Home > मॅक्स ब्लॉग्ज > संविधान प्रास्ताविका वाचनाचा उल्लेख विधिमंडळ कामकाजात नाही

संविधान प्रास्ताविका वाचनाचा उल्लेख विधिमंडळ कामकाजात नाही

विधिमंडळाचे कामकाज सुरु होत असताना संविधान प्रास्ताविक अभिवाचनाचा उल्लेख महाविकास आघाडी सरकारने का वगळला? असा प्रश्न माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी उपस्थित केला आहे.

संविधान प्रास्ताविका वाचनाचा उल्लेख विधिमंडळ कामकाजात नाही
X

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून विधिमंडळाचे सत्र सुरू होताना पहिल्या दिवशी संविधान प्रास्ताविका वाचन सुरू केले होते. नागपूर च्या हिवाळी अधिवेशन-2019 पासून .कार्यक्रम पत्रिकेत उल्लेख येत होता.अभिनंदनीय निर्णय होता, देशात पहिला.

मात्र, जुलै2021 च्या पावसाळी विधिमंडळ अधिवेशन च्या सत्राच्या कार्यक्रम पत्रिकेत संविधान प्रास्ताविका वाचनाचा उल्लेख नाही. वाचन होणार की नाही ? सुरू केलेला उपक्रम खंडित होणार असेल तर कसे? संविधानाची शपथ घेणाऱ्या सभागृहात लोकप्रतिनिधी प्रास्ताविका वाचन करणार नसतील तर त्यांची संविधानविरोधी भूमिका आहे असे म्हणायचे का?

आज समाजात जे प्रश्न निर्माण झाले ते अनेक मानव निर्मित आहेत आणि यास कायदेमंडळ आणि कार्यकारी यंत्रणेतील लोक जबाबदार आहेत कारण बरेचसे ते संविधान निष्ठअसल्याचे कृतीतून दिसत नाही. अधिकार असताना वेळेवर निर्णय घेतले जात नाही. राजकीय नेत्यांच्या खिचातांनीत चांगल्या व्यक्तीची आयोगावरकिंवा अन्य ठिकाणी प्रशासनात महत्वाच्या ठिकाणी नियुक्ती होत नाही. MPSC चा विषय असो की ScSt आयोग आणि अन्य अजून काही. इकडे वादविवादाचा, आरोप प्रत्यारोपाचा, राजकीय बैठकांचा खेळ चालला आहे आणि तिकडे आत्महत्या होऊ लागल्या आहेत. सोपा व सरळ संविधानिक आरक्षणाचा विषय पहा कसा गुंतागुंतीचा करून ठेवला आहे,सरकारने!

सरकारच्या निदर्शनास आणून दिल्यावरही लगेचच निर्णय होत नाहीत. सर्वसामान्य लोकांची , दुर्बल घटकांची, वंचितांची स्थिती तर फार बिकट आहे. सरकार कोणाचेही असो,चांगला बदल दिसत नाही. जनतेचा आवाज व्हावे लागेल. जनताच सत्ता देते आणि घालविले सुद्धा.

इ झेड खोब्रागडे।

संविधान फौंडेशन नागपूर

M -9923756900.

Updated : 5 July 2021 6:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top