Home > Election 2020 > मोदीजी आता शुभेच्छापत्रं पाठवा - राजदीप सरदेसाई

मोदीजी आता शुभेच्छापत्रं पाठवा - राजदीप सरदेसाई

मोदीजी आता शुभेच्छापत्रं पाठवा - राजदीप सरदेसाई
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात दुस-यांदा पाशवी बहुमत मिळवणारे पंतप्रधान ठरले असून त्यानी पंडित नेहरू आणि इंदिरा गाधी यांच्या पंक्तीत स्थान मिळवलंय. त्यामुळं ज्यानी त्यांना हा विजय मिळवण्यात मदत केली त्यांना शुभेच्छा पत्रे पाठवण्याची संधी मोदींनी घ्यायला हवी.

अमित शाह ---

भारतीय जनता पक्षाला काहीही करून बहुमत आणि सत्ता मिळावी, यासाठी पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याइतकी प्रबळ इच्छा दुस-या कुणाची नसावी. हे दर्शवणारी एक आकडेवारी म्हणजे अमित शाह यांनी गेल्या पाच वर्षांत पश्चिम बंगालची ९१ वेळा वारी केली. ज्या राज्यात भाजपाला यश मिळणं कठीण आहे, असं सर्वांनाच वाटत होतं. मात्र, जिंकण्याची प्रबळ इच्छा, अमर्याद संसाधनं आणि दरारा निर्माण करणारा कार्यकर्ता परिवार या जोरावर अमित शाह हे निवडणूकीतील प्रभावशाली व्यक्तिमत्व ठरलं. विरोधकानीच काय पण घटक पक्षांनीही जोरदार विरोध दर्शवला असतानाही शाह यांनी लवचिकता दाखवून बिहार आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात फाटलेली युती सांधण्यात बाजी मारली. या निवडणूकीत शाह यांनी साम दाम दंड भेदाचा अमर्याद वापर केला. बांग्लादेशी स्थलांतरीत लोकांबाबत घेतलेली भूमिका आणि भाजपाच्या सोशल मिडिया टीमला खोट्या बातम्या पसरवण्यासाठी दिलेलं बळ हा त्याचाच भाग.

कॉंग्रेस ---

नरेंद्र मोदी सरकारचा पराभव होऊ शकतो या परिस्थितीपासून ते देशात मोदी सुनामो येईल असे कुणाला वाटले होते का, खरं तर आता याबाबत आश्चर्य वाटण्याजोगी परिस्थीती आहे कारण २०१८ मध्ये देशात झालेल्या हिंदी भाषिक पट्ट्यातील तीन राज्यांतील विधानसभा निवडणूकांत भाजपला हार पत्करावी लागली होती. या निवडणूकांमधील विजयानं कॉंग्रेससारख्या सर्वात जून्या पक्षाला मोदी शाह आणि संघाच्या तंत्राला हरवण्याचा जादूई फॉर्म्युला मिळवून दिला होता. मात्र, या निवडणूकीमधून हे सिद्ध झालं की, त्यावेळी जनतेचा असलेला रोष हा स्थानिक सरकारांवर होता त्यांना नरेंद्र मोदी यांच्याबद्दल राग नव्हता. कॉंग्रेसला २०१९ मध्ये ही संधी होती की, स्वतःची प्रतिमा उंचवावी किंवा छोट्या पक्षांशी आघाडी करून मोदी फॅक्टर कमी करावा. पण त्यांनी अगदी शेवटी चुकीचा निर्णय घेतला. तर दुस-या बाजूला भाजपाच्या नेतृत्वासाठी ही धोक्याची घंटी होती. त्यांनी त्यानंतर जोरदार प्रयत्न करीत देशातील शेतक-यांच्या खात्यावर सहा हजार रूपये टाकले. तर दुर्बल घटकांसाठी आणि आर्थिक मागासांसाठी सरसकट आरक्षण जाहीर करून चित्र बदलून टाकलं. त्याचा त्यांना काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये फायदा झाला.

