Manikarnika Ghat Varanasi demolition controversy : ऐतिहासिक वारशावर Modi सरकारचा बुलडोझर, खर्गेंची जोरदार टीका, स्थानिकांकडून निषेध
काशी विश्वनाथ कॉरिडोर प्रकल्पानंतरचा दुसरा मोठा प्रकल्प म्हणजे मणिकर्णिका घाटाचा पुनर्विकास...मोदी सरकार ऐतिहासिक वारसा पुसत लोकांच्या भावनेशी खेळतायेत का?
X
Manikarnika Ghat Varanasi demolition controversy वाराणसीतील मणिकर्णिका घाट तोडल्याप्रकरणी काँग्रेसची मोदी सरकारवर टीका आणि स्थानिकांकडून निषेध केला जात आहे. विकासाच्या नावावर ऐतिहासिक वारसा पुसण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याची टीका सर्वत्र होऊ लागली आहे.
वाराणसीतील प्राचीन आणि पवित्र मणिकर्णिका घाटावर सुशोभीकरण आणि पुनर्विकासाच्या नावाखाली विनाशकार्य सुरू असल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करत अनेक शतकांपासून असलेला जुना धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा नष्ट करण्याचा आरोप केला आहे. स्थानिक नागरिक आणि महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या वंशजांनीही या कारवाईचा विरोध करत निषेध व्यक्त केला आहे.
खर्गे यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये म्हटले आहे की,
.@narendramodi जी,
— Mallikarjun Kharge (@kharge) January 15, 2026
भोंडे सौंदर्यीकरण और व्यवसायीकरण के नाम पर आपने बनारस के मणिकर्णिका घाट में बुलडोज़र चलवाकर सदियों पुरानी धार्मिक, सांस्कृतिक और आध्यात्मिक विरासत को ध्वस्त कराने का काम किया है।
आप चाहतें हैं कि इतिहास की हर धरोहर को मिटाकर बस अपना नेम-प्लेट चिपका दिया… pic.twitter.com/A2yjf0UrYd
"भोंडे सुशोभीकरण आणि व्यवसायीकरणाच्या नावाखाली बनारसच्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवून अनेक शतकांपासून असलेला धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा नष्ट करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. तुम्हाला इतिहासातील प्रत्येक वारसा मिटवून फक्त स्वतःचे नेम-प्लेट चिकटवायचे आहे." त्यांनी गुप्त काळातील या घाटाचा उल्लेख करत अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या पुनरुद्धाराचा दाखला दिला आणि या प्राचीन वारशाला नष्ट करण्याचा गुन्हा असल्याचं म्हटलं आहे. खर्गे यांनी व्यावसायिक मित्रांना फायदा पोहोचवण्याच्या उद्देशाने हे सुरू असल्याचा आरोप केला आणि दोन प्रश्न उपस्थित केले.
पुनर्विकास, स्वच्छता और सुशोभीकरण वारसा जपूनही करता आला असता?
मणिकर्णिका घाट मध्ये असलेल्या शतकांपूर्वीच्या जुन्या मुर्त्यांवर कुऱ्हाड चालवत त्याना मलब्यात टाकण्यात आलं, त्यांना संग्रहालयात जपता आले असते ?
या घाटावर बुलडोझर चालवण्यात आल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात प्राचीन इमारती आणि मूर्ती नष्ट केल्या जात असल्याचे दिसत आहे. स्थानिकांनी याला वारसाला उद्धवस्त करण्याचे म्हटले असून, १३ जानेवारीला हे काम सुरू झाल्यापासून निषेध सुरू आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या वंशजांनीही या कारवाईला विरोध करत कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय हे केले गेल्याचे सांगितले. त्यांच्याशी संबंधित ट्रस्टनेही धार्मिक भावनांना ठेस पोहोचल्याचे म्हटले आहे. वाराणसी जिल्हा प्रशासनाने या आरोपांवर चौकशीचे आदेश दिले आहेत आणि कोणत्याही प्राचीन मूर्ती किंवा इमारतीला हानी पोहोचवली नसल्याचा दावा केला आहे.
दुसरीकडे, सरकारच्या बाजूने सांगितले जात आहे की, हे मणिकर्णिका घाटाच्या पुनर्विकास योजनेचा भाग आहे, ज्यात ग्रँड कॉरिडोर तयार करण्यासाठी हे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे सौंदर्यीकरण आणि आधुनिकीकरणासाठी आहे आणि अनेक शतकांचा वारसा जपण्यासाठी सर्व उपाय केले जात आहेत. तुम्ही दावा केला होता की “माँ गंगा ने बुलाया है” परंतु आज तुम्ही माँ गंगा को भुला दिया है। वाराणसीतील हे घाट जगातील प्राचीन शहर म्हणून ओळखले जाते, जे अध्यात्म, संस्कृती आणि शिक्षणाचे संगम आहे. दरवर्षी लाखो भाविक मोक्ष प्राप्तीसाठी येथे येतात.
हा वाद काशी विश्वनाथ कॉरिडोर प्रकल्पानंतरचा दुसरा मोठा मुद्दा आहे, ज्यातही मंदिरे आणि इमारती तोडण्यावरून टीका झाली होती. काँग्रेसने याला राजकीय रंग देत मोदी सरकारच्या धोरणांवर हल्ला चढवला आहे, तर भाजपने याला विकासाचे पाऊल म्हटले आहे. स्थानिकांनी सांगितले की, विकासाच्या नावाखाली धार्मिक स्थळांना दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.






