प्रियांका गांधी एक सशक्त पर्याय
राहुल गांधी यांच्या राजकारणाबद्दल अजूनही अनेकांच्या मनात शंका आहेत. मात्र प्रियांका गांधी यांच्या राजकारणाबद्दल फारशी शंका घेतली जाता नाही. प्रियांका गांधी या काँग्रेसला पर्याय ठरू शकता का? वाचा प्रियदर्शिनी हिंगे यांनी केलेले विश्लेषण…
प्रियांका गांधी यांच्या विरोधात ४१ जिल्ह्यांमध्ये FIR नोंद करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे FIR का नोंदवले गेले आहेत? याचे कारण काय आहे? निवडणुकांमध्ये आपल्या आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी सर्वच पक्ष वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच आखतात. मध्य प्रदेशमध्ये भाजप सत्ताधारी तर काँग्रेस विरोधी पक्ष आहे. प्रियंका गांधी हे काँग्रेसमधील महत्वाचं नाव आहे. काँग्रेसमधुन प्रियांका गांधी यांचं नाव समोर का येतंय ? याला अनेक कारणं आहेत. पण यातील सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं प्रियांका गांधी भाजपला भिडतात त्या पद्धतीनं तितक्याच ताकतीने काँग्रेसमधील दुसरा कुणी नेता भिडताना दिसत नाही. त्यामुळेच उत्तर प्रदेश Uttar Pradesh किंवा मध्य प्रदेश Madhya Pradesh या दोन्हीही ठिकाणी प्रियांका गांधी ताकतीने विरोधकांवर तुटून पडतात. त्यांनी विरोधकांवर केलेल्या काही टिकांवर आक्षेप नोंदवलेला आहे.
त्यांनी एका tweet मध्ये आरोप केला होता की मध्यप्रदेशमध्ये पन्नास टक्के कमिशनवर असलेले सरकार आहे. भ्रष्टाचाराचा असा थेट आरोप त्यांनी भाजपवर केला होता. दरम्यान या टीकेनंतर भोपाळ पोलिसांनी प्रियांका गांधींना एक नोटीस पाठवलेली आहे. या व्यतिरिक्त त्यांच्यावर एक्केचाळीस जिल्ह्यांमध्ये FIRची नोंदवल्या गेलेल्या आहेत.
भाजपने प्रियांका गांधीचे आरोप फेटाळले आहेत. याविरोधात एक्केचाळीस जिल्ह्यांमध्ये काँग्रेस नेत्यांविरोधात हे FIR नोंदवले गेलेले आहेत. आणि या FIRमध्ये प्रियांका गांधी यांच्याशिवाय माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचाही उल्लेख करण्यात आलेला आहे. या बरोबरीनं काँग्रेसचे नेते यादव तसंच काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश आणि शोभा ओझा यांच्याही नावाचा समावेश करण्यात आलेला आहे. या प्रकरणी पुरावे मागितले गेले. आणि मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी माणूस तेथे नाही संस्था बनावट असं म्हंटलेलं आहे. याच बरोबरीनं राज्याचे गृहमंत्री नरदम मिश्रा यांनी काँग्रेस नेत्यांच्या या आरोपाबाबत पुरावे मागितलेले आहेत.
काँग्रेसने आरोपांचे पुरावे द्यावे अन्यथा कारवाईला सामोरं जावं. असा पर्याय ठेवण्यात आलेला आहे.
