Home > मॅक्स ब्लॉग्ज > दारूबंदी ते दारूमुक्ती : नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरे

दारूबंदी ते दारूमुक्ती : नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरे

दारूतून होणारा हिंसाचार, कर्जबाजारीपणा, कुटुंबाची वाताहात, आजारीपणा आणि मृत्यू असे गंभीर प्रश्न असताना देखील दारूबंदी का फसते? चंद्रपूर दारूबंदी उठवल्यावर दारूबंदी असावी की नाही ? दारूमुळे होणाऱ्या सामाजिक हानीला कोण जबाबदार आहे? दारूचा प्रश्न, व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यसनमुक्ती अशा अनेक विषयांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या हेरंब कुलकर्णी आणि डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांच्याकडून...

दारूबंदी ते दारूमुक्ती : नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरे
X

चंद्रपूरची दारूबंदी उठवल्यावर एकूणच दारूच्या प्रश्नावर माध्यमात व समाजमाध्यमात खूपच चर्चा झाली. दारूबंदी कार्यकर्ते, दारूने उध्वस्त होणाऱ्या गरीबांच्या संसाराविषयी बोलत असतात. दारूतून होणारा हिंसाचार, कर्जबाजारीपणा,कुटुंबाची वाताहात, आजारीपणा व मृत्यू हे सारे मुद्दे न बोलता केवळ दारूबंदी फसते व व्यक्तिस्वातंत्र्य अशा मुद्यांवर चर्चा होत राहते. मुख्य प्रश्न गरीब कुटुंबाची होणारी वाताहात हा असतो पण हा मुद्दाच चर्चेला येत नाही. चंद्रपूर दारूबंदीनंतर महाराष्ट्रात अनेक आंदोलने उभी राहिली. यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी आंदोलन अतिशय आक्रमक व व्यापक आहे , त्यापाठोपाठ अहमदनगर,बुलढाणा जिल्ह्यातही आंदोलने लक्षणीय ठरली व अनेक गावात दारूबंदीची मागणी झाली. हे चैतन्य चंद्रपूर दारूबंदी आंदोलनाने निर्माण केले.

या चर्चेत एकूण दारूविक्री, त्यातील व्यवहार, अवैध दारू, दारूने होणारी सामाजिक हानी याविषयी फारसे वास्तव अनेकांना माहीत नसते. ते केवळ व्यक्तिस्वातंत्र्यावर बोलत राहतात.त्याचप्रमाणे परदेशात दारूने होणारे प्रचंड गुन्हे अपघात,मृत्यू याविषयी आपल्याकडे फारसे पोहोचले नाही. तेव्हा हे नेहमी उपस्थित होणारे मुद्दे एकत्र करून दारूबंदीविषयीचे सर्व गैरसमज यांना उत्तरे देण्याचा हेरंब कुलकर्णी आणि डॉ. मुक्ता पुणतांबेकर यांनी प्रयत्न केला आहे.


Updated : 20 Jun 2021 8:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top