Home > Top News > स्वामी अग्निवेश यांना समाजवादाची गोडी कशी लागली?

स्वामी अग्निवेश यांना समाजवादाची गोडी कशी लागली?

स्वामी अग्निवेश यांना समाजवादाची गोडी कशी लागली?
X

दयानंद सरस्वती गेल्यानंतर आर्य समाजाच्या अनुयायांमध्ये कार्यक्रम, विचार आणि धोरणांना घेऊन दोन गट निर्माण झाले होते. परंपरा आणि प्रागतिक मूल्ये तसेच मांसाहार शाकाहार, आधुनिक इंग्रजी शिक्षण आणि पारंपरिक गुरुकुल पद्धत अशा मुद्यांना घेवून दोन्ही प्रवाहांनी वेगवेगळ्या मार्गांनी स्वामी दयानंद यांचा विचार विकसित केला आणि वाढवला.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आर्य समाजाची पार्श्वभूमी असलेली काही मंडळी समाजवादाच्या प्रभावाखाली आली. त्यातून हिंदू तत्वज्ञान आणि समाजवाद यांचा संयोग करत 'हिंदू साम्यवाद' विकसित झाला. त्यालाच काहींनी 'वैदिक सोशालिझम' असेही म्हटले. हिंदू साम्यवाद मंडळ, वैदिक समता संघ अशाही संस्था आणि संघटना काढल्या होत्या.

काही लोकांनी 'महर्षी कार्ल मार्क्स' असेही ग्रंथ लिहिले. आर्य समाजातील प्रागतिक पक्षाच्या महाराजांचे / स्वामींचे नावे ही इंटरेस्टिंग होते. उदा. समतानंद स्वामी. अशा पार्श्वभूमीतून स्वामी अग्निवेश आलेले असल्यामुळे ते सातत्याने मानवी हक्क, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समुहांच्या हक्कांच्या बाजूने बोलत असत.

(सदर फेसबुक पोस्ट देवकुमार अहिरे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे)

Updated : 12 Sep 2020 4:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top