Home > मॅक्स ब्लॉग्ज > Pune City Challenges-3 : बेकायदा स्टॉलच्या माध्यमातून परप्रांतीयांची घुसखोरी, मराठी नव्हे हिंदी भाषिकांची पुण्याकडे वेगवान वाटचाल

Pune City Challenges-3 : बेकायदा स्टॉलच्या माध्यमातून परप्रांतीयांची घुसखोरी, मराठी नव्हे हिंदी भाषिकांची पुण्याकडे वेगवान वाटचाल

मुंबई जेवढी मराठी माणसांच्या हातातून गेली त्यापेक्षा पुणे मराठी माणसांच्या हातातून जाण्याचा वेग प्रचंड... महानगरापालिका निवडणुकांची तयारी जोरदार सुरु असताना पुणे शहरातील, परिसरातील बेकायदेशीर बाबींवर लक्ष वेधलंय राजेंद्र कोंढरे यांनी... मतदारांनो तुम्ही कुणाला, का आणि कशासाठी निवडूण द्यावे यासाठी हा वैचारिक समज देण्याचा प्रपंच... वाचा पुण्यापुढची आव्हाने - भाग ३

Pune City Challenges-3 : बेकायदा स्टॉलच्या माध्यमातून परप्रांतीयांची घुसखोरी, मराठी नव्हे हिंदी भाषिकांची पुण्याकडे वेगवान वाटचाल
X

Migration Issues in Pune पुणे शहर व उपनगरामध्ये फुटपाथ, रस्त्यावर, इमारतींच्या फ्रंट मार्जिनमध्ये बेकायदा हजारो पथाऱ्या, Street Vendors स्टॉल, फळ विक्रेत्यांचे टेम्पो Illegal Vendors in Pune या माध्यमातून सुमारे 1.5 लाख परप्रांतीयांची घुसखोरी, मराठी नव्हे हिंदी भाषिकांची पुण्याकडे वेगवान वाटचाल सुरू आहे. यात मराठी माणसांपेक्षा युपी बिहार राजस्थानी कलकत्ता इत्यादी राज्यातून आलेल्या लाखो परप्रांतीयांनी बेकायदा पान स्टॉल, पाणीपुरी, चायनीज, 15 रुपयात कॅन्सर विकणारे ज्युस स्टॉल, मेवाड आइसक्रीमवाले, कलकत्ता बेस फ्रुटवाले टेम्पो यांनी पुण्याला घेरले आहे.Pune Municipal Corporation महापालिकेचे, स्थानिक नेते, मंडळांचे कार्यकर्ते यांच्या दुर्लक्षाने Mumbai मुंबई जेवढी Marathi मराठी माणसांच्या हातातून गेली त्यापेक्षा पुणे मराठी माणसांच्या हातातून जाण्याचा वेग प्रचंड आहे.

नेहमीप्रमाणे पुणेकर सार काही हातातून गेल्यावर या विषयावर एखादा परिसंवाद नाहीतर छोटेसे उपोषण करतील. उदाहरण द्यायचे झाले तर पुणे शहर उपनगरात बार रेस्टॉरंट, हॉटेल्सच्या जागांवर युपी वाल्या भैयांनी पान स्टॉल टाकले आहेत. हॉटेल मालकाला दररोज 300/- भाडे, गुटखा विकत असेल तर पोलिसांना दर महिना, आजूबाजूचे गल्ली दादा यांना पाच पंचवीस फुकटची पान व सिगरेट देऊन हे लोक रोज किमान 100 ते 200 पान विकतात. 30/- रुपयाच्या पानात 15 रुपये मार्जिन करून दरमहा 60 हजार ते 1 लाख रुपये मिळवणारे पानवाले स्थिर झाले आहेत.

त्याच पद्धतीने इतर व्यावसायिक स्थिर झाले आहेत.

पेठांमधून पुणेकर हद्दपार ? Are Pune residents being driven out of the old city areas

हेच व्यावसायिक पुण्याच्या पेठांमध्ये भाड्याने फ्लॅट घेतात नंतर तोच विकत घेतात आणि मराठी माणसे हळूहळू उपनगरात गेलेली मागच्या काही वर्षातील उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसतील. याचे कारण हे व्यावसायिक दरमहा 50 हजाराच्या पुढे उत्पन्न मिळवतात आणि मराठी युवक 12 ते 25 हजार रुपयांच्या पगारी नोकरीत आहेत. फेरीवाला धोरण कायदा नुसार पुणे मनपा ने 2014 साली 23 हजार पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्यातील 12155 व्यावसायिकांची अधिकृत नोंद मनपा कडे आहे आणि उर्वरित 11 हजार व्यावसायिकांचे प्रमाणपत्र दिले आहेत. पण त्यातील काही टक्केच व्यावसायिक जागेवर व्यवसाय करत आहेत. गेले 10 वर्ष सर्वेक्षण करण्यात आलेले नाहीये दर 5 वर्षांनी सर्वेक्षण करणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. असे जवळपास 60 हजार पेक्षा जास्त अनधिकृत पथविक्रेते याशिवाय इमारतीच्या फ्रंट मार्जिनमध्ये फ्रंट मार्जिन एरियात जिथे धंदा करता येत नाही किंवा रस्ता रुंदीचा FSI घेऊनही बिल्डरांनी ताब्यात ठेवलेल्या पालिकेच्या ताब्यातील जागांवर सुमारे 50 हजार बेकायदा स्टॉल आहेत.

पुणे महापालिकेचे लगतच्या उपनगरातील ग्राम पंचायंतीचे दुर्लक्ष लक्षात घेता मराठी पुणेकर गणपती उत्सवापुरते व गावकरी उरुसापुरते अशी स्थिती होऊ नये. सन 2002 साली आम्ही बिबवेवाडी येथे सुरक्षित पुणे, मराठी पुणे या अभियानाची सुरुवात डॉ. कुमार सप्तर्षी, लेखक शिवाजीराव सावंत, कर्नल जयंतराव चितळे यांच्या उपस्थितीत करून त्याचे हजारो स्टिकर्स पुणे शहरात वाटले होते त्याची आज आठवण होते.

आजूबाजूचे अतिक्रमण बाबत तक्रारीसाठी पुणे महापालिकेकडे तक्रार करण्यासाठी

PMC Toll Free 1800-1030-222

PMC Contact No. 02025501000

व्हाट्सअॅप क्रमांक 96899 00002


राजेंद्र कोंढरे

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष

Updated : 29 Dec 2025 9:42 AM IST
author-thhumb

राजेंद्र कोंढरे

अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष


Next Story
Share it
Top