Home > मॅक्स ब्लॉग्ज > पुतळ्यांच्या कथा – मुग्धा कर्णिक

पुतळ्यांच्या कथा – मुग्धा कर्णिक

पुतळ्यांवरुन होणारे वाद आणि राजकारण महाराष्ट्राला नवीन नाही. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात निर्माण झालेल्या एका पुतळ्याच्या वादावर मुग्धा कर्णिक यांनी एक लेख लिहिला होता. जागतिक पातळवरील पुतळ्यांचे राजकारण ते राज्यातील पुतळ्यांचे राजकारण यावर भाष्य करणारा लेख नक्की वाचा...

पुतळ्यांच्या कथा – मुग्धा कर्णिक
X

स्टार प्रवाह या वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत किरण माने हे विलास पाटील हे पात्र साकारत होते. मात्र त्यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांना मालिकेतून काढून टाकल्याचे सांगितले. तर किरण माने यांनी फेसबुक पोस्ट लिहून मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचे म्हटले. त्यानंतर सोशल मीडियावर किरण मानेंच्या समर्थनार्थ जोरदार ट्रेंड चालवला गेला. तर किरण मानेंनी भाजपाविरोधात भुमिका घेतल्यानेच त्यांना मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप करत हा सांस्कृतिक दहशतवाद आहे का?, असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर किरण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र त्या भेटीचा तपशील बाहेर आला नव्हता. याबरोबर आपण राजकीय भुमिका घेतल्यानेच आपल्याला मालिकेतून काढून टाकत असल्याचा आरोप किरण माने यांनी विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीतून केला.

किरण मानेंनी मालिकेतून काढून टाकल्यानंतर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता मालिकेतील किरण माने यांचे सहकलाकार असलेल्या कलाकारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपली भुमिका स्पष्ट केली. यामध्ये त्यांनी सांगितले की, किरण मानेंनी राजकीय भुमिका घेतल्याने त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले नाही. तर त्यांनी केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले, असल्याचे किरण मानेंच्या सहकलाकारांनी सांगितले.

मुलगी झाली हो मालिकेतील माऊ हे मुलीचे पात्र साकारणाऱ्या दिव्या पुगांवकर म्हणाली, किरण माने हे माऊच्या वडील विलास पाटील यांचे पात्र साकारत होते. मात्र कोणताही बाप आपल्या मुलीवर अशा प्रकारची शेरेबाजी करणार नाही, त्या प्रकारची शेरेबाजी केली जात होती, असे माऊ पात्र साकारणाऱ्या दिव्याने सांगितले.

याबरोबरच मालिकेत माऊच्या आईची भुमिका केलेल्या शर्वणी पिल्लई म्हणाल्या की, मुळात राजकीय भुमिका मांडली. त्यामुळे किरण माने यांना मालिकेतून काढून टाकले ही बातमी त्यांनी पसरवली आहे. ही मुळात खोटी आहे. तर त्यांच्या वर्तवणुकीमुळे किरण माने यांना मालिकेतून काढले आहे. तर किरण माने असं म्हणत आहेत की त्यांना याबाबत माहिती नव्हती, त्यांना प्रोडक्शन हाऊसने सांगितले नाही हा आरोपही खोटा आहे. त्यांना तीन वेळा वॉर्निंग देण्यात आली होती. मात्र त्यांच्या वर्तनात बदल न झाल्यानेच त्यांना मालिकेतून काढून टाकले आहे.

दरम्यान चॅनलने अधिकृत स्पष्टीकरण न दिल्याने सोशल मीडियावर चॅनलविरोधातही मोठ्या प्रमाणावर रोष व्यक्त केला जात होता. मालिकेचे चित्रीकरण सुरू असलेल्या गुळुंब ग्रामपंचायतने प्रॉडक्शन हाऊसला पत्र लिहीत चित्रीकरणाची परवानगी नाकारली होती. त्या पत्रावर सरपंचाची सही असल्याने ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. मात्र गुळूंब ग्रामपंचायतीला प्रोडक्शन हाऊसने स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांनी चित्रीकरणाला परवानगी दिलेली आहे. चित्रीकरण अजिबात थांबले नाही, अशी माहितीही यावेळी शर्वरी पिल्लई यांनी दिली.

या मालिकेत विलास पाटील यांच्या आईचे पात्र साकारणाऱ्या सविता मालपेकर म्हणाल्या, किरण माने यांनी मला वैयक्तिक त्रास दिला नाही. मात्र माझी सुन आणि नात यांच्यावर कायम टाँटींग करत असायचा. तसेच तो कायम म्हणायचा की, मी या मालिकेचा हिरो आहे. मी याला काढून टाकीन, मी त्याला काढून टाकीन, अशा प्रकारे किरण माने यांचे वर्तन असायचे. तर ही काढून टाकण्याची भाषा कशासाठी? असा सवाल केला. तर किरण माने याने शरद पवार यांची भेट घेतली असली तरी पवार साहेब आमच्यावर अन्याय करणार नाहीत, असे मत सविता मालपेकर यांनी व्यक्त केले. याबरोबरच आमची भुमिका आम्ही प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून शरद पवार यांच्यापर्यंत पोहचवली असल्याचेही त्यांनी सांगितले.

किरण माने यांनी सहकलाकारांशी केलेल्या गैरवर्तनामुळेच त्यांना मालिकेतून काढण्यात आल्याचे मत मालिकेच्या सेटवरील कलाकारांनी व्यक्त केले. मात्र किरण माने यांनी नवी पोस्ट लिहून त्यांच्यावर आरोप करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणात काय तोडगा निघणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.Mulagi Zali ho

Mulagi zali ho serial

Star pravah

Kiran mane Controversy

Actor kiran mane post

Reaction of Co artist of kiran mane

Updated : 16 Jan 2022 1:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top