Home > मॅक्स ब्लॉग्ज > राहुल गांधी यांचा लढा भाजपविरोधात नाही तर कुणाविरुध्द?याविषयी डॉ. बाळासाहेब पवार यांचे परखड विश्लेषण

राहुल गांधी यांचा लढा भाजपविरोधात नाही तर कुणाविरुध्द?याविषयी डॉ. बाळासाहेब पवार यांचे परखड विश्लेषण

राहुल गांधी यांची लढाई ही भाजपविरोधातील नाही तर नेमकी कुणाच्या विरोधात आहे? याविषयी डॉ. बाळासाहेब पवार यांचे परखड विश्लेषण

राहुल गांधी यांचा लढा भाजपविरोधात नाही तर कुणाविरुध्द?याविषयी डॉ. बाळासाहेब पवार यांचे परखड विश्लेषण
X

भारतीय लोकशाही (India Democracy) व्यवस्थेत अनेक वेगवान घडामोडी घडत आहेत. देशाचे राजकारण एकाच व्यक्तीभोवती केंद्रीत झाल्यास काय परिणाम होतात? याचा अनुभव भक्त नसलेली जागरुक मंडळी घेत आहेत. ज्या व्यक्तीचा स्वतःचा मेंदू दुसरा कुणी ताब्यात घेतला नाही आणि जो माणूस स्वतःचा मेंदू वापरतो, असा प्रत्येक माणूस देशात सुरु असलेल्या घटनांनी हादरून गेला आहे. मात्र देशातील लोकशाही वाचवण्यासाठी बुध्दीवादी लोक प्रयत्न करीत आहेत. त्यामध्येच आशेचा किरण दडलेला आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) भारतीय लोकशाहीला व्यक्तीपूजेच्या धोक्यापासून सावध राहण्याचा सल्ल्ला दिला होता. परंतु गेल्या दशकात प्रसारमाध्यमे व विशिष्ट प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून एक व्यक्ती महात्म्य इतके टोकाला पोहचले की, ती व्यक्ती म्हणजे देश आणि देश म्हणजे ती व्यक्ती असा प्रकार सुरु झाला. जेव्हा व्यक्तीला देश मानले जाते, तेव्हा साहजिक त्या व्यक्तीची भक्ती म्हणजे देशभक्ती व त्या व्यक्तीच्या विरोधात आवाज उठवणे म्हणजे देशद्रोह अशी परिस्थिती निर्माण केली जाते. त्यातच आता एका व्यक्तीची दहशत कशी व किती असावी याचे भयंकर चित्र निर्माण झाले आहे. ते का होऊ नये? एकाच व्यक्तीने देशातील सर्व घटनात्मक संस्थांवर ताबा मिळवला आहे. प्रसारमाध्यमे त्यांच्या मित्रांनी विकत घेतली आहेत.

लोकसभेत संपूर्ण बहुमत आहे. जे स्वपक्षात आहेत ते त्यांच्या वकृदृष्टीला घाबरतात. जर त्याला आपल्या बद्दल काही खटकलं तर आपले राजकारण संपले, ही दहशत आहे. त्याने काही बोलण्यापर्यंत समर्थनासाठी तुटून पडतात. कोणी टिका केली तर त्याला कोणत्याही पातळीवर जाऊन हल्ला करून मोकळे होत आपली भक्ती सिद्ध करतात. ही भक्ती सिद्ध करताना कसलीही नितिमत्ता नाही. शब्द व्यवहार तर अतीच घसरलेला. टिका करणाऱ्याला शरण न येणाऱ्याला कोणत्याही पातळीवर जाऊन अनेक यंत्रणांचा वापर करून कसे गप्प बसवता येईल? असा प्रयत्न करताना प्रसार माध्यमातून भयंकर हल्ला करून त्याला नमोहरण कसे करता येईल? हे सर्व सुरु असताना लोकशाही कुठे आहे? असे प्रश्न पडले तर समजा हिच लोकशाही आहे आणि हाच भारत आहे.

