Home > मॅक्स ब्लॉग्ज > Thackeray Brothers : मराठी स्पिरीटची ताकद !

Thackeray Brothers : मराठी स्पिरीटची ताकद !

प्रत्यक्षात शिवसेना फोडण्यासाठी भाजप इतकी टोकावर का आली होती ? मराठी माणूस, ठाकरे बंधू आणि महापालिका निवडणूक निकालाचे विश्लेषण करताहेत राजकीय विश्लेषक राजेंद्र साठे वाचा

Thackeray Brothers : मराठी स्पिरीटची ताकद !
X

BMC election results 2026 आनंदाची बातमी अशी आहे की, Marathi spirit in Mumbai मुंबईतल्या मराठी माणसांचे लढाऊ स्पिरीट संपलेले नाही. Thackeray Brothers ठाकरे बंधूंना मिळालेल्या जागा हा त्याचा पुरावा आहे. काल म्हटल्याप्रमाणे भाजप महायुती BJP's Mahayuti Alliance नावाच्या निर्ल्लज्ज प्रकरणाचा नंगानाच सगळ्यांनाच डाचत होता. पण हिंदुत्व, लाडकी बहीण, विकास अशी निमित्ते सांगून महायुती लोकांना घोळात घेत होती. हे अनैतिक राजकारण पसंत नव्हते असे लोक अस्वस्थ होते. पण त्यांची कोंडी झाली होती.

याच वेळी Thackeray Brothers ठाकरे बंधू एकत्र झाले. त्यांचा निर्धार आणि लोकांची अस्वस्थता यांची तार जुळली आणि ठाकरे बंधूंना लक्षणीय यश मिळालं. या अस्वस्थ मतदारांसाठी ठाकऱ्यांची सेना हे एक साधन होते. भाजपच्या अनैतिक राजकारणाविरुध्दचा लोकांचा राग त्या साधनाद्वारे व्यक्त झाला आहे. त्यामुळे या मतदानाद्वारे लोकांनी ठाकऱ्यांवर एक मोठी जबाबदारी टाकली आहे. इथून पुढे ती ते कशी पार पाडतात हे पाहावे लागेल.

(याबाबत बीबीसीच्या मुलाखतीतही मी बोललो आहे.)

ठाकऱ्यांनी आधीच एकत्र यायला हवे होते, आणखी प्रचार करायला हवा होता इत्यादी विश्लेषण आज अनेकांनी केले. ते खरे आहे. पण पूर्णतः नाही. कारण, भाजपने फोडाफोडी करून आणि पैशांचा वापर करून सेनेला इतके घायाळ केले होते की ठाकऱ्यांना हालचालीला जागा कमी होती. त्यातून ठाकऱ्यांनी धावाधाव केली असतीच तर भाजपने आणखी दुप्पट प्रचार व पैसे खर्च केले असते. आणखी फोडाफोडी केली असती. मी राहतो त्या दहिसरमध्ये गेल्या दोन वेळा भाजपच्या आमदार जिंकल्या आहेत. गेल्या वेळचा नगरसेवकही बहुदा भाजपचा होता. असे असूनही तिथे तेजस्वी घोसाळकरांना आयात करून भाजपने तिकीट दिले. उद्देश एकच. ठाकरे यांची थोडीही ताकद असेल तर ती ठेचायची. घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ती पत्रकार परिषद काढून पाहा. आपण अत्यंत नाईलाजाने भाजपमध्ये येत आहोत व ठाकरे कुटुंबांने आपल्याला खूप काही दिले असेच त्यांनी सांगितले होते.

या स्थितीत लोकांना भावनिक आवाहन करणे हाच एक मार्ग ठाकऱ्यांकडे होता. बंधूद्वयांनी तो अचूक वापरला. आता इथून पुढे ठाकरे यांनी अधिक प्रयत्न करावेत, महाराष्ट्रात जावे, कार्यकर्त्यांशी अधिक प्रेमाने वागावे वगैरे सुचवता येईलच. मुंबईने जी साथ दिली आहे ती पाहून ठाकरे यांची इच्छाशक्ती सुधारेल अशी आशा करूया.

जाता जाता – मातोश्रीतल्या बैठकीवरून अमित शाह यांना खोटे पाडले म्हणून भाजपने सेना फोडली असे एक विश्लेषण भाजपचे कुजबूजखोर चार वर्षांपूर्वी करीत असत. प्रत्यक्षात Shiv Sena सेना फोडण्यासाठी भाजप इतकी का टोकावर आली होती हे आजच्या निकालाच्या आकड्यातून पुरेसे स्पष्ट व्हावे.

सारांश, मुंबईतले मराठी स्पिरीट आणि त्याच्या बळावर सेना काय करू शकते याचे सर्वात चांगले आकलन हे भाजपलाच झालेले आहे. या आकलनाचे गुण त्याला द्यायला हरकत नाही.

Updated : 17 Jan 2026 9:13 AM IST
Next Story
Share it
Top