Home > News Update > सार्वजनिक विरुद्ध खाजगी“ असा ब्रेनवॉश कोण करतंय?

सार्वजनिक विरुद्ध खाजगी“ असा ब्रेनवॉश कोण करतंय?

सार्वजनिक विरुद्ध खाजगी“ असा ब्रेनवॉश कोण करतंय?
X

आयरसीटीसी” ची ८८ % मालकी सार्वजनीक असून देखील स्टॉक मार्केटवर देशी व परदेशी गुंतवणूकदारांची तो शेअर विकत घेण्यासाठी झुंबड का उडाली आहे ? खरं तर आयरसीटीसी (Indian Railway Catering and Tourism Corporation) ही भारतीय रेल्वेची उपकंपनी; ऑक्टोबर २०१९ मध्ये ३२२ रुपये प्रति शेअर या भावाने हिचा शेअर पब्लिक इश्श्यु करण्यात आला.

आज आयआरसीटीसीच्या शेअरचा भाव १८७२ रुपये म्हणजे सहापट झाला आहे. जे जे सार्वजनिक मालकीचे ते ते कुजलेले / भ्रष्टाचारी / राजकीय हस्तक्षेप असणारे अशी एकाच काळ्या रंगात सार्वजनिक क्षेत्राला रंगवणारे कोठे गेले ?

लक्षात घ्या...

शेअर मार्केट मध्ये गुतंवणूकदारांवर गुंतवणुकीचे कोणतेच दडपण नसते; कंपनीची नफा कमावण्याची क्षमता, व्यवस्थापनाची गुणवत्ता पारखूनच गुतंवणूकदार शेअर्समध्ये पैसे घालत असतात; सेबीच्या नियमानुसार सर्व वित्तीय आकडेवारी पारदर्शीपणे सार्वजनिक करावी लागते.

याचा अर्थ असा की “चांगली” कंपनी सार्वजनिक मालकीची असली तरी अगदी जागतिक भांडवलाला अस्पृश्य नाही; मग मीडियात एवढा गहजब का? तर सार्वजनिक मालकीविरुद्ध जनमत बनवणे हा खाजगी भांडवलाच्चा राजकीय अजेंडा आहे.

देशाच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या उपक्रमात निर्णायक सार्वजनिक मालकी ठेवणे, व्यवस्थापन प्रोफेशनल्सच्या हातात देणे, प्रोफेशनल्सना समाजाप्रती जबाबदेही बनवणे; सर्व आकडेवारी पारदर्शीपणे सार्वजनिक करणे. राजकीय हस्तक्षेप न करणे, यासाठी जनचळवळी उभ्या राहिल्या पाहिजेत.

बाकीच्यांचे जाऊ द्या मध्यमवर्गातील विचारी व संवेदनशील व्यक्तींनी तरी “सार्वजनिक विरुद्ध खाजगी“ असा स्वतःचा ब्रेनवॉश करून घ्यायला नकार द्यायला हवा!

Updated : 22 Feb 2020 6:25 AM GMT
Next Story
Share it
Top