एक व्यक्तीची भक्ती म्हणजे देशभक्ती आहे. या सर्वात मोठा देशद्रोही तो आहे जो आमच्या नेत्याला विरोध करतो. भारतात व परदेशात जाऊन सुद्धा आपली मते ठामपणे मांडतो, असा एक माणूस नक्की देशद्रोही आहे. होय! तोच तो मोठा देशद्रोही आहे राहुल गांधी. (Rahul Gandhi Comment on Democracy) राहुल गांधी ना मोदी व शहा (PM Modi And Amit Shah) इतके का घाबरले? काही समजत नाही. विशेष म्हणजे राहुल गांधी (Rahul Gandhi) कोणत्याही भाजपा नेत्याबद्दल बोलत नाहीत तर या सर्व परिस्थितीला कारणीभूत ठरलेली भांडवलशाही त्यांनी लक्ष केली आहे.

न खाऊंगा न खाने दूँगा म्हणत मोदी सत्तेत आले. पण एका पाठोपाठ एक उद्योग विकत राहिले. मित्रांना वेगवेगळ्या देशात मोठ मोठे टेंडर मिळवून दिले. त्यासाठी लागणारा पैसा भारतीय बँक (Indian Bank), शेअर बाजार (Share Market), एल आय सी (LIC) यातून उपलब्ध करून दिला. वीस लाख कोटी रुपये एवढी रक्कम गैरमार्गाने वळवळ्याचा आरोप राहुल गांधी सातत्याने करत आहेत. ते काही केल्या घाबरत नाहीत. त्यांच्या परिवाराची ईडी (ED) ने तीन दिवस चौकशी केली. काश्मीरमधील भाषण काढून पोलीस घरी पाठवले. (Kashmir Speech of Rahul Gandhi)

राहुल गांधी यांच्या इंग्लंडच्या (Englad) भाषणावरून देशद्रोही ठरून माफी मागावी म्हणून संसद बंद पाडली आणि कामकाज होऊ दिले नाही. जेव्हा मला सभागृहात बोलायचं आहे, असा आग्रह धरला. तेव्हा कर्नाटकातील भाषणाची केस गुजरात मध्ये काढून तातडीने दोन वर्षाची शिक्षा केली व लोकसभा सदस्यत्व रद्द केले. हे इतक्या वेगात का केले गेले? पुन्हा राहुल गांधी तेच बोलले असते जे त्यांचे भाषण रेकॉर्ड वरून काढून टाकले. तेच मुद्दे मांडले असते म्हणून हा सर्व उपद्व्याप केला गेला.

खरे तर अदानी -मोदी (Adani Modi Relation) संबंधावर पंतप्रधानानी भूमिका मांडायला हवी होती. हा देश दिवाळखोरीत निघण्याचा आज पर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा त्यांच्या नावाभोवती फिरत आहे. पण ते सभागृहात बोलत नाही किंवा काही ठराविक लोक सोडता कोणी समर्थन करत नाही. अदानी व भाजप चा काय संबंध? भाजपा त्यांना का वाचवत आहे? गांधी मोदी वर थेट आरोप करत नाहीत मग भाजपा अदानींना वाचवण्याचे कारण काय आहे? असे अनेक प्रश्न आहेत.

पण अदानी हा मुद्दा गांधी सोडायला तयार नाहीत व या मुद्द्यावर उत्तर आपल्याकडे नाही. खरं तर भाजपा (BJP) खासदारांची परिस्थिती अतिशय केविलवाणी झाली आहे. पुढच्या बाकावरचे काय आदेश आहे त्या प्रमामे बोलतात. बाकी कोणीही काहीही बोलत नाही. त्यांच्यावर दबाव आहे की त्यांनाच काहीही बोलायचं नाही? हे काही समजत नाही. भाजपा पक्षांतर्गत दहशत व हुकूमशाही हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे .

