Home > मॅक्स ब्लॉग्ज > #Restore_MaxMaharashtra : उपेक्षितांचा आवाज Youtube ने केला मुका !

#Restore_MaxMaharashtra : उपेक्षितांचा आवाज Youtube ने केला मुका !

Max Maharashtraचे youtube चॅनेल बंद करण्यात आल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. पण मॅक्स महाराष्ट्रचे चॅनल बंद होणे याचा अर्थ काय आहे, याबाबतच्या भावना व्यक्त केल्या आहेत सागर गोतपागर यांनी...

#Restore_MaxMaharashtra  : उपेक्षितांचा आवाज Youtube  ने केला मुका !
X

मुख्य प्रवाहातील माध्यमे जेंव्हा अभिनेत्रींच्या अंतर्वस्त्रांच्या किंमती मोजण्यात मश्गुल होती, त्याचवेळी शेतमालाच्या पडलेल्या किंमतीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंच्या ठिणग्या बनून सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे धाडस करणारे, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कामाचा जनतेच्या न्यायालयासमोर पंचनामा करणारे, सावकारीमुळे पिचलेल्या जनतेच्या गळ्यातील फास काढण्याचे धाडस करणारे, पुरोगामित्वाच्या सुंदर पॅकिंगखाली दडलेली अस्पृश्यतेची वळवळणारी पिलावळ राज्यासमोर आणणारे, स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध बिनधास्त आवाज उठवणारे, ग्रामीण आदिवासी भागात बाळंत होण्यासाठी झोळीतून रक्ताचा ओघळ सांडत रुग्णालयाकडे न्यावे लागलेल्या बाईची व्यथा देशासमोर मांडणारे, निवडणुकीनंतर चुरगळून फेकलेली राजकीय आश्वासने जनतेच्या जाहीरनाम्यातून जनतेचा आवाज बनून राज्यकर्त्यांना त्याचा जाब विचारण्याचे धाडस करणारे, जनतेचे सेवक ठरलेले मॅक्स महाराष्ट्रचे चॅनल YouTube ने बंद केले आहे.

एका दलित मुलाला मारहाण करणारी बातमी २०१८ मध्ये दाखवली म्हणून You Tube ने ही कारवाई केली आहे. उपेक्षितांची वाचा बनलेल्या या चॅनलची वाचाच YouTube ने बंद केली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या या माध्यमाला पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी YouTube ला जाब विचारण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडायला हवी. हे जर झाले नाही तर लेखण्या, बुम,कॅमेरे सेटल होण्याच्या काळात रिस्क घेऊन सर्वसामान्यांचा आवाज कोण बनणार?

Updated : 7 Sep 2022 11:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top