Home > मॅक्स ब्लॉग्ज > वि. दा. सावरकरांचा माफीनामा मराठीत, जरूर वाचा

वि. दा. सावरकरांचा माफीनामा मराठीत, जरूर वाचा

विनायक दामोदर सावरकर यांचा माफीनामा मराठीत! काय म्हणाले होते सावरकर त्यांच्या माफीनाम्यात जरूर वाचा...

वि. दा. सावरकरांचा माफीनामा मराठीत, जरूर वाचा
X

व्ही.डी. सावरकर (आरोपी क्रमांक 32778) यांनी गव्हर्नर जनरल कौन्सिलचे सदस्य सर रेजिनाल्ड क्रॅडॉक यांना 14 नोव्हेंबर 1913 रोजी एक खाजगी पत्र लिहिले होते.

मी तुमच्या सहानुभूतीपूर्ण विचारांसाठी खालील मुद्दे मांडू इच्छितो: जेव्हा मी जून 1911 मध्ये येथे आलो, तेव्हा मला माझ्या सहकाऱ्यासोबत मला मुख्य आयुक्त कार्यालयात नेण्यात आले. तिथे मला 'ड' वर्ग कैदी म्हणजेच धोकादायक कैदी असा दर्जा दिला गेला. उर्वरित आरोपींना हा 'डी' दर्जा देण्यात आलेला नाही. यानंतर मला सहा महिने एकट्यालाच एका कोठडीत ठेवण्यात आले, बाकी आरोपींना तसे ठेवले नाही.

त्या काळात मला नारळाच्या साली कुटण्याचे काम दिले गेले होते, हे काम करताना माझ्या हातातून रक्तस्त्राव देखील व्हायचा. त्यानंतर मला तुरुंगातील सर्वात कठीण काम समजल्या जाणाऱ्या - ऑइल मिलमध्ये टाकण्यात आले. जरी या कालावधीत माझे आचरण अपवादात्मक चांगले होते, तरीही मला सहा महिन्यांनंतरही तुरुंगातून बाहेर पाठवले गेले नाही, परंतु माझ्याबरोबर आलेल्या इतर आरोपींना तुरुंगाबाहेर पाठवले गेले. तेव्हापासून आजपर्यंत मी शक्य तितके चांगले आचरण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

जेव्हा मी याबाबत अर्ज सादर केला तेव्हा मला सांगण्यात आले की, मी एका विशेष श्रेणीचा कैदी आहे आणि म्हणून मला इतरत्र पाठवता येणार नाही. परंतु जेव्हा केव्हा मी चांगले अन्न आणि काही विशेष सोयीसुविधा मागितल्या तेव्हा मात्र सांगितले गेले की 'तुम्ही सामान्य कैदी आहात आणि इतरांना जे अन्न मिळेल तेच तुम्हाला मिळेल.'

सर,अशा प्रकारे मला विशेष कैद्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे ते केवळ माझी विशेष गैरसोय व्हावी म्हणून.

माझे बहुतेक सहआरोपी येथून जेव्हा बाहेर गेले तेव्हा मी माझ्या सुटकेसाठी विनंती केली. जरी मला फक्त दोन किंवा तीन वेळा तुरुंगात डांबले गेले असले तरी, मी सोसलेल्या वेदना शिक्षेपेक्षा आशिक आहेत. जेव्हा माझ्या मुक्ततेचा आदेश आला तेव्हा बाहेर इतर राजनैतिक कैद्यांसोबत काही गडबड झाली माझी मुक्तता टाळली. जर मी आता भारतीय तुरुंगात असलो असतो तर माझी आजवर बरीच शिक्षा माफ झाली असती.

किंवा त्याहून अधिक शिक्षा झाली त्यांना सोडून देण्यात आले. मी त्याचा सहआरोपी असल्याने मला सोडण्यात आले नाही. पण शेवटी जेव्हा माझी सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आणि त्याच वेळी जेव्हा बाहेरून काही राजकीय कैद्यांमध्ये काहीतरी चूक झाली, तेव्हा मी त्यांच्यासोबत बंद होतो कारण मी त्यांचा सहआरोपी होतो.

जर मी भारतीय तुरुंगात असतो, तर मी माझी बरीच शिक्षा आतापर्यंत माफ केली असती, माझ्या घरी मी अनेक पत्रे पाठवली असती, लोक मला भेटायला देखील आले असते. जर मला फक्त आणि फक्त देशातून हद्दपार केले गेले असते तर मला आतापर्यंत या तुरुंगातून केव्हाच मुक्त केले गेले असते. पण परिस्थिती अशी आहे की ना मला भारतीय कारागृहाची सुविधा मिळत आहे ना मला या काळापाणी कारागृहाच्या नियमांचा लाभ मिळत आहे, अशा प्रकारे मला दोन्ही प्रकारे तोट्यात ठेवण्यात आले आहे.

म्हणून, कृपया माझ्यासारख्या विसंगतीत सापडलेल्या या असामान्य परिस्थितीचा अंत करा, मला एकतर भारतीय तुरुंगात पाठवा किंवा मला इतर कैद्यांप्रमाणे निर्वासित कैद्याचा दर्जा द्या. मी कोणत्याही विशेष उपचारासाठी विचारणा करत नाही, जरी माझा असा विश्वास आहे की जगातील स्वतंत्र देशांच्या सुसंस्कृत प्रशासनाच्या अंतर्गत राजकीय कैदी म्हणून जी अपेक्षा केली जाऊ शकते, त्या सवलतींसाठी वंचित ठेवलेल्या कैद्यांना जे अधिकार मिळावले पाहिजेत तेच मागत आहे. मला या तुरुंगात कायमची कैद करण्याची सध्याची योजना मला माझे आयुष्य टिकवण्यासाठी निराश आणि नाउमेद करते आहे. मर्यादित कालावधीसाठी कैदी असलेल्या सर्वांसाठी हे प्रकरण वेगळे आहे.

