Home > Top News > पालघर घटनेच्या सीआयडी तपासात मॅक्समहाराष्ट्रचं वृत्तांकन आणि विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब!

पालघर घटनेच्या सीआयडी तपासात मॅक्समहाराष्ट्रचं वृत्तांकन आणि विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब!

पालघर घटनेच्या सीआयडी तपासात मॅक्समहाराष्ट्रचं वृत्तांकन आणि विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब!
X

पालघरमधील साधू हत्याकांडाची घटना अफवेतून घडलेली असल्याचं व त्यावर नाहक राजकारण झाल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. २२ एप्रिल २०२० रोजी मॅक्समहाराष्ट्र ने सदर हत्याकांडाबाबत सविस्तर वृत्त दिलं होतं. त्यातही अफवेचाच निष्कर्ष काढण्यात आलेला होता. सीआयडीच्या तपास अहवालाने एकप्रकारे मॅक्समहाराष्ट्रचं वृत्तांकन आणि विश्वासार्हतेवरच शिक्कामोर्तब केलं आहे.

तीन महिन्यांपूर्वी पालघरला झालेल्या हल्ल्यात २ साधू आणि १ ड्रायव्हर अशा तीन जणांचा खेदजनक मृत्यू झाला होता. याप्रकरणाचा सर्व तपास सीआयडीकडेे देण्यात आला होता.त्यानुसार त्यांनी कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. सदर घटना फक्त अफवेतून घडली असल्याचे सीआयडीच्या तपासातून निष्पन्न झाल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलीय.

तब्बल तीन दिवसांच्या विविधांगी चौकशीतून समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे पत्रकार राज असरोंडकर यांनी सदर घटनेचं अत्यंत विवेचनात्मक वृत्तांकन केलं होतं.‌ २२ एप्रिल रोजी प्रकाशित झालेल्या त्या लेखात असरोंडकर म्हणतात, आपल्या भागात चोरांच्या, दरोडेखोरांच्या टोळ्या आल्यायंत, ते माणसं पळवतात, मुलं पळवतात, किडन्या काढून विकतात या आणि इतर अनेक अफवांना डहाणू परिसरात गेल्या महिनाभरापासून ऊत आलाय. मॅक्समहाराष्ट्र ने डहाणू, सफाळे, सावटा, कामा, दाभोडी, बोईसर भागातील वेगवेगळ्या लोकांकडून, अफवा पसरलेल्या असल्याबाबत खात्री केलीय. अनेक दिवसांपासून या सगळ्या भागात लोक रात्रभर पहारे देतायंत. गस्त घालताहेत. जरा कुठे अनोळखी व्यक्तिंबाबत कानावर कुणकुण जरी पडली तरी मोटारसायकलवर लगेच संशयित ठिकाणी फेरी मारून येणं, असे प्रकार सुरू आहेत.‌ एकंदरीत गडचिंचलेची घटना लाॅकडाऊन काळातलं नैराश्य, अफवा आणि त्यातून आलेल्या भयाने पछाडलेल्या लोकांकडून घडल्याचं दिसतंय.

वाचा मॅक्समहाराष्ट्र चा २२ एप्रिलचा रिपोर्ट:

https://www.maxmaharashtra.com/max-reports/palghar-mob-lynching-and-its-chronology/82737/

त्यावेळी अनेक राजकीय पक्षांनी या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला होता. पण सीआयडीच्या तपासातून ही घटना केवळ अफवेतून घडली असल्याचं स्पष्ट झालं आहे. सीआयडीने या प्रकरणात ८०८ लोकांची सखोल चौकशी करून १५४ जणांना अटक केली आहे. आता पुढील कार्यवाही कोर्टात चालेल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केलं आहे.

Updated : 16 July 2020 6:35 PM GMT
Next Story
Share it
Top