या सर्व घटनामधून राहुल गांधी यांच्या आरोपांना पुष्टी मिळते. त्यांनी केलेले आरोप खरे आहेत, अशीच कृती सरकारकडून घडते आहे. राहुल गांधी यांनी आरोप केला होता सभागृहात आवाज दाबला जातो. माईक बंद केला जातो . हे ते इंग्लंड वरून आल्यानंतर लगेच सिद्ध झाले. ते जे बोलले नाही त्या वक्तव्याबद्दल माफी मागावी म्हणून कामकाज होऊ दिले नाही. जुनी केस काढून त्यांना शिक्षा केली व सदस्यत्व रद्द केले हे सर्व लपून होत नाही. तर जगातील अनेक राष्ट्रांनी या बाबत प्रतिक्रिया दिल्या. ही बाब जागतिक राजकारणात देशाची प्रतिमा मलीन करणारी असते. मोदींनी अनेक देशात सभा घेतल्या. देशाबद्दल अपमानास्पद बोलले. काँग्रेसवर (Congress) टिका केली.

जागतिक पातळीवर स्वतः ची प्रतिमा तयार केली त्या प्रतिमेला एक हुकूमशाही कडे झुकलेला नेता असा धक्क बसला आहे.मोदी कोणत्याच प्रश्नांच समाधानकारक उत्तर देत नाहीत. सभागृहात बोलले तर काँग्रेसच्या इतिहासाबद्दल बोलतात. एकदाही त्यांनी लोकसभेत देशाचे धोरण स्पस्ट करणारे मुद्दे मांडले नाहीत. तिथे ही प्रचारकी भाषण करतात. कधीही प्रसार माध्यमांना सामोरे जात नाहीत. सरकार सभागृह व जनतेला जबाबदार असते. मोदी कोणालाच जबबाबदार नाहीत. ना जनतेला ना सभागृहाला ना त्यांच्या पक्षाला. हे हुकूमशाहीचे द्योतक आहे. ही वाटचाल तशीच आहे.

कमजोर विरोधी पक्ष आणि राहुल गांधी ची पप्पू म्हणून केलेली इमेज याचा मोदी फायदा घेत आले. परंतु भारत जोडो यात्रेनंतर मात्र वातावरण बदलले. एकतर्फी चाललेल्या प्रचाराला ब्रेक लागला. गांधी दखल पात्र झाले. आज सर्व प्रसारमाध्यमांचा फोकस मोदीवरून गांधीकडे वळला आहे. त्यात ते स्वतःचा शब्द मागे घेण्यास माफी मागण्यास तयार नाहीत तर तुरुंगात जाण्यास तयार आहेत. ही भूमिका सातंत्र्य लढ्यासारखी आहे व आणीबाणी विरुद्ध लढलेल्या कार्यकर्त्या सारखी आहे. त्यांची भूमिका दुटप्पी नाही तर ठाम आहे. जर काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याचे अदानी यांच्याशी संबंध असतील किंवा ते या प्रकरणात असतील तर चोौकशी करा व तुरुंगात टाका अशी रोख ठोक भूमिका ते घेतात. ही भारतीय जनामाणसाला पटणारी भूमिका आहे. कारण भाजपाची भूमिका आपल्या कार्यकर्त्याने काहीही केले तरी त्याला क्लीन करण्याची आहे.

भाजपमध्ये प्रवेश केला की सर्व चौकश्या बंद होतात, अशी जाहीर भूमिका काही लोक घेतात तर विधानसभेत एक आमदाराने गुजरात वरून पावडर येते व माणूस धुऊन स्वच्छ होते असे वक्तव्य केले. हे पाहता राहुल गांधी कोणाचीच बाजू घेत नाहीत हे स्पष्ट होते. सत्तेचा कोणताही विचार न करता आपली भूमिका स्पष्ट असणे व त्यावर नेत्याने ठाम असणे, हे लोकशाहीला अपेक्षित असते. फक्त खोटा प्रचार, खोट्या घोषणा या लोकशाहीला समृद्ध करू शकत नाहीत. खोट्या व दुटप्पी राजकारण दीर्घकाल टिकतं नाही. परंतु ते देशाचे फार मोठे नुकसान करत असते.

