Home > मॅक्स ब्लॉग्ज > पावसाचं कमबॅक परंतु....

पावसाचं कमबॅक परंतु....

मान्सूनच्या पावसाचा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील जोर ओसरला असला तरी नाशिक व पुणे शहर, पश्चिम घाटमाथ्यावर पुढील ३ दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे. यंदाचा हा १९७२ च्या नंतरचा दुसरा मोठा पावसाचा खंड आहे, अशी माहिती माजी हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

पावसाचं कमबॅक परंतु....
X

मान्सूनच्या पावसाचा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील जोर ओसरला असला तरी नाशिक व पुणे शहर, पश्चिम घाटमाथ्यावर पुढील ३ दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे. यंदाचा हा १९७२ च्या नंतरचा दुसरा मोठा पावसाचा खंड आहे, अशी माहिती माजी हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली आहे.




हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसर आज उत्तर भारतासह पूर्व आणि मध्य भारतातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अपेक्षित श्रावण सरींची शक्यता २१ ऑगस्टपासून असताना त्याअगोदरच म्हणजे शनिवारपासून राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी विदर्भ-मराठवाड्यातील काही भागांत पावसाने सुमारे पंधरा दिवसांच्या खंडानंतर पावसाने हजेरी लावली. २५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या विविध भागांत पावसाची हजेरी राहील.

मराठवाड्यात चार जिल्ह्यांत हजेरी

छत्रपती संभाजीनगरात २२ दिवसांनंतर हलका पाऊस झाला. हिंगोलीत १२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, तर जालना जिल्ह्यात तीन आठवड्यानंतर पावसाने हजेरी लावली.


१०० वर्षांमधील सर्वांत कोरडा ऑगस्ट?

यंदाचा ऑगस्ट हा १०० वर्षांमधील सर्वांत कोरडा ऑगस्ट महिना होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यंदाच्या ऑगस्टमधील पर्जन्यमान सर्वांत कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तांदळापासून सोयाबीनपर्यंत उन्हाळ्यात घेण्यात येणाऱ्या पिकांचे उत्पादन कमी होऊन त्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

पूर्व विदर्भात दिलासादायक

पावसाने विदर्भात हजेरी लावली. नागपुरात शुक्रवारी सकाळपर्यंत ३८.७ मिमी, भंडाऱ्यात सर्वाधिक १२० मिमी, चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये १०२ मिमी, गडचिराेलीमध्ये गुरुवारी रात्री ४७ मिमी, वर्ध्यात रात्री ४४ व दिवसा ११ मिमी पावसाची नोंद झाली. अकाेला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यातही हलका पाऊस झाला.


१९-२५ ऑगस्ट या जिल्ह्यांत बसरणार

कोकण : मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची शक्यता.

विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार. बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधारची शक्यता.

मराठवाडा : हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांत १९ ऑगस्टला मुसळधार. लातूर, धाराशिव, बीड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र : नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात केवळ मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.



India Weather : सध्या देशाच्या काही भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. विशेषत: उत्तर भारतात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काही राज्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसर उत्तर भारतासह पूर्व आणि मध्य भारतातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.



महाराष्ट्रात पावसाचा तुटवडा असला तरी सध्या देशाच्या काही भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. विशेषत: उत्तर भारतात जोरदार पाऊस सुरु आहे.

मुसळधार पावसामुळं हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेती पिकांना देखील फटका बसला आहे. रस्ते वाहून गेले आहेत. तर काही ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तर काही जणांच्या मृत्यू देखील झाला आहे. दरम्यान, आजही उत्तराखडंसह हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागानं दिल्या आहेत.



दिल्लीत सकाळपासून पावसाला सुरुवात

राजधानी दिल्लीसह सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. पावसासोबत जोरदार वारे देखील वाहत आहेत. अचानक आलेल्या पाऊस आणि वादळामुळे दिल्लीचे वातावरणही आल्हाददायक झाले आहे. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत अत्यल्प पाऊस झाला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरण्या वाया जाण्याच्या धास्तीने शेतकरी हवालदिल झाला असतानाच संभाव्य पाणी टंचाईच्या संकटाने सरकारचीही झोप उडाली आहे. सध्या ३२९ गावे आणि १२७३ वाडय़ांना ३५१ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून त्यात वाढ होण्याची भीती शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त करण्यात आली. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर संभाव्य टंचाईचा तोंड देण्यासाठी आतापासूनच चारा, वैरण आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल आणि कृषी विभागाला दिले आहेत.

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ८९ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच महिन्यापर्यंत सरासरीच्या १२२.८ टक्के पाऊस झाला होता. मात्र गेल्या दोन-तीन आठवडय़ांपासून पाऊस झालेला नाही. त्यामुळे टंचाईचे सावट असल्याची चिंता मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. कृषी विभागाने केलेल्या सादरीकरणानुसार, राज्यात १३९.३५ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ९१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. केवळ सहा जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असून, १३ जिल्हयांत ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. १३ तालुक्यांत जेमतेम २५ते ५० टक्के पाऊस झाला आहे.

जलसाठा स्थिती..

नागपूर विभागातील धरणांमध्ये सध्या ७०.४७ टक्के, अमरावती ६६.५७ टक्के, छत्रपती संभाजी नगर ३१.६५ टक्के, नाशिक ५७.१६ टक्के, पुणे ६८.२३ टक्के आणि कोकण विभागातील धरणांमध्ये ८७.२५ टक्के अशी पाणी साठय़ाची स्थिती आहे. मराठवाडय़ात पाऊस नाही आणि धरणांमध्ये पाणीही नाही अशी परिस्थिती असून पिकांसाठी पाणी सोडण्याचा आग्रह शेतकरी धरत आहेत. त्यामुळे शिल्लक पाणी पिण्याला ठेवायचे की शेतीला द्यायचे असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर उभा राहिला आहे. काही दिवसांत पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र तो लांबल्यास पाण्याची तसेच चारा, वैरण याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे आतापासूनच नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.


पेरण्या वाया जाण्याची भीती

जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात राज्यात चांगला पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तर काही ठिकाणी पावसाने शेतात पाणी भरले होते. पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पेरण्या वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जलाशयांमधील साठाही आटू लागला आहे. सध्या राज्यातील मोठय़ा, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांत ६१.९० टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ८०.९० टक्के पाणी साठा होता, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार आणि सिक्कीममध्ये आज (19 ऑगस्ट) मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच उत्तराखंडसह हिमाच प्रदेशमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 5 दिवसांत उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 19 ते 22 ऑगस्ट पर्यंत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आंध्र प्रदेशसह तेलंगणा राज्यात देखील मुसळधार पाऊस पडू शकतो.




येत्या दोन दिवसात दक्षिण भारतातही पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसात दक्षिण भारतातही विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 21 आणि 22 ऑगस्ट रोजी हिमाचल प्रदेशसह उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.तर पुढील दोन दिवस तामिळनाडूमध्ये उबदार हवामान राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हिमाचल प्रदेशातील बियास, रावी आणि सतलज या तिन्ही प्रमुख नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळं हिमाचलमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं लोकांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळत आहे.


Updated : 19 Aug 2023 4:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top