Home > मॅक्स ब्लॉग्ज > मोन्टेलुकास्ट: असं औषध जे कोरोना विरोधात ठरु शकतं संजीवनी बुटी

मोन्टेलुकास्ट: असं औषध जे कोरोना विरोधात ठरु शकतं संजीवनी बुटी

मोन्टेलुकास्ट: असं औषध जे कोरोना विरोधात ठरु शकतं संजीवनी बुटी
X

सर्व जग आज कोरोना विषाणूच्या दहशतीत आहे. अगदी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत फक्त कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या हया कोविड-19 ह्याच आजाराची चर्चा आहे. असं बरेच विषाणूचे आजार दरवर्षी आपण पाहत असतो. पण त्याला कुणी घाबरत नाही. येथे घाबरायचे सोडाच संपूर्ण देश नव्हे तर हया विषाणू संसर्गाच्या भीतीपोटी संपूर्ण जग लॉकडाउन करण्याची मानवजातीवर वेळ आली आहे. असे काय खास आहे? बर हया विषाणूत?

ईतर विषाणूमुळे होणाऱ्या नॉर्मल फ्लू सारखाच तर हा आजार आहे. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी लक्षणे तर बाकी सर्व विषाणूच्या आजारासारखीच तर आहे. मग सर्व जग बंद करण्याची वेळ हया कोरोना विषाणूने मानवजातीवर का आणली? उत्तर अगदी सोपे आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे 4 -5 % लोकांना अचानक श्वास घ्यायला त्रास होतो व एक दोन दिवसात त्यांना व्हेंटिलेटर्रवर टाकण्याची वेळ येते.

त्यातील बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागतो. थोडक्यात कोरोना विषाणूच्या खूप वेगाने पसरण्याचा आणि लगेच काही लोकांना यमसदनी पाठवण्याच्या एक्सट्राऑर्डीनरी कॅपॅसिटी मुळे सर्व मानवजात कोरोना विषाणूला घाबरून आहे.

का बर कोरोना विषाणूच्या आजारामुळे ( कोविड -19 ) रोग्याला अचानक श्वास घ्यायला त्रास होतो? का एवढ्या मोठ्या प्रमाणात जीव जात आहेत? अशी बरेच प्रश्न आपल्याला पडले असतील. चला तर पाहू या ह्यात नक्की काय होत ते

कोविड -19 हया आजारात 80 % रूग्णांना काहीच लक्षणे नसतात, 15% रुग्णांना काही सौम्य ते मध्यम लक्षणे जसे सर्दी, खोकला, ताप, डोके दुखणे, अंग दुखणे, डोळे येणे, हागवण लागणे इत्यादी लक्षण आढळतात. जवळपास 14 दिवसात ते ह्यातून पूर्ण बरे पण होतात. पण 4-5 % रुग्णांना खूप जास्त ताप येतो व अचानक त्यांना श्वास घ्यायला त्रास सुरु होतो. ( ज्याला वैद्यकीय भाषेत Acute Respiratory Distress Syndrome असे म्हणतात ) ही सर्व प्रोसेस अगदी दोन तीन दिवसात झपाट्याने होते व रुग्णाला बाहेरून ऑक्सिजन द्यावा लागतो.

काही लोकांना तर कृत्रिम श्वासोच्छ्वास ( व्हेंटिलेटर) ठेवावे लागते. ह्यातील बरीच रुग्ण सध्या वैद्यकशास्त्रात ह्यावर 100% रामबाण उपाय नसल्यामुळे दगावतात.

वैद्यकशास्त्रानुसार असे अचानक श्वास घेण्यास त्रास होण्यामागचे कारण आहे "सायटोकाईन स्टॉर्म". काय आहे हे सायटोकाईन स्टॉर्म? नॉर्मली जेव्हा कोणाताही विषाणू/ जिवाणू आपल्यावर हल्ला करतो. तेव्हा रक्तात केमिकल ज्याला वैद्यकीय भाषेत सायटोकाईन म्हणतात. ते तयार होतात. व त्या विषाणू विरुद्ध अँटीबॉडी तयार करून त्या विषाणूचा नायनाट करतात. तुम्ही म्हणाल मग हे चांगलेच आहे की? हो हा आपल्या शरीराच्या immune response ( रोगप्रतिकार शक्तीचा ) एक भाग आहे व तो बाहेरील आक्रमण परतून लावण्यासाठी आवश्यक सुद्धा आहे. पण 4 - 5 % रुग्णांमध्ये हा immune response खूप जास्त प्रमाणात येतो व वादळासारखे सायटोकाइन्स शरीरात तयार होतात ज्याला आपण "सायटोकाईन स्टॉर्म" असे म्हणतो.

हया सायटोकाईन स्टॉर्ममुळे शरीरात खुप मोठया प्रमाणात inflammation (सूज) येते. कोविड 19 मध्ये ही सूज आपल्या फुफ्फुसाच्या पेशींवर ( Alveoli) येते व त्यामुळे रुग्णाला अचानक श्वास घ्यायला त्रास सुरु होतो.

त्याची ऑक्सिजन लेवल 88 % पेक्षा कमी व्हायला लागते व त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास द्यावा लागतो. यामध्ये बरेच रुग्ण ह्यात दगावतात. बऱ्याच वेळा हया सूज येण्याच्या प्रक्रियेमध्ये IL-1, IL- 6 आणि TNF- अल्फा हया नावाचे सायटोकाईन सहभागी असतात. अनेक कोविड 19 च्या रुग्णामध्ये फुफ्फुसात रक्ताच्या गाठीसुद्धा तयार होतात. शास्त्रज्ञांच्या मते हया रक्ताच्या गाठी निर्माण होण्यास वरील हेच सायटोकाईन जवाबदार आहेत.

