Home > मॅक्स ब्लॉग्ज > हिंदी फिल्म्सचे रिव्ह्यूज किती खरे -किती खोटे !

हिंदी फिल्म्सचे रिव्ह्यूज किती खरे -किती खोटे !

हिंदी फिल्म्सचे रिव्ह्यूज किती खरे -किती खोटे !
X

गेल्या ५ ते १० वर्षांमध्ये बॉलिवूड, इथले चित्रपट ,यशाच्या व्याख्या , स्टार्सची खरी -खोटी लोकप्रियता प्रचंड प्रमाणात बदलले आहेत . बहुतेक कुटुंबांमध्ये अगदी अलीकडेपर्यंत एखादा चित्रपट पाहावा किंवा नाही हे चित्रपट समीक्षकांनी दिलेल्या समीक्षेनुसार ठरत असे . चित्रपटाला किती स्टार्स मिळाले यावर त्याचा निकष ठरत नसे . कथा ,दिग्दर्शन ,अभिनय , निर्मिती मूल्यं ,संगीत ,छायाचित्रण ,कोरियोग्राफी अशा सर्व बाबींवर तो चित्रपट पाहावा किंवा नाही हे ठरत असे .. आता देशात प्रत्येक शहरांतील मोठ्या सर्वाधिक खपाच्या दैनिकांमध्ये , विविध चॅनल्सच्या एंटरटेनमेंटसाठी वाहून घेतलेल्या शो मध्ये या 'सर्वाधिक स्टार्स ' अर्थात 'तारांकित -सप्ततारांकित ' चित्रपट परीक्षण होतेच होते . अवास्तव -अवाजवी उत्तम चित्रपट अशी समीक्षा करणाऱ्याची मांदियाळी वाढती आहे .. हे दुर्देव आहे .. अतिशय रोखठोक -निर्भीड चित्रपट परीक्षण लिहिणारे समीक्षक सुदैवाने अजून बरेचसे आहेत , बाकी सगळा अंधार आहे ! सुमार -दर्जाहीन चित्रपटांनाही जेंव्हा ३ किंवा साडे तीन स्टार मिळतात तेव्हा लक्षात येतं हल्लीची चित्रपट समीक्षा कुणीकडे चालली आहे ! ती PR ([पब्लिक रिलेशन अर्थात प्रचारक ) धार्जिणी झाली आहे . समीक्षकांचे नाव आणि त्यांनी दिलेले (खोटे )स्टार्स दैनिकाच्या दर्शनी भागात झळकतात तेव्हा फिल्म निर्माता -दिग्दर्शक -कलाकार , प्रचारक सगळे 'आनंदाचे डोही -आनंद तरंग ' फील करतात हे वेगळं सांगायला नकोच !

अर्थात 'हम आपके है कौन ' शोले ' अशा गाजलेल्या सिनेमांची परीक्षणं सकारात्मक नव्हती हे ही तितकेच खरे ..समीक्षकांनी सडकून टीका केलेले असे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेत .. पण शेवटी त्यांची समीक्षा ही अभिजात्य होती , ती 'पेड ' नव्हती हे एक सत्यच आहे .. असो .. आता काळाने कात टाकलीये !

गेल्या लेखात आपण हा मुद्दा मांडला - टायगर ' ह्या स्पाय फिल्मच्या फ्रेंचायजीचा तिसरा भाग 'टायगर ३ ' रिलीज झाल्यांनतर तो सलमानच्या 'टॉप ग्रॉसर ' फिल्ममधे एक ठरला असा प्रचार सुरू झाला ,पण ऐन दिवाळीत टायगर रिलीज होऊनही थिएटर्स आतमध्ये रिकामे होते ! इकडे त्याच्या बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनने 'कोटीच्या कोटी उड्डाणे ' घेतली असा पद्धतशीर प्रचार सुरू होताच . याच प्रचाराचा पोस्ट रिलीज फंडा म्हणजे त्याला समीक्षकांनी कसे डोक्यावर घेतले आणि कसे किती स्टार्स दिलेत याविषयी प्रचारकाकडून कोड कौतुक ! टायगर -३ या एक्शन फिल्मचे त्यातल्या त्यात वैशिष्ट्य म्हणजे हॉलिवूडच्या पावलांवर पाऊल टाकत भन्नाटपणे चित्रित केलेलं स्टंट्स .. ज्यात सलमान आणि शाहरुखने आपले (उतार वयात ) कसब पणाला लावले आहे यात शंका नाही .. पण निर्विकार चेहऱ्याने वावरलेला सलमान आता पुनःश्च

टायगर ४मध्ये प्रेक्षकांना सामोरा जाणारेय !

आता तर फिल्म प्रचारकाकडून समीक्षकाला थेट विचारले जाते - फिल्म कशीही असो ! किती स्टार देणार ? ' असाच एक खराखुरा किस्सा गेल्या आठवड्यात घडला . सौमेंद्र पाढी या दिग्दर्शकाचा 'फरें ' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्याचे मीडिया स्क्रीनिंग ठेवण्यात आले . या स्क्रीनिंग पूर्वी एका समीक्षकाला प्रचारकाने 'समज ' दिली . किमान ३ स्टार तरी दिलेच पाहिजेत ..अन्यथा नेक्स्ट स्क्रीनिंगला बोलावण्यात येणार नाही ! सलमान खानची भाची अलिझ अग्निहोत्री या चित्रपटाची नवोदित नायिका आहे ..'भाई 'च्या भाचीसाठी 'इतना तो करना बनता ही है ! ' अशा अभिनिवेशात हे 'स्टार्स ' देण्यात यावे अशी प्रचारकांनी सरळसरळ मागणी होती ! आता बोला ! ज्याप्रमाणे चित्रपटाच्या एंडिंगला क्रेडिट्स 'श्रेयनामावली ' दिली जाते , त्यात सगळे तपशील देण्याचा एक प्रकारे अलिखित नियम असतो.. चित्रपट सुरु होण्यापूर्वी देखील 'कथा-घटना ' यांचा चित्रपटाशी कसलाही संबंध नाही , हा योगायोग मानावा ..हे आवश्यक ठरलेले आहे . तसेच हल्ली मीडिया स्क्रीनिंगपूर्वी 'एम्बार्गो ' असल्याशिवाय स्क्रीनिंग होत नाही ..!

जातिवंत पत्रकारांनी आताशा मीडिया स्क्रिनिंगचा धसका घेतला असल्यास नवल नाही !

त्यांची बुद्धी , चित्रपटाची योग्यता यावर चित्रपटाला स्टार देणारे फिल्म जर्नालिस्ट बहुधा 'इतिहासजमा ' होण्याच्या मार्गावर आहेत की काय ? जे पत्रकार प्रचारकांच्या मागण्या पूर्ण करत नाहीत , त्यांना 'व्हाय ' असा प्रश्न विचारतात त्यांना ब्लॅकलिस्टेड केले जाते हा त्यातील अधोरेखित भाग !

Updated : 1 Dec 2023 6:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top