Home > मॅक्स ब्लॉग्ज > गौतम अदानी एक साधा कष्टाळू तरूण | Gautam Adani |

गौतम अदानी एक साधा कष्टाळू तरूण | Gautam Adani |

शरद पवार यांनी गौतम अदानी यांचा एक साधा कष्टाळू तरुण असा उल्लेख केला आहे. पण शरद पवार यांनी गौतम अदानी यांचं कौतूक का केलं? जाणून घेण्यासाठी लेख नक्की वाचा...

गौतम अदानी एक साधा कष्टाळू तरूण | Gautam Adani |
X

गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्याकडे एक तरूण येतो आणि गुजरात-पाकिस्तानच्या सीमेवरील मुंद्रा बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवतो. त्यावेळी मुख्यमंत्री चिमणभाई त्या तरूणाला जाणीव करून देतात की शेजारी पाकिस्तानची सीमा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही या तरूणानं हे शिवधनुष्य लिलया पेललं आणि भारतातलं सर्वात अत्याधुनिक आणि सर्वात मोठं असं ५० हजार एकरावरील मुंद्रा बंदर उभारलं. त्या तरूणाचं नाव होतं गौतम अदानी.

गौतम अदानींच नाव सध्या जगभर गाजतंय. लोकल मध्ये छोट्या-छोट्या वस्तूंची विक्री करणारा एक सामान्य युवक ते जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीतलं पहिलं नाव गौतम अदानी.

नुकताच अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेनं एक अहवाल प्रसिद्ध केला त्यात अदानी ग्रुप ऑफ कंपनीज् वर गंभीर आरोप केले आणि गौतम अदानींचं नाव वादाच्या भोवऱ्यात अडकलं. सगळीकडून अदानींवर टीका होत असताना भाजपा आणि शरद पवारांपासून ते राज ठाकरेंपर्यंत सर्वांनीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अदानींची पाठराखण करत त्यांची स्तुती केलीय, आणि गौतम अदानींच्या करिष्म्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. गौतम अदानी नक्की कोण आणि यशाच्या इतक्या शिड्या ते भराभर कसे चढत गेले याविषयी अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील पण २०१४ नंतर गौतम अदानी ख-या अर्थानं चर्चेत आले ते पंतप्रधान नरेंद्र मोदींशी त्यांच्या असलेल्या संबंधांमुळे.

तर असा हा साधा आणि कष्टाळू तरूण... अनेकांच्या भुवया उंचावल्याच असतील पण या वाक्यामागची कहाणी ऐकण्यासाठी हा पूर्ण व्हिडीयो तुम्हाला पाहावाच लागणार आहे.

गौतम अदानी हे नाव एका दिवसात मोठं झालेलं नाही. राजकीय आशिर्वादासोबतच अदानींची प्रचंड मेहनत आणि महत्त्वाकांक्षेला प्रयत्नांची जोड आहे. भारताबरोबरच विदेशातीलही सत्ताधा-यांसोबत अदानींचे सलोख्याचे संबंध आहेत. गुजरातच्या मातीत उद्योजक घडविण्याचे गुण आहेत हे गुण अदानींमध्ये ही उतरलेले दिसतात. नम्र आणि शांत स्वभाव या अदानी यांच्या जमेच्या बाजू आहेत. कुठल्याही वादात अडकण्यापेक्षा उद्योग वाढीला त्यांनी प्राधान्य देतात असं खुद्द शरद पवार अदानींबद्दल बोलतात.

गौतम अदानी लोकलमध्ये छोट्य़ा-छोट्या वस्तूंची विक्री स्वतः करायचे. त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी काही छोट्या व्यवसायांना सुरूवात केली. या सर्वातून त्यांनी काही रक्कम जमा केली. त्यानंतर ही रक्कम गौतम यांनी हि-याच्या व्यवसायात गुंतवली. तिथेही अदानी यांना चांगले पैसे मिळत होते. मात्र, त्यांचं मन तिथं फारसं रमलं नाही. पायाभूत सुविधांच्या उभारणीच्या उद्योगामध्ये गौतम अदानींना अधिक रस होता. त्यावेळी त्यांनी बंदर उभारणीचा प्रचंड अभ्यास केला होता आणि मुंद्रा पोर्ट अस्तित्वात आलं.

गौतम अदानींनी पायाभूत सुविधांच्या उद्योगा व्यतिरिक्तही हळूहळू इतर उद्योगांकडे मोर्चा वळवला. आता गौतम अदानी हे कोळसा पुरविण्याच्या उद्योगातही उतरले. एकदा गोंदिया इथं प्रफुल्ल पटेल यांच्या वडीलांच्या स्मृतिदिना निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी गौतम अदानी आले होते. त्यावेळी शरद पवारांनी गौतम अदानी यांना सल्ला दिला की कोळसा पुरविण्याच्या उद्योगाबरोबरच वीज निर्मितीतही त्यांनी उतरावं. त्यावर तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत गौतम अदानी यांनी गोंदियाचा तेव्हाचा जिल्हा भंडारा इथं वीजनिर्मितीचा प्रकल्प मार्गी लावला. हाच वीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण झाल्यावर तिथून ३ हजार मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे.

अशा या गौतम अदानींच्या सुरूवातीचा काळाचा प्रवास शरद पवार यांनी शब्दबद्ध केलाय तो त्यांच्या “लोक माझे सांगाती” या राजकीय आत्मकथेत यात शरद पवारांनी गौतम अदानींवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. ते म्हणतात, गौतम अदानी या तरूण उद्योजकाला मी अनेक वर्षांपासून ओळखतो. कमालीचा कष्टाळू आणि साधा ! शून्यातून त्यानं आपलं साम्राज्य उभं केलंय. रात्रंदिवस काम करणारा आणि अतिशय साधा असणारा हा तरूण उद्योजक जमिनीवर पाय ठेवून असल्याचं या आत्मकथेत नमूद करण्यात आलंय.

Updated : 16 Jun 2023 2:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top