Home > मॅक्स ब्लॉग्ज > Max Maharashtra पर्यायी मीडियाचा पायोनियर - संजीव चांदोरकर, अर्थतज्ज्ञ

Max Maharashtra पर्यायी मीडियाचा पायोनियर - संजीव चांदोरकर, अर्थतज्ज्ञ

Max Maharashtra पर्यायी मीडियाचा पायोनियर - संजीव चांदोरकर, अर्थतज्ज्ञ
X

Republic Day India दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन आपण सर्वजण साजरा करत असतो.पण २०१६ सालातील प्रजासत्ताक दिन Ravindra Ambekar रवींद्र आंबेकर यांनी खऱ्या आणि वेगळ्या अर्थाने साजरा केला, Max Maharashtra “मॅक्स महाराष्ट्र” या वेब पोर्टलची स्थापना करून.. Role of Media in Indian Democracy कोणत्याही देशातील लोकशाही प्रणाली शाश्वत आणि खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक बनवण्यासाठी चौथा स्तंभ म्हणून मीडियाचे महत्त्व गेली अनेक दशके अनेकांनी अधोरेखित केले आहे..पण दुर्दैवाने जगातील सर्वात मोठ्या भारतातील लोकशाहीपासून सर्वात जुन्या अमेरिकन लोकशाहीपर्यंत, मीडियाने कणाहिनतेचे प्रदर्शन करून जनतेला धोका दिला आहे. अशावेळी गेल्या काही वर्षात घटनात्मक मूल्यांना आणि जनतेला बांधिलकी मानून पर्यायी मीडिया प्लॅटफॉर्म उभे करण्यास अनेक तरुणांनी पुढाकार घेतला. मॅक्स महाराष्ट्र ने तर त्यात “पायोनियर”ची भूमिका वठवली आहे. मुख्य प्रवाहातील मीडियाचे परंपरागत पोषणकर्ते असणारे शासन, कॉर्पोरेट क्षेत्र आणि जाहिरातदार, त्यांचा पर्दाफाश करू पाहणाऱ्या या पर्यायी प्रयोगांना टिकवण्यासाठी अत्यावश्यक असणारे वित्तीय स्त्रोत न पुरवणे अपेक्षित होते. अशा आव्हानात्मक परिस्थितीत हे व्यासपीठ दहा वर्षे विविध प्रयोग, उपक्रम राबवत चालवणे सोपे नव्हते. रवींद्र आंबेकर आणि त्यांच्या जिगरबाज तरुण सहकाऱ्यांनी, वेळ पडलीच तर स्वतःच्या खिशाला खार लावून घेत, ते आव्हान पेलले आहे.

आज २६ जानेवारी २०२६ रोजी मॅक्स महाराष्ट्रला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. भारताचा आणि महाराष्ट्राचा एक कन्सर्ड नागरिक म्हणून मी मॅक्स महाराष्ट्राला धन्यवाद देखील देऊ इच्छितो. या निमित्ताने रवींद्र आंबेकर आणि सर्व टीमचे मनापासून अभिनंदन आणि भविष्यकाळातील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.

संजीव चांदोरकर

अर्थतज्ज्ञ

२६ जानेवारी २०२६

Updated : 26 Jan 2026 12:16 PM IST
Next Story
Share it
Top