Home > Top News > उर्दू भाषेतून आलेले ‘हे’ शब्द तुम्ही दररोज कसे बोलतात?

उर्दू भाषेतून आलेले ‘हे’ शब्द तुम्ही दररोज कसे बोलतात?

उर्दू भाषेतून आलेले ‘हे’ शब्द तुम्ही दररोज कसे बोलतात?
X

अनेक वर्षांपूर्वी उर्दू शायरी वाचायचा नाद लागला होता. विक्रीकर विभागातील संजय खोब्रागडे, डॉ. बेले, किरण नांदेडकर यांच्यासारख्या मित्रांमुळे तो वाढीला लागला होता. त्यावेळेस उर्दूतील अनेक कठीण शब्द कळत नसल्यामुळे अडचण व्हायला लागली, म्हणून उर्दूच्या शब्दकोशाचा वापर सुरु केला होता. आपल्या रोजच्या वापरातील अनेक मराठी आणि हिंदी शब्दांचे मूळ हे उर्दूच नव्हे तर चक्क पर्शिअन किंवा अरेबिक आहे. हे पाहून त्यावेळेस आश्चर्य वाटले होते.

भारतावर शेकडो वर्षे मुघल राजवट असल्याचा हा परिणाम आहे हे स्पष्टच आहे. अशा मूळ पर्शिअन किंवा अरेबिक मूळ असलेल्या आणि रोजच्या वापरात असलेल्या मराठी आणि हिंदी शब्दांची तेंव्हा सहज एक यादी केली होती. ती खाली दिली आहे.

भाषांवर राज्यकर्त्यांचा कसा परिणाम होतो आणि वेगवेगळ्या भाषिक समुदायांच्या एकत्र राहण्यामुळे भाषा कशा समृद्ध होत जातात. ते अशा छोट्या-छोट्या गोष्टींतून समजते. हाच परिणाम खाद्यसंस्कृती, गायन, वादन, नृत्यकला, चित्रकला, शिल्पकला, चित्रपट, नाट्यकला इत्यादी सर्व गोष्टींवरच होत असतो आणि यातूनच संमिश्र संस्कृती आकारास येत असते.

उदाहरण घ्यायचे झाले तर तंदुरी चिकन, बिर्याणी, कबाब, दम आलू, कोफ्ता करी, सरबत, मोघलाई पदार्थ हे खाद्यपदार्थ, कव्वाली, गझल, शायरी, सुफी संगीत इत्यादी मुस्लिम संस्कृतीतील प्रकार, किंवा केक, ब्रेड, बिस्किट्स, सॉसेस हे पदार्थ, गिटार, पियानो ही वाद्ये, ऑर्केस्ट्रा, रॉक अँड रोल, जॅझ, "हॅप्पी बर्थडे" केक कापून साजरा करणे, ३१ डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करणे हे पाश्चात्य ख्रिस्ती संस्कृतीचे प्रकार आता भारतीय संस्कृतीचाच भाग झाले आहेत. भाषा आणि संस्कृती त्यांचे विच्छेदन करण्याची इच्छा होऊही नये, पण ती झाली तरी असे विच्छेदन सोपे नसते.

पर्शिअन मूळ असलेले शब्द

बस -Sufficient (मराठी-बस)

चारा – Cure, help (हिंदी - उदा. कोई चारा नही)

चादर – sheet (मराठी- चादर)

चाकू – Knife

चेहरा – Face

चीज– thing (चीजवस्तू)

चैन – solace (मराठी- चैन पडत नाही)

खुश -Happy

खून – Blood, Murder

खस्ता – Wounded ( मराठी– खस्ता खाणे)

दारू – Medicine, Hindi- दवा दारू

दर्या – Sea

दिलासा – Consolation

रंग – Colour

रवाना – Despatch

रोज– Daily

रेशम – Silk (रेशमी)

जबरदस्त – Vigorously ( मराठी– जबरदस्त)

झोर – Strength ( मराठी– जोर)

झर– Gold (मराठी -जर)

सदाह – Simple (मराठी-साधं)

सुस्त – Lazy

शहर – City

काबू – Power, possession, hold

(मराठी – काबूत ठेवणे, काबू करणे)

कागज – Paper (कागद)

कमर – Waist ( मराठी– कंबर, Hindi-कमर)

किनारा– Shore, bank

कोफ्त – Gilding (Used in cuisine कोफ्ता करी)

गुजारा – Subsistence, living (Marathi-गुजराण, हिंदी-गुजारा)

नाजुक – Delicate (मराठी -नाजुक)

नर्म– Smooth (मराठी-नरम)

अरेबिक मूळ असलेले शब्द

बाब – Topic (मराठी - बाब, बाबतीत)

बारीक – Slender ( मराठी- बारीक )

बरकत – Prosperity ( मराठी- बरकत )

हिकमत– Wisdom, device, (हिकमती)

खास – Special (खास)

खराब – Spoiled, ruined

खुमार – Intoxication (हिंदी-खुमार)

खैर – Welfare (मराठी- खैर नाही)

सबब - Cause (मराठी – सबब- कारण)

साहिब – Master ( मराठी - साहेब)

साफ – Clean (मराठी- साफ)

सुहबत – Companionship (Marathi – सोबत)

सही - Right, genuine, pure

सलाह – Advice (Marathi – सल्ला)

जामिन – Guarantor (जामीन राहणे)

जरूर – Necessary (जरूर, जरुरी)

ताकत – Strength (ताकद)

तय्यार – Ready. (तयार)

तुफान – Storm

अजब – Wonderful (अजब वाटले)

गरज – Want, need

गफलत – Drowsiness, stupor(मराठी- गफलत - चूक या अर्थाने वापर)

गलिझ – Dirty, filthy (मराठी -गलिच्छ)

फाझील– Superfluous, Extra, (मराठी-फाजील- जादा)

फाइदा– Profit (मराठी -फायदा)

फीतना – Temptation (मराठी -फितवणे)

फुरसत – Leisure (मराठी हिंदी - फुरसत)

फर्क– Difference (मराठी- फरक)

फर्मान – Order (फर्मान काढणे)

काईदा – Rule, custom (मराठी-कायदा)

काईम – durable ( मराठी-कायम)

कर्झ – Loan (karj)

कैद – Arrest, detention

किमत – Price (मराठ(-किंमत)

काफूर – Camphor ( मराठी– कापूर)

कबूतर – Pigeon

कमाल – Miracle (कमाल झाली)

लिफाफा – Envelope

माल – Merchandise, riches (माल - वस्तू), (मुद्देमाल)

माह – Month. (माह-महिना)

मिहनत – Toil, labour (मराठी-मेहनत)

मदद – Help (मदत)

मरहम – Ointment (मराठी-मलम)

मशाल – Torch

मुश्किल– Difficult

मजबूत – Strong

मगरूर – Arrogant (मग्रूर)

मुकादम – Chief

मुलाइम – Soft (मुलायम)

मैदान – Ground

नखरा – Swagger, Coquetry

नकली – Artificial

नक्शा – Map (मराठी-नकाशा)

वहीम – Imagination (मराठी-वहीम -संशय)

वसूल– Collection

वगैर – Etc. (वगैरे)

हाईला– Terrible, Horrible (adjective) (आयला?)

हर – Every, all (हर प्रकारे, हर एक)

हिम्मत - Courage (मराठी- हिंमत)

Updated : 18 Sep 2020 5:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top