परंतु सर, माझ्या चेहऱ्यासमोर 50 वर्षे मी पाहत आहेत. मी एकांत कैदी म्हणून, माझे जीवन सोपे करण्यासाठी दिलेल्या सवलती देखील दिल्या जात नसताना नैतिक उर्जा कशी गोळा करू? एकतर मला भारतीय कारागृहात पाठवले जावे जिथे मी (अ) माझ्या शिक्षेत कपात करू शकेन; (ब) माझे लोक दर चार महिन्यांनी मला भेटू शकतील, आणि दुर्दैवाने फक्त तुरुंगात असलेल्यांनाच माहित आहे की त्यांच्या नातेवाईकांना अधूनमधून भेटणे किती मोठी कृपा आहे; (क) सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 14 वर्षांच्या आत सोडण्याचा कायदेशीर नाही तर नैतिक अधिकार; (ड) पत्रव्यवहार करता येईल आणि इतर लहान-सहान सुविधा उपलब्ध असतील.

जर मला भारतात पाठवता येत नसेल, तर मला सोडून द्यावे आणि या आशेने बाहेर पाठवावे की इतर कैद्यांप्रमाणे, पाच वर्षांनी रजा घेतल्यानंतर मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना येथे बोलवू शकेन. जर हे स्वीकारले गेले, तर एकच तक्रार असेल की मला माझ्या चुकांसाठी जबाबदार धरले पाहिजे आणि इतरांच्या चुकांसाठी नाही.

प्रत्येक मनुष्याचा हा मूलभूत अधिकार असताना मला त्याबद्दल विनंती करावी लागते हे खेदजनक आहे! एकीकडे 20 राजकीय कैदी तरुण, सक्रिय आणि अधीर आहेत, दुसरीकडे कैद्यांच्या या वसाहतीचे नियम आणि कायदे केवळ विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमीतकमी पातळीवर असावेत यासाठी केले गेले आहेत. म्हणून हे अपरिहार्य आहे की कधीकधी त्यापैकी एक नियम मोडतो आणि जेव्हा प्रत्येकाला जबाबदार धरले जाते, जसे की प्रत्यक्षात घडत आहे - मला या सर्वांपासून दूर राहण्याची फारच कमी संधी आहे.

सरतेशेवटी, मी आठवण करून देतो की मी माझा दया अर्ज, जो 1911 मध्ये पाठवला होता, कृपया तो वाचावा आणि तो स्वीकारा आणि भारत सरकारला पाठवावा.

भारतीय राजकारणातील ताज्या घडामोडी आणि सरकारच्या तडजोडीच्या धोरणामुळे पुन्हा एकदा घटनात्मक मार्ग खुले झाले आहेत. भारताचे आणि मानवतेचे भले करणारा कोणीही यापुढे काटेरी रस्त्यावर आंधळेपणाने चालणार नाही ज्याने आम्हाला 1906-1907 मध्ये शांतता आणि प्रगतीच्या मार्गापासून दूर नेले.

म्हणून, जर सरकारने, त्याच्या विविध कृपा आणि दयाळूपणे, मला सोडले, तर मी घटनात्मक प्रगतीचा सर्वात कट्टर वकील आणि ब्रिटिश सरकारशी निष्ठावान बनेल, जी त्या प्रगतीची पहिली अट असेल. जोपर्यंत मी कारागृहात आहे, महामहीमशी निष्ठावंत असलेल्या भारतीय प्रजेच्या हजारो घरात मी आनंद आणू शकत नाहीत कारण सध्या रक्त पाण्यापेक्षा दाट आहे. परंतु जर मला सोडण्यात आले तर लोक स्वाभाविकपणे आनंदाने आक्रोह करतील आणि सरकारलाही माफ करतील आणि ब्रिटीश सरकारला शिक्षादेण्याऐवजी स्वतः सुधारणा करतील.

शिवाय, संवैधानिक मार्गाच्या बाजूने माझा विचार बदलल्याने भारत आणि युरोपमधील भरकटलेल्या तरुणांना परत आणले जाईल ज्यांनी मला त्यांचे मार्गदर्शक मानले आहे. मला पाहिजे त्या क्षमतेने मी सरकारची सेवा करण्यास तयार आहे, कारण माझा विवेक बदलला आहे आणि मला आशा आहे की भविष्यातही माझे आचरण असेच असेल.

मला तुरुंगात ठेवून काहीही मिळणार नाही, परंतु मला सोडून देऊन बरेच काही मिळवता येईल. क्षमा करण्याचे सामर्थ्य फक्त बलाढय़ांनाच असते आणि म्हणून एक बिघडलेला मुलगा सरकारच्या, पालकांच्या दारातून वगळता इतर कोठे परत येऊ शकतो? मला आशा आहे की सर कृपया या मुद्द्यांचा विचार करतील.

संदर्भ: वी.डी. सावरकर

सज़ा-याफ़्ता बंदी

अनुवाद: सागर भालेराव

(प्रस्तुति – शम्सुल इस्लाम)

Updated : 13 Oct 2021 12:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top