Home > मॅक्स ब्लॉग्ज > मला हैराण करणाऱ्या काँग्रेस समर्थकांसाठी- निखिल वागळे

मला हैराण करणाऱ्या काँग्रेस समर्थकांसाठी- निखिल वागळे

इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी आणीबाणी बाबत केलेल्या दाव्यांना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आक्षेप घेतला आहे...

मला हैराण करणाऱ्या काँग्रेस समर्थकांसाठी- निखिल वागळे
X

१) काॅंग्रेसची ही अवस्था पाहून मला आनंद होत नाही. पण कोमात गेलेला हा पक्ष बरा होणार नसेल तर मेलेला बरा ही माझी भूमिका आहे. राहुल गांधी हे अकार्यक्षम नेते आहेत. नोकरीत असते तर त्यांची बडतर्फी अटळ होती.

२) मोदींचा पराभव आजची काँग्रेस करु शकेल असं मला वाटत नाही.

३) सेक्युलॅरिजम काॅंग्रेसकडे गहाण टाकायला मी तयार नाही.

४) काॅंग्रेस हा भाजपप्रमाणे सेक्युलॅरिजमचा शत्रू आहे. याची असंख्य उदाहरणं देता येतील.

५) इंदिरा गांधींच्या कणखर नेतृत्वाचं कौतुक मलाही आहे. पण त्यांनी या देशात पहिली घटनात्मक हुकूमशाही आणली हे सत्य आहे. मोदी आणीबाणी न लादता त्यांचं अनुकरण करत आहेत.

६) आणीबाणीत जाॅर्जने काय केलं हा इतिहास आहे. बडोदा डायनामाईट केस प्रसिद्ध आहे. त्याला तिखटमिठ लाऊन सांगू नका. जाॅर्जच्या हिंसक कृत्याचं मी समर्थन करत नाही.पण १९७४ पासूनची परिस्थिती मी पाहिली आहे. इंदिरा गांधींनी कहर केला होता. किती लोक तुरुंगात मेले. संजयने गुंडगिरीचं थैमान मांडलं होतं. जेपींवर काॅंग्रेसवाल्यानी हल्ला केला. युवक काॅंग्रेसने गाड्या लुटल्या वगैरे इतिहास उपलब्ध आहे. आज मोदी-शहा वागताहेत त्याहीपेक्षा भयंकर इंदिरा- संजय ७३-७५ या काळात वागले. शहा आयोगाने अत्याचारांची यादी मांडली आहे. आमच्यासारखी माणसं जिवंत आहेत तोपर्यंत कृपया थापा मारु नका. इतिहास चुकीचा सांगू नका.

७)समाजवाद्यांच्या चुका हा वेगळा विषय आहे.वादच घालायचा तर संघाला पहिली प्रतिष्ठा नेहरुंनीच मिळवून दिली आणि राम जन्मभूमी आंदोलनाला राजीव गांधींनी खतपाणी घातलं असंही म्हणता येईल. संघ वाढायला काॅंग्रेसच जबाबदार आहे.

८) मोदी-शहांच्या दडपशाहीविरुद्ध अहिंसकपणे किंवा गरज पडली तर हिंसकपणे लढायची माझी तयारी आहे. तुरुंग माझ्यासाठी नवा नाही. किती काॅंग्रेसवाले माझ्यासोबत येतील?

९) भक्तांप्रमाणे माझं ट्राेलींग करु नका. असलं विष मी १० वर्ष पचवतो आहे.

१०)मी तुमचा शत्रू नाही, मित्र आहे. माझ्याशी लढू नका. आपण मोदींशी लढू या.


Updated : 20 Nov 2020 8:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top