आता आपल्याला प्रश्न पडला असेल ह्यावर उपाय काय? जगात सध्या कोरोना विषाणूला 100% मात देणारे एकही रामबाण औषध नाही त्यामुळेच जगभर लाखो लोकांचे जीव हया आजाराने घेतले आहे. सध्या जगात कोविड 19 हया आजाराच्या उपचारासाठी तीन प्रकारच्या औषधांवर काम चालू आहे.

1. Antiviral Drugs (विषाणूनाशक औषध ): सध्या आपल्याकडे कोरोना विषाणूला मारण्यासाठी 100% यशस्वी असे कोणतेही औषध नाही.

2. Immuno- Modulators: ज्यात

सायटोकाईन स्टॉर्म वर मात मिळवण्यासाठी काही औषधांचा वापर केला जात आहे. त्यात tocilizumab हे औषध वापरल्या जात आहे. पण हे औषध खूप महाग आहे व ते सहज उपलब्ध नाही.

3. Vaccines आणी Antibodies: ह्यावर काम चालू आहे पण सप्टेंबर 2020 च्या अगोदर कोणतीही vaccine येणे अवघड आहे.

तो पर्यंत आपण लाखो लोकांचे जीव तसेच जाऊ द्यायचे का? नाही नक्कीच नाही. "मोंन्टेलुकास्ट" हे औषध कोविड- 19 ला हरवण्यासाठी रामबाण ठरु शकते. ते कसे हे आपण पाहू या?

मोंन्टेलुकास्ट हे औषध सायटोकाईन IL-1 IL-6 व TNF- अल्फा हया फुफ्फुसांवर सूज आणणाऱ्या केमिकल्स ला रोखू( Inhibit ) शकते. त्यांना एका आवश्यक लेवल च्या वर येऊ देत नाही. त्यामुळे हया सायटोकाईन्समुळे येणारी फुफ्फुसावरची सूज थांबण्याची शक्ती आपल्याला ह्यात दिसते आहे. हया व्यतिरिक्त जगातील वेगवेगळ्या ठिकाणाचे अनेक डॉक्टर्रचे केस रिपोर्ट ज्यात त्यांनी मोंन्टेलुकास्ट वापरल्याने सायटोकाईन स्टॉर्मला आम्ही रोखू शकलो असे म्हटले आहे. ते इंटरनेटवर उपलब्ध आहे. हया व्यतिरिक्त कॅनडा देशात मॅकगील युनिव्हर्सिटी व लेडी डेव्हिस इन्स्टिटयूट हया दोन विद्यापीठांना "मोंन्टेलुकास्ट" हया औषधांचा कोविड 19 मध्ये कसा फायदा होतो. ह्याची clinical Trial करण्याची परवानगी मिळाली आहे.’’

मोंन्टेलुकास्ट हया औषधाचा कोविड 19 मुळे जाणारे जीव वाचण्यात फायदा होईल. हयाबद्दल येवडे पुरावे असताना भारताने ह्यात clinical trial का सुरु करू नये?

हे आपल्यासाठी काही नवे औषध नाही. आपण Severe Asthma ( दमा ), allergic Rhinitis मध्ये हे औषध खुप दिवसापासून वापरात आहोत. मुख्य म्हणजे जेनेरिक औषध आहे. त्यामुळे अगदी स्वस्त व सहज उपलब्ध.

ह्यापेक्षाही पुढे म्हणजे मोंन्टेलुकास्ट सायटोकाईन स्टॉर्म तर थांबवू शकतोच. हया व्यतिरिक्त मोंन्टेलुकास्ट हया सायटोकाईन स्टॉर्ममुळे होणाऱ्या फुफ्फुसातील रक्ताच्या गाठीपण रोखू शकतो.

आपल्या आजूबाजूला येवडे निरपराध कोविड-19 मुळे जीवाला मुक्त आहेत व सध्या आपल्याकडे हे मृत्यूतांडव थांबवण्याचा एकही शाश्वत उपाय नाही. तेव्हा मानवात अगदी safe अश्या मोंन्टेलुकास्ट ला वापरण्यास काय हरकत आहे.

यशस्वी झालो तर लाखो जीव वाचतील व जगाला कोविड -19 विरुद्ध लढण्यास एक नवी संजीवनी बुटी मिळेल. ह्यासाठी मी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धनजी, ICMR चे डॉ रमण गंगाखेडकर सर व महाराष्ट्रतील हया सबंधातील सर्व मंत्री व अधिकारी ह्यांना ई मेल केले आहे. ICMR ने तर मोंन्टेलुकास्टचा हया लढ्यात रोल राहू शकतो. असा रिप्लाय पण मला पाठवला व ह्यावर तुम्हीच एकदा प्रोजेक्ट आम्हाला पाठवा असे सांगितले.

आपल्या माध्यमातून मी केंद्र व राज्य सरकारला विनंती करेल की आपल्याकडील AIIMS, JIPMER, केईएम सारख्या जगविख्यात मेडिकल कॉलेजकडून आपण मोंन्टेलुकास्टवर भारतात clinical trial सुरु करावी. बघूया काय होते ते प्रयत्न करणे माझे काम आहे आणि मी ते नेहमी करत राहणार.

डॉ प्रशांत चक्करवार

मानसोपचार तज्ञ,

यवतमाळ, महाराष्ट्र

Updated : 16 Jun 2020 6:24 AM GMT
Next Story
Share it
Top