बनावट पत्राच्या आधारे हे सगळे आरोप केले जात आहेत असंही सांगितलं याशिवाय मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री विश्वास सारंग यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करत काँग्रेसचे नेते खोटे आणि द्वेषाचं उघडं दुकान आहे असंही त्यांनी म्हटलंय आता हे सगळं जे झालं ते प्रियांका गांधी यांच्या एका पोष्टने झालेलं आहे तर ही पोष्ट काय होती हे आपण बघूया
प्रियांका गांधी यांनी वृत्तपत्रातील एक बातमी ट्वीट करून लिहिलं की मध्यप्रदेशातील कंत्राटदाराच्या संघटनेनं उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायालयांना पत्र लिहिलेलं आहे. त्यांनी मध्यप्रदेशात पन्नास टक्के कमीशन दिल्यानंतरच पैसे मिळत असल्याची तक्रार केलेली आहे. आणि या तक्रारीवरूनच कर्नाटकातील भ्रष्ट सरकार चाळीस टक्के कमीशन घेत असल्याचं काँग्रेस नेते म्हणतायेत. त्याचवेळी मध्य प्रदेश भाजपने स्वतःच सगळ्याचा विक्रम मोडलाय आणि या बरोबरीनं प्रियांका गांधी म्हटल्या आहेत की कर्नाटक जनतेने चाळीस टक्के कमिशन देऊन सरकार घालवले होते. आता मध्य प्रदेश मधील जनता पन्नास टक्के कमिशन देऊन भाजपचं सरकारची हकालपट्टी करेल.
एकंदरीतच आपण बघतोय की ज्या पद्धतीनं हल्लाबोल केलेला आहे. त्यासाठी मुख्यत्वे एका बातमीचा आधार घेतलेला आहे. या सगळ्याचे पडसाद जे आहेत ते महाराष्ट्रावरही उमटलेले आपल्याला दिसून येत आहेत. कसे? सकाळी पत्रकार परिषद घेणारे संजय राऊत त्यांनीही या विषयावर आपलं मत नोंदवलेलं आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस आक्रमक होताना आपल्याला दिसून येत होती. मात्र या सगळ्या बरोबरीनं स्वतः प्रियांका गांधी मैदानामध्ये उतरलेल्या होत्या.
सुरुवातीला आपण त्यांना टप्याटप्यानं पुढे येताना बघत होतो. आणि एका बाजूला राहुल गांधी असेल आणि दुसऱ्या बाजूला प्रियंका गांधी असेल. तर यांच्यापैकी प्रियंका गांधी aggressively राजकारणात येताना आपल्याला दिसून येतात. याबरोबर उत्तर प्रदेश मधील विधानसभा निवडणूकीच्या वेळेला प्रियांका गांधी यांनी महत्त्वपूर्ण रोल निभावला होता. तरीदेखील उत्तर प्रदेश या विधानसभा निवडणुकांमध्ये त्या मानानं काँग्रेसच्या जागा अतिशय कमी होत्या.
त्यामुळं एका बाजूला राहुल गांधी जितक्या आक्रमकपणे बोलत आहेत त्याच्याही खूप जास्त पटीनं प्रियंका गांधी राजकारण करताना दिसून येतात. महत्वाच्या अशा मुद्द्यांवर त्या थेटपणे भाष्य करतात. काँग्रेसची टीकाटिप्पणी ही केवळ एक विरोधी पक्ष म्हणूनच राहील का किंवा समाज माध्यमांवर एक विरोधी पक्ष आहे आणि तो काहीतरी टीकाटिप्पणी करतोय यावरच राहील का? की काँग्रेसचे काही जागा जिंकून आणेल?
केवळ केंद्रामध्ये नाही तर राज्यामध्येही आपल्याला हे असं नक्कीच म्हणता येऊ शकतं प्रियांका गांधी आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी हे मात्र लढाई लढवत आहेत. प्रियांका गांधी यांच्याविषयी खासकरून कौतुकाचे बोल आपल्याला ऐकायला मिळतायेत पण हे केवळ समाज माध्यमांवर आहेत का? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नक्की काय चाललंय आणि प्रियांका गांधीविषयी खरोखरीच त्यांना उत्साह वाटतोय का? काँग्रेसला प्रियांका पुढे नेऊ शकतात का? यावर मात्र अजूनही शंका आहे. मात्र प्रियांका गांधी या सशक्त पर्याय नक्की ठरू शकतात.priyanaka gandhi










