PhD Fellowships : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे म्हणून शिकेल त्यास फेलोशिप द्या !
शिक्षणशत्रू अजितराव नालंदा विद्यापीठ हा आपला आदर्श त्या पासून धडा घ्या हे ज्ञान युग होय सरंजामशाई नव्हे. आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसंदर्भात लिहिलेला लेख
X
Education शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही हा Dr. Babasaheb Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे. बुद्धिमत्तेचा विकास हा मनुष्य अस्तित्वाचा अंतिम उद्देश आहे. हा बाबासाहेबांचा संदेश कृतीत उतरविण्यासाठी आंबेडकरवादी तरुण उच्च शिक्षण घेतात, नोकरी, शिष्यवृत्ती fellowship फेलोशिप ह्या बाबी दुय्यम आहेत तेव्हा शासन म्हणून जो शिकेल त्यास फेलोशिप द्या. घरातील पाच काय प्रत्येक व्यक्ती PhD पीएचडी करत असेल तर ते राष्ट्राच्या विकासासाठी कामी येणार आहे हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे. Higher education, research
राष्ट्र विकासासाठी उच्य शिक्षण,संशोधन, विज्ञानवादी समाजाची निर्मिती आवश्यक आहे. नुकतीच महाराष्ट्रच्या उपमुख्यमंत्री यांनी फेलोशिपसाठी घरातील पाच-पाच लोक phd करतात असे खोटे बेजबाबदारपण विधान करून ते शिक्षण शत्रू असल्याचे दाखवून दिले. BARTI बार्टीसारख्या संस्थेत phd करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यास सुरुवात २०१३ पासून झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठ गेल्याच्या शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही फेलोशिप सुरू करण्यात आली. २०१३ ते २०२२ पर्यंत बार्टी ने ३१०३ विद्यार्थ्यांना फेलोशिप आज पर्यंत दिली.
२०१३ साली २५ विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली. |
२०१४ - १०१ |
२०१५- २५ (csnrf) |
२०१५- २५ (jpnrf) |
२०१५- ५०(spnrf) |
२०१५- १०२(banrf) |
२०१६- १२५ |
२०१७- १०४ |
२०१८- ४०८ |
२०१९- २०० |
२०२०- २०० |
२०२१- १०९ |
२०२१- ८६१ |
२०२२- ७६३ |
एकूण ३१०३
स्रोत……बार्टी संकेतस्थळ
२०२३,२४, २५ ची आकडेवारी उपलब्ध नाही. आज पर्यंत ७७१ phd पूर्ण केली असून ७ पेटेंट घेण्यात आले आहेत.
दिशाभूल करणारी माहिती…..
मागील दहा वर्षात ३१०३ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करण्यात आली. सध्या ४२ हजार रुपये (पूर्वी ३७ हजार)एवढी फेलोशिप प्रती महिना दिली जाते. सध्या दराने विचार केला तर २०१३ प्रारंभी २५ विद्यार्थ्यांना प्रति महिन्यास केवळ नऊ लक्ष रु. तेवढी फेलोशिप खर्च होत होता. २०२२ साली प्रति महिना खर्च तीन कोटी २० लक्ष येवडा जुजबी येतो. अजित पवार यांनी तर विधानसभेत खोटी दिशाभूल करणारी महाराष्ट्र जनतेची दिशाभूल करणारी माहिती दिली. फेलोशिप वर अर्ध्या पेक्षा जास्त खेच होत असल्याचे चुकीचे विधान केले आहे जे सफसेल खोटे आहे.
शिक्षणशत्रू अजितराव जगाकडे बघा !
स्वित्झर्लंड,लक्झेंबर्ग Switzerland and Luxembourg सारख्या देशातील एकूण लोकसंख्येपैकी ३ टक्के phd धारक आहेत. America, England, Germany, Australia, Sweden, Denmark, and Ireland, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, डेन्मार्क, आयर्लंड यासारख्या देशातील एकूण लोकसंख्येच्या पैकी २ टक्के लोक phd करतात. भारतात हे प्रमाण ०.१ टक्के आहे. हे विचार करण्यासारखं आहे आणि त्यात अनुसूचित जाती हे प्रमाण अजून कमी आहे, आता कुठे sc प्रवर्गातील मुलं शिकत आहेत. त्यातही शासन पुन्हा आर्थिक कारणे दाखवून अडथळे आणत आहे.
पीएचडीसाठी केवळ सामाजिक उपयोगाचे संशोधनसाठी फेलोशिप द्यावी असा पण नावीन्यपुर्ण निकष मांडण्यात आला जो चुकीचा आहे. विज्ञान तंत्रज्ञानची सुद्धा समाजाच्या विकासात महत्वाची भूमिका आहे. तेव्हा कोणतेही क्षेत्र असो कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा, तंत्रज्ञान, संगीत पीएचडी करणाऱ्या शिकणाऱ्यांना फेलोशिप मिळाली पाहिजे.
नालंदा विद्यापीठ आदर्श घ्या !
प्राचीन बौद्ध विद्यापीठ नालंदा उभारण्यासाठी ५०० श्रीमंत व्यापाऱ्यांनी १० कोटी सुवर्ण मुद्रा दान देऊन जमीन विकत घेतली होती. सहा राजांनी आर्थिक मदत देऊन नालंदा विकसित केले. दैनिक खर्च भागविण्यासाठी ज्यास २०० गावचे उत्पन्न दान दिले जात असे ऐवढा प्रचंड खर्च करून जगभरातून १० हजार विद्यार्थांना निःशुल्क शिक्षण दिल्या जात असे म्हणून भारत हा प्राचीन काळी ज्ञानचा क्षेत्रात विश्वगुरु होता आर्थिक बाबतीत सोन्याची खाण होता.
रस्ते विकास म्हणजे लोककल्याण नव्हे !
अमुक महामार्ग तमुक महामार्ग केला तर मुंबई पुणे पाच तासात प्रवास होणार अशा गप्पा मंत्री मारतात. कमी वेळेत कामगारांना ग्रामीण भागातून शहरात नेऊन काय मजुरी करावयास लावणार आहात का? त्यांना शिक्षणापासून दूर ठेऊन मजुरांची संख्या वाढविण्याची षडयंत्र सरकार आखत आहे जे सुजाण समाजाने वेळेत ओळखले पाहिजे शिक्षण विरोधी सरकारी मानसिकतेच्या सत्ताधारी यांना सत्तेतून खाली आणले पाहिजे.
दीपक कदम
आंबेडकरी मिशन