राहूल गांधी —

कॉंग्रेस अध्यक्ष यांनी या निवडणूकीत अतिशय जोरदार प्रचार केला, आक्रमक आणि कल्पक प्रचार केला मात्र त्याची एकसंघ रणनिती नव्हती. गांधी यांनी राफेल, नोटबंदी, जीएसटी या मुद्द्यांना हात घालुन लोकांसमोर जाण्याचा प्रयत्न केला. परंतू ते स्वतः याबाबत किती संमत होते हा प्रश्न आहे. न्याय ही स्लोगन घेऊन राहूल गांधी जनतेसमोर आले मात्र ही घोषणाच तकलादू ठरली. कॉंग्रेसचं लक्ष्य असलेल्या लोकांच्या मोठ्या समुहापर्यंत ही घोषणा पोहोचलीच नाही. हे या घोषणेच्य़ा कल्पकतेचं आणि संवादाचं अपयश म्हणावं लागेल. त्यामुळं राहूल यांची ही घोषणा म्हणजे एक ओझं म्हणून राहिली. त्यांना कॉंग्रेसचं अध्यक्षपद हे गाधी घराण्यातील जन्मामुळं मिळालंय. ते नामदार आहेत आणि आपण काम करणारे कामदार आहोत, असं मोदींनी बिंबवलं. त्यामुळं भारतातील तरूणांवर काम विरूद्ध घराणेशाही याचा खूप मोठा प्रभाव पडला.

प्रादेशिक विरोधक –

मोदीवादाला विरोध हे मायावती, ममता आणि चंद्राबाबू नायडू यांच्या विरोधाचं सुत्र राहिलं. मोदी यांना सत्तेवरून हटवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याच्या मांडलेल्या कल्पना अथवा इच्छेवर प्रत्येक पक्षाच्या वैयक्तिक इच्छा आणि अहंकारांनी मात केल्यानं १९७७ प्रमाणं देशाचत महाआघाडी आकाराला येवू शकली नाही. संघर्षातील विरोधास आणि संधीसाधू आघाड्या या जनतेचा विश्वास संपादन करू शकत नाहीत. जे मोदी यांना हुकुमशहा म्हणून हिणवत होते तेच लोक आपापल्या राज्यात हुकूमशाहीच करताना दिसत होते. त्यामुळं देशाला एक मजबुत नेता हवा आहे ही भावना इतकी रूजली की त्याने महाआघाडीला महा मिलावटीच्या पिंज-यात उभे केले.

मसुद अझर आणि पाक पुरस्कृत दहशतवाद --

मोदींचं राजकारण हे सातत्यानं शत्रु शोधणारं राजकारण आहे. जेव्हा त्यांनी २००२ मध्ये गुजरातमध्ये निवडणूक जिंकली तेव्हा गोध्रा रेल्वे हत्याकांडानंतर त्यांनी राष्ट्रविरोधी मुस्लिम आणि मिलन मुशरफ यांना लक्ष्य करीत विजय मिळवला. सतरा वर्षानंतर त्यांनी त्याच पद्धतीचा आधार घेत पुलवामा आणि बागलकोट हल्ल्यांचा आधार घेतला. घर मे घुसकर मारूंगा या त्यांनी केलेल्या विधानानं देशात राष्ट्रविरोधी शक्तींना त्यांनी दिलेल्या आव्हानाची लाट पसरली. त्यामुळं देशात लगेच त्यांची प्रतिमा एक मजबुत नेता अशी झाली आणि मग त्यांनी अध्यक्षीय पद्धतीनं निवडणूक जिंकली.

प्रसारमाध्यमं ---

मोदींनी एका टीव्ही एजन्सीला मुलाखत दिली होती ती देशभारातल्या सर्व वाहिन्यांवर दाखवली होती. अभिनेता अक्षय़ कुमार याच्याशी अराजकीय गप्पांची ही मुलाखत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मोदींनी निवडणूकीच्या शेवटच्या दिवशी केलेली केदारनाथची अध्यात्मिक यात्रा या दरम्यान प्रसारमाध्यमांनी केवळ मोदी दाखवत विरोधकांना जवळपास अदृश्यच केलं होतं. २०१९ ची निवडणूक ही देशातील सर्वात नियोजनबद्ध आखलेला मोठा इव्हेंट ठरवण्यात मोदींसह देशातील प्रसारमाध्यमांचं महत्त्वाचं योगदान आहे. टीव्ही प्रेक्षक अहवालानुसार एप्रिल महिन्यांत वाहिन्यांनी मोदींना ७२२ तास दाखवलं होतं तर राहूल गांधीना २५२ तास दाखवण्यात आलं होतं. एका टीव्ही चॅनलनं तर मतदानाच्या प्रत्येक दिवशी पंतप्रधानांची मुलाखत चालवली. बातम्या आणि प्रपोगंडा या दोन्ही पातळ्यांवर जोरदार काम केलं गेलं. फेसबुक आणि व्हॉटसअपच्या माध्यमातूनही अगदी पौराणिक अशी सुपरमॅन म्हणून मोदींची प्रतिमा केली गेली त्यात प्रसारमाध्यमांचाही वाटा आहे. या भव्य प्रतिमेच्या प्रेमात पडलेल्या कॅमे-यालाही मग स्थानिक प्रश्न दिसलेच नाहीत.

