लोकप्रिय पत्रकार Saurabh Dwivedi यांनी का दिला Lallantopमधून राजीनामा ?
सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे ती म्हणजे सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या सौरभ द्विवेदी यांनी लल्लनटॉपमधून राजीनामा दिल्याची...एका पत्रकाराची अशी फॅनफॉलोईंग थक्क करणारी आहे. हा राजीनामा काही दिवसांपूर्वी झालेल्या 'देव अस्तित्वात आहे का ?' या चर्चेशी निगडित आहे का? हा प्रश्न उपस्थित करत आपली वैचारिक पातळी उंचावणाऱ्या पत्रकारासाठी स्वाती छत्रे मायदेव यांचा लेख
X
Saurabh Dwivedi सौरभ द्विवेदीने Lallantop लल्लनटॉप खरंच सोडलं का आणि सोडलं असेल तर का सोडलं माहित नाही... God exists? देव अस्तित्वात आहे का या चर्चेशी हे निगडित असेल का? कुणास ठाऊक! पण माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला चक्क एकेक तासांची अर्थकारणावरची चर्चा अगदी रीवाईन्ड करत परत परत ऐकावी किंवा अगदी पूर्णच्या पूर्ण एपिसोड परत एकदा ऐकावावाटणं याला हा माणूस आणि याचा लल्लनटॉपवरील शो ‘अर्थात’ कारणीभूत आहे. इतका कठीण आणि जनरली बायकांना न आवडणारा विषय इतका प्रचंड सोपा आणि इंटरेस्टिंग करुन सांगणे! जबरदस्त! म्हणजे अर्थशास्त्रावरील एपिसोड बघतोय की थ्रीलर असं वाटायचं. तो आणि निखिल (निखिलने पण मागेच सोडलं लल्लनटॉप) यांच्यामुळे मला बिटकॉइन समजलं. हर्षद मेहता स्कॅम, केतन पारेख शेअर बाजार घोटाळा, श्रीलंका आर्थिक संकट, पाकिस्तानची ढासळलेली अर्थव्यवस्था, विजय मल्ल्या आणि नीरव मोदी बँकिंग फ्रॉड, महागाई आणि रेपो रेटचे गणित, सोन्याचे अर्थशास्त्र, रशिया-युक्रेन युद्धाचा बाजारावर परिणाम, हिंडनबर्ग-अदानी वाद, सामान्यांचे बजेट, जागतिक मंदी , जीएसटी आणि टॅक्स सिस्टीम असले बोजड अवजड आणि फिके टॉपिक्स माझ्या मेंदूच्या आत शिरू शकले हे यांच्यामुळेच. Harshad Mehta scam, Ketan Parekh stock market scam, Sri Lankan economic crisis, Pakistan's collapsing economy, Vijay Mallya and Nirav Modi banking frauds, dynamics of inflation and repo rates, economics of gold, impact of the Russia-Ukraine war on the market, Hindenburg-Adani controversy, common man's budget, global recession, GST and the tax system
जगभरात कुठे काय चालू आहे यातला इंटरेस्ट वाढण्याला सौरभचं ‘दुनियादारी’ सादर करण्याचं स्किल कारणीभूत आहे. फक्त बातमी न सांगता त्या जागतिक बातमीचा ऐतिहासिक संदर्भ सांगितल्यामुळे नीट कळतं. दुनियादारीचे कित्येक शोज मी योगायोगाने अपलोड झाल्याच्या दुसऱ्या मिनिटाला बघितले आहेत.
Guest in the Newsroom', 'Ghar Jaisi Baatein', and 'Bookwala गेस्ट इन द न्यूजरूम, घर जैसी बाते, बुकवाला यासारख्या शोज मधून त्याचं सर्वांगीण व्यक्तिमत्व, बोलण्याचं कसब आणि बुद्धिमत्ता यांचबरोबर एम्पथी देखील दिसून आली. स्वतः लिबरल असून देखील सर्व प्रकारच्या बातम्या जास्तीतजास्त न्युट्रल रहात पोहोचवणे हा खूप मोठा गुण आहे.
शुद्ध हिंदी आणि ग्रामीण बोलीभाषेचा लहेजा यांचा असा काही मिलाफ असतो त्याच्या बोलण्यात की ऐकणाऱ्याला अगदी आपल्याशीच गप्पा मारत बोलतोय असं वाटतं. कठिण शब्दांना फाटा देऊन लोकांशी संवाद साधणं ही त्याची खरी ताकद आहे.
निवडणुकांच्या काळात जो 'ग्राउंड रिपोर्ट' केला, तो पत्रकारितेचा एक नवा मापदंड आहे. गाडीतून फिरत, ढाब्यावर बसून, शेतात काम करणाऱ्या लोकांशी गप्पा मारत त्याने जी राजकीय नस ओळखली, ती मोठ्या स्टुडिओत बसलेल्या पत्रकारांना देखील जमलेली नव्हती.
लास्ट बट नॉट द लिस्ट, त्याच्या गोड खळ्या, मोठे डोळे, भारतीय पेहराव, जॅकेट्स, रोज रंगींबिरंगी नवीन नवीन उपरण्यांची (कट्टा) स्टाईल या गोष्टी तर खासच.
जरी त्याने लल्लनटॉप सोडलं असेल तरी तो लवकरच काहीतरी नवीन घेऊन येईल याची पूर्ण खात्री आहे मला. तेव्हा लल्लनटॉप किती बघितलं जाईल माहित नाही, पण सौरभचे चॅनल नक्कीच बघितले जाईल. कोण जाणे कदाचित राजकारणात उतरण्याचा प्लॅन देखील असू शकतो त्याचा पण माझ्या मते हे नाही होणार कारण त्याचा पिंड आपल्यापर्यंत कहाणी पोचवण्याचा आहे, रचण्याचा नसावा. कहाणी योग्यरीतीने पोहोचवणे हे खूप महत्त्वचे असतेच.
स्वाती छत्रे मायदेव






