Home > मॅक्स ब्लॉग्ज > क्रांतिबा: पत्थरदिल राजा काळ्या गाढव कायद्याचा नांगर फिरवायला पेटलाय...

क्रांतिबा: पत्थरदिल राजा काळ्या गाढव कायद्याचा नांगर फिरवायला पेटलाय...

Mahatma Jyotiba Phule Birth Anniversary social Worker jaywant hire criticized modi government | क्रांतिबा: पत्थरदिल राजा काळ्या गाढव कायद्याचा नांगर फिरवायला पेटलाय...

क्रांतिबा: पत्थरदिल राजा काळ्या गाढव कायद्याचा नांगर फिरवायला पेटलाय...
X

समाजसुधारक जोतिबा फुले यांची जयंती त्यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते जयवंत हिरे यांनी शेतकरी कायद्याबाबत मोदी सरकारच्या भूमिकेवर शब्दरुपी आसूड ओढले आहेत…

क्रांतिबा;शेतकर्‍यांचा २१व्या शतकातला नेता तुझ्यासारखंच शेतकर्‍यांचं गार्‍हाणं राजाच्या कानावर घालायला दोन-चार महिने दिल्ली दरबारी ठाण मांडून राजाचं सिंहासन हालवतोय डगडगा. पण,राजहट्टापुढे शेकडो शेतकर्‍यांचा "बळीराजा" होऊनही राजा पत्थरदिल होऊन शेतकर्‍यांवर काळ्या गाढव कायद्याचा नांगर फिरवायच्याच हट्टाला पेटलाय धर्मांध होऊन.

शेतकरी तरी टीकैत होऊन लढतोय तरी......!

पण,हातावर पोट असलेल्या कष्टकर्‍यांचं काय?

असंघटीत-हातावर पोट असलेल्या,रोजंदारीवर असलेल्या कष्टकर्‍यांचं,भूमिहीन शेतमजुर-अल्पभूधारकांचं जगणं-मरणं तसं कुणाच्या खीजगणतीत कधी नव्हतंच.छोट्या छोट्या गाळ्यांमध्ये,उद्योगांमध्ये अल्पवेतनात रक्त घाम एक करणार्‍या कष्टकर्‍यांच्या कष्टाचा लेखाजोखा तरी कुणी कधी मांडत होतं?

संघटीत कामगार आणि सरकारी-सार्वजनिक उद्योगांमधल्या कामगार-अधिकार्‍यांना तसं जमत तरी होतं यंत्रणांना वेठीस धरुन स्वत:चे चोचले पुरवायला. आरक्षणामुळे उपेक्षित समुहानांही थोडी थोडी भेटु लागली होती व्यवस्थेमध्ये जागा. पण,शेतकी काळे कायदे आणण्या अगोदरच सुरु झाला होता भांडवलदारांना काळ्या कामगार कायद्यांची कवचकुंडले बहाल करण्याचा आरंभ.

त्याहीपुढे जाऊन सारे सार्वजनिक उद्योग,बँका,वीमा उद्योग,एअर इंडीयाही काढली होती विकायला.

पण,हे श्रमिक-कष्टकरी,संघटीत-असंघटीत कामगार सारे सारेच तर हिटलरचे घेस्टो होण्यातच अभिमान मानत नव्हते काय?त्या धर्मयुद्धात श्रमिक काय अन् शेतकरी काय;कधी नागवले गेले.हे त्यांचं त्यांनाही कळलंच नाही.

आता सारं गमावल्यावर तरी, शेतकर्‍यांचं गार्‍हाणं पार इग्लंडच्या राजपूत्राला घालण्यासाठी हाती काठी न् खांद्यावर घोंगडं घेऊन सामोरं गेलेल्या तुझ्या क्रांतिचा आठव प्रत्येक शेतकर्‍याच्या-कष्टकर्‍याच्या-कामगाराच्या भेजात जागला अन् त्यानं राजानचं देशाविरुद्ध पुकारलेल्या धर्मयुद्धाचे नाझी सैनिक व्हायचं नाकारलं तर......!

मानवतेचं भल्लरी गाणं गाणारा अन् देव-धर्माची,पुरोहित-मध्यस्थांची कर्मकांडे-थोतांडे नाकारुन,लींगभेद-जातपातींचे विषमतेचे,शोषण-पीळवणुकीचे गड असलेल्या देव-धर्म-धर्मग्रंथांचा विध्वंस करुन सत्याला मानवतेच्या चौकटीत चौकसपणे तपासुन स्वीकारणार्‍या नव्या समताधिष्ठित समाजाच्या उभारणीकडे भारतीयांच्या वाटचालीस आरंभ झाला; तर याहुन योग्य तुला कोणते बरं अभिवादन असु शकेल?असो!

तू राजपुत्राच्या कानावर घातलेली भारतीय शेतकर्‍यांची सुखदु:खे अवघ्या जगावर राज्य करणार्‍या पार सातासमुद्रापल्याडच्या इंग्लंडच्या राणीच्या कानापर्यंत पोहचली होती ना!

मग, लाॅकडावूनच्या तुरुंगात गेल्या वर्षभरात अन्नपाण्याविना रस्त्यात जीव सोडलेल्या,नोकर्‍या गमावलेल्या,उद्योग-व्यवसाय-रोजगार गमावणार्‍या छोट्या-छोट्या व्यवसायिकांचा अन् औषधोपचाराविना तडफडत मरणार्‍यांच्या,काळ्या कायद्याविरोधात झगडता झगडता मरणार्‍या शेतकर्‍यांच्या कच्च्याबच्च्यांचा आक्रोश इथचं धर्मराज्याचा डोलारा उभारणार्‍या त्या डोलार्‍याