Home > मॅक्स ब्लॉग्ज > मानसिक आरोग्य आता जगाची प्रायोरिटी...!!

मानसिक आरोग्य आता जगाची प्रायोरिटी...!!

मानसिक आरोग्य आता जगाची प्रायोरिटी...!!
X

शरीराने तंदुरुस्त असलेला माणूस मनानी व्याधीग्रस्त असू शकतो का? काय हे जागतिक स्तरावर मानसिक आरोग्याची स्थिती? कोरोनाचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला? वाचा युवराज पाटील यांचा लेख मानसिक आरोग्य आता जगाची प्रायोरिटी... मानसिक आरोग्य आता जगाची प्रायोरिटी...!!

शरीराने तंदुरुस्त असलेला माणूस... मनानी व्याधीग्रस्त होऊ शकतो. हे अजूनही प्रचंड मोठ्या लोकसंख्येला खरं वाटतं नाही... त्यातून अनेक कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्न निर्माण होतात. यावर फोकस होणं गरजेचं आहे.

आज जगातील 10 पैकी एका व्यक्तीला मानसिक आजार आहे. 2017 साली जगातील 792 मिलियन म्हणजे जवळ जवळ 79.2 कोटी लोकांना या आजाराने ग्रासले होते. आता कोरोनाच्या काळात ही संख्या अजून खूप मोठी झाली असेल.

एप्रिल 2018 मध्ये हॅनाथ रिची आणि मॅक्स रोझर यांना एक संशोधन पेपर प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी पुढच्या काळाची पावलं कळावीत म्हणून अनेक फायडींग समोर ठेवले आहेत. आज सर्वाधिक मोठा फटका विकसित देशाला बसत आहेत. पण भौतिक विकास होताना सोबत मानसिक विकार येतोय का? याचा विचार आता आपल्या सारख्या विकसनशील राष्ट्रांना करायचा आहे.

या संशोधनातले फायडींग मी सविस्तरपणे येत्या काळात नक्की मांडेन. ते आपल्यासाठी आय ओपनर असणार आहेत...!! मित्रहो... कोणत्याही गोष्टी डोक्यात चोवीस तास कॅरी करू नका. शक्य तेवढं लवकर डिटॅच व्हायला शिका...!!

युवराज पाटील यांच्या फेसबुक भिंतीवरून

Updated : 10 Oct 2020 6:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top