निवडणूक आयोग ---

देशात सत्ताधारी पक्षाकडून आचारसंहितेचं वारंवार उल्लंघन होत असताना निवडणूक आयोग स्वातंत्र्य आणि समानता या दोन्ही गोष्टी विसरून गेल्याचं दिसलं. याचं एक उदाहरण म्हणजे नमो टिव्ही.. मोदी यांचं उदात्तीकरण करणा-या आणि सातत्यानं प्रचार करणा-या या वाहिनीला आयोगानं कशी परवानगी दिली होती याची चौकशी होणं गरजेचं आहे. एवढंच काय पंतप्रधानांची केदारनाथ यात्रा सुद्धा राजकीय नैतिकतेला तिलांजली देणारी होती. एखाद्या नेत्यानं धार्मिक प्रतिकांचा वापर मतदानाच्या दिवशी करणं हे विशिष्ट मतदारांना प्रभावित करण्याचा केलेला ठाम प्रयत्न आहे.

सुप्त मतदार ---

सुप्त वाटणा-या भारतीय मतदारांनी अतिशय स्पष्ट, प्रचंडपणे आपला कौल दिलेला आहे. प्रचारादरम्यान उत्तर आणि पश्चिम भारतात आम्हाला मोदी मोदीच्या घोषणा ऐकु आल्या.मजबुत राष्ट्रवाद आणि धार्मिकता यांना साथ देत मतदारांनी आपला कौल दिलाय. पण भगव्या विचारांच्या हिदुत्ववादी मध्यमवर्गीय मतदारांशिवाय आम्हाला अस्थिर मतदारही आढळला. त्यांच्यापैकी अनेकजण काठावर होतं. त्याला मोदी यांचे दैवतीकरण आणि क्षमता मोदी हे स्थिर सरकार देणारे आणि त्यांचा गरजा समजून घेणारे हवे होते. जीडीपीचे आकडे कदाचित फुगवलेले असावेत, आर्थिक स्थिती ढासळळेली आहे. रोजगार हिरावला जाण्याची शक्यता आहे. पण जेव्हा उज्वला योजना, शौचालय निर्मीती आणि परवडणारी घरे यासोबत पाकिस्तानवर केलेला हल्ला हे देशभक्तीचं प्रतिक ठरल्यानं मोदी यांना पुन्हा संधी दिली पाहिजे, हा नवा मतदार आहे. जो धर्म, जात, वर्ग, ग्रामीण शहरं, लिंग या सगळ्यावर मात करत मतदान झाल्यानं मोठा विजय झालाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सेल्फी अँडिक्ट आहेत, त्यामुळं या विजयाबद्दल त्यांनी स्वतःला आणि आपल्या सहका-यांना शुभेच्छापत्र पाठवणं गरजेचं आहे. कारण बालाकोट, वाराणसी ते थेट केदारनाथापर्यंचत मोदी टीमने त्यांची प्रतिमा मोठी करण्याची एकही संधी सोडली नव्हती. पंतप्रधानांनी आपल्या प्रयत्नपूर्वक केलेली लार्जर दॅन लाईफ प्रतिमा विरोधकांना संपवून गेली. त्यामुळं राजकीय मार्केटींग, जनसंपर्क आणि धडाकेबाज प्रचार हे मोदींचं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळं आता मोदींनी सुटकेचा श्वास घेऊन आंब्याचा आस्वाद घ्यायला हरकत नाही.

Updated : 25 May 2019 4:09 PM GMT
Next Story
Share it
Top