Home > मॅक्स ब्लॉग्ज > राहुल देशातील समस्त स्त्रियांना प्रेमाने जिंकतोय – डॉ. विनय काटे

राहुल देशातील समस्त स्त्रियांना प्रेमाने जिंकतोय – डॉ. विनय काटे

भारत जोडो यात्रा सुरू होऊन जवळपास १५ दिवस झालेत. अनेकजण राहुल गांधी यांना या पदयात्रे मध्ये पाठिंबा देताना पहायला मिळत आहेत. यात राहुल गांधी सोबत अनेक महिला यात्रेकरूंचे फोटो व्हायरल होत आहेत. या मागे नेमकं काय आहे जाणू घेण्यासाठी वाचा डॉ. विनय काटे यांचा लेख...

राहुल देशातील समस्त स्त्रियांना प्रेमाने जिंकतोय – डॉ. विनय काटे
X

तामिळनाडूतील कन्याकुमारी येथुन काँग्रेसची भारत जोडो ही पदयात्रा निघाली आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, दिल्ली हरीयाणा, पंजाब आणि जम्मू अशा १२ राज्यांमधून ही पदयात्रा तब्बल १५० दिवस असणार आहे. ही यात्रा या १५० दिवसांत ३५७९ किमीचं अंतर कापणार आहे. सध्या ही पदयात्रा केरळमध्ये आहे. जिथे काँग्रेस नेते राहुल गांधींना प्रचंड प्रेम मिळताना दिसत आहे. अनेक नेते, सामान्य जनता त्यांच्या सोबत या पदयात्रेमध्ये सहभागी होत आहे.
ही यात्रा सुरू होऊन फक्त पंधरा दिवसच पुर्ण झाले आहेत. अजुनही ही यात्रा केरळ राज्यातच आपला पल्ला गाठण्यासाठी पुढे सरकतेय. अशात राहुल गांधीना भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत .स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉय पासून बेरोजगार असलेल्या पदवीधर तरूण तरुणीँपर्यंत शिवाय लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत सगळेच राहुल गांधी यांची प्रेमाने भेट घेत आहेत. त्यांच्या या भेटी दरम्यान महिला मोठ्या प्रमाणात आपल्याला पहायला मिळत आहेत. मग ती लहान मुलगी असो वा वयोवृध्द आज्जी! हे कसं काय घडतंय हे डॉ. विनय काटे यांनी आपल्या पोस्ट मधून सांगितलं आहे.

कुठल्याही वयाच्या स्त्रीला विविध स्पर्शातील आणि समोरच्या माणसाच्या नजरेतील भाव ओळखण्याचे निसर्गतः कौशल्य असते.

राहुल जेव्हा रस्त्याने चालतोय तेव्हा अगदी छोट्या बालिकांपासून, शाळकरी मुली, युवती, मध्यमवयीन आणि वयस्क स्त्रिया त्याच्याशी ज्या सहजतेने बोलतात, त्याचा हात हातात घेवून चालतात, त्याला आलिंगन देतात आणि आशिर्वाद देतात ते पाहणे खूप सुखद आहे. त्या समस्त स्त्रियांपैकी कुणाला त्याच्यात काका-मामा सारखा दिसत असावा, कुणाला मित्र, कुणाला भाऊ, कुणाला मुलगा दिसत असावा आणि कदाचित कुणाला तो स्वप्नातला राजकुमार वाटत असेल.
राहुलच्या चेहऱ्यावर दिसणारे निर्मळ प्रेम आणि हास्य त्याला लोकप्रियतेच्या वेगळ्याच शिखरावर घेवून जाईल. काँग्रेसचे आणि निवडणुकीचे जे काही व्हायचे ते होईल, पण राहुल देशातल्या 50% लोकसंख्येला म्हणजे समस्त स्त्रियांना प्रेमाने जिंकत आहे. याचे परिणाम खूप वेगळे दिसतील.


Updated : 21 Sep 2022 4:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top