Home > मॅक्स ब्लॉग्ज > भाजपवासी प्रज्ञा सातव...

भाजपवासी प्रज्ञा सातव...

कालकथित राजीव सातव यांची पत्नी. दोन वेळा विधानपरिषदेवर नियुक्ती. पक्षाचे उपाध्यक्षपद... काय नाही दिलं काँग्रेसने? मग अचानक भाजपमध्ये प्रवेश?

भाजपवासी प्रज्ञा सातव...
X

कालकथित राजीव सातव यांची पत्नी. दोन वेळा विधानपरिषदेवर नियुक्ती. पक्षाचे उपाध्यक्षपद... काय नाही दिलं काँग्रेसने? मग अचानक भाजपमध्ये प्रवेश?

व्यक्ती म्हणून प्रज्ञा सातव यांच्यावर राग नाही. काँग्रेस नेत्या म्हणून तर अजिबात नाही. आम्ही एकमेकांच्या परिचयाचे पण नाही. परंतु 'संविधान वाचवा' अशी आरोळी ठोकून जे काही कथानक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर (स्वतःला पुरोगामी म्हणविणाऱ्या) पक्षांनी रचले त्यात एक रोल सातव ताईंनादेखील दिला गेला होता.

भाजपला रोखायचे असेल तर हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे असं सगळे म्हणत होते. भोळेभाबडे लोक या कथानकाला बळी पडले आणि 'निर्भय' बनत त्यांनी कधी 'मशाल' पेटवली, कधी 'तुतारी' वाजवली तर कधी हातात 'हात' घेतले.

ज्यांच्यासाठी खिंड लढवली तेच नेते आता खिंड सोडून पळून गेले आहेत. धंगेकर, पडळकर, सातव, वाघ, घोसाळकर...भली मोठी लिस्ट आहे ही.

विषय आहे तो पोलिटिकल कॅरेक्टरचा.

काँग्रेसच्या नेत्यांकडे नैतिकता नाही. विचार नाही. गांधीवादाशी त्यांचा काही संबंध राहिला नाही. मंथन शिबिरांमध्ये हे नेते लोक नसतात. स्वतःच्या संस्था-संघटना मोठ्या करण्यासाठी ही सगळी मंडळी दिवसरात्र मेहनत करत आहेत.

लक्षात असू द्या. एकदा या सगळ्या सरंजामी लोंकांना घरी बसवा. फावल्या वेळेत त्यांना त्यांच्या चुका समजून घेता येतील, ग्राउंडवर काम करता येईल. वंचित समुदायाने आपलं स्वतःच राजकारण उभं करायला हवं, ते होतानाही दिसते आहे. संविधान वाचवायची जबाबदारी आपल्या एकट्याची नाही.

आपल्या हक्क-अधिकारांसाठी आपण काँग्रेसच्या काळातही भांडत आलो आणि आताही भांडतो आहोत. नागनाथ आणि सापनाथ एकच आहेत हे ओळखा.

सागर भालेराव

Updated : 18 Dec 2025 1:24 PM IST
Next Story
Share it
Top