राहुल गांधी आज त्या भूमिकेत आहेत व ते उपस्थित करत असलेल्या मोदी -अदानी या प्रकरणा बाबत मोदींकडे उत्तर नाही. हे उत्तर भाजपाने देणे कोणाला अपेक्षित नाही. कारण अदानी व मोदी हा व्यक्तिगत व्यवहार आहे. फार तर शहा त्यात असतील. परंतु भाजपाचे ठराविक लोक शक्यतो गुजरात लॉबी प्रतिवाद करत आहे तो संयुक्तिक नाही. तो विषय दुसरीकडे भरकटावणे असा प्रकार आहे. पण भाजपाने अदानीला वाचवण्याचा प्रयत्न करणे हेच धोकादायक आहे. घोटाळा झालाच आहे तर तो त्या व्यक्ती ला भोवला पाहिजे. परंतू तो एका मोठया राजकीय पक्षाने का अंगावर घ्यावा? हे समजत नाही. याच्या मागे पक्षांतर्गत हुकूमशाही पण कारणीभूत आहे. कोणीच कार्यकर्ता नेता पक्षाच्या व्यासपीठावर बोलू शकत नाही, ही अडचण आहे, असे प्रकरण राजीव गांधी बद्दल बोफोर्स बद्दल झाले होते. ते कधीच सिद्ध झाले नाही. पण ते काँग्रेसपेक्षा राजीव गांधींना जास्त भोवले.

अदानी प्रकरणात सुद्धा हे प्रकरण फक्त मोदी यांच्याभोवती फिरवण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. कारण असे मुद्देच कोणतेही नेतृत्व अडचणीत आणण्यास कारणीभूत ठरत असतात. यातून बाहेर पडणे अवघड होणार आहे. कारण राजीव गांधींना जसे पक्षातील नेत्यांनी एकटे सोडून दिले, तसेच मोदी यांच्याबद्दल घडू शकते. जर त्यांची थोडी दहशत कमी झाली व काही राज्यात पराभव झाला तर ते होऊ शकते. हे सर्व समोर ठेऊन राहुल गांधी फक्त मोदी वर हल्ला चढवत आहेत व तो अतिशय गंभीर स्वरूप धारण करत आहे. लोकशाही वाचवण्याचा मुद्दा मोदी यांच्याशी संबंधित आहे म्हणून लोकशाही संदर्भातील राहुल गांधींचे प्रश्नच मोदींना आहेत व त्यांनीच लोकशाही व्यवस्थेचा गळा दाबला आहे. हे भारत व जागतिक समुदायाल समजावण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत.

या प्रश्नाला दोन बाजू आहेत . भारताची लोकशाही टिकणे हे भाजप सहित सर्व पक्षांना गरजेचे आहे. हुकूमशाही भाजपाची असणार नाही ती एका व्यक्तीची असेल. त्यामुळे विरोधी पक्ष किती एक जुटीने हा लढा लढतो व मोदींना त्यांच्या भाजपामधून किती लोकशाही वादी लोक विरोध करतात यावर अवलंबून आहे. यात अडचण व एक आहे ती म्हणजे भाजपा व विरोधी पक्षावर असणारा तपास यंत्रणांचा दबाव. फक्त राहुल गांधी न घाबरता बोलत आहेत. इतर बोलायला लागतील व भाजपातून विरोधी सूर केव्हा निघतील ते फार महत्वाचे आहे .

Updated : 30 March 2023 5:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top