ववादी होते याची प्रचिती येते , समकालीन इतिहासात शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी आणि द्वेषी होते असे चित्र रंगवण्याचा प्रकार करण्यात आले परंतु महाराजांनी कधीही त्यांच्या राज्यात धार्मिक स्थळे उधवस्त केल्याचे दाखले मिळत नाही , म्हणून महाराजांनी विषमतावादी विचारधारा व प्रवृत्तीचा विरोध केला असून ना बल्की मुस्लिम लोकांना बाबत विरोध होता , असे असते तर कदाचित त्यांच्या सैन्यात किंवा राज्यात मुस्लिम लोकांना स्थान देण्यात आले नसते , म्हणून लोकांनी खोट्या प्रचारला बळी न पडता सदसदविवेक बुद्धीचा वापर करून महाराजांना डोळसपणे समजून घेतले पाहिजे .

ज्यावेळी महाराजांनी प्रतापगड भेटी दरम्यान अफजल खान यांनी महाराजांना दगाफटका देण्याचा प्रयत्न केले तेव्हा जीवा महाले यांनी भास्कर कुलकर्णी यांना रोखत महाराजांचे प्राण वाचविले आणि यानंतर महाराजांनी अफजल खान यांचा वध करीत भास्कर कुलकर्णी यांचे बोटे छाटली व त्यानंतर अफजल खान यांची समाधी महाराजांनी ही प्रतापगडच्या पायथ्याशी उभारून महाराज हे मुस्लिम देव्षि नसून सर्व धर्माचे सन्मान करणारे होते यावरू दिसते . कारण चुकीच्या प्रवृत्तीला ज्यात त्यांनी " नूर खान " , अंगरक्षक " मदारी मेहतर " , वकील ' काझी हैदर " , चित्रकार ' मीर मोहम्मद " , वाघनख्या पाठवून देणारा " रुस्तुमे जमाल " आरमार प्रमुख " दर्या सारंग " आदी मुसलमान सेनापती होते . शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते. त्यापैकी 10 मुसलमान होते.एकही मस्जिद पाडली नाही,जाळले नाही.शिवाजी महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहास समजून घेताना त्यांनी क्षत्रिय म्हणून रयतेचे रक्षणासाठी आणि इथल्या सर्व सामान्य माणसाच्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सतत त्यांनी विषमतावादी व्यवस्था नाकारून जनतेचे राज्य निर्माण करण्यासाठी उभे आयुष्य लढत राहिले , परंतु आज शिवाजी महाराजांच्या नावाने मतांचा जोगवा मागायचा आणि महाराजांच्या विचारांना तिलांजली देऊन विरोधात कृती करून आपले स्वार्थी राजकारण करून समाजात दुही माजवण्याचे काम काही व्यक्ती , संस्था, संघटना , पक्ष करत आहे म्हणून महाराष्ट्रतील तमाम तरुणांनी महाराजांनी जे कार्य केले व जो विचार दिला तो आत्मसात करून त्या मार्गाने वाटचाल केल्यास खऱ्या अर्थाने महाराजांचे कार्य आपण पुढे घेऊन जाऊ व फक्त महाराजांच्या नावाचा दरवर्षी जयजयकार करण्यापेक्षा त्यांचे जयंतीनिमित्त त्यांचे विचार आणि कार्य समस्त बहुजन समाजाला त्यांचे खरे साहित्य आणि पुस्तके पोहचण्याचे प्रण करूया.

Updated : 19 Feb 2021 5:59 AM GMT
Next Story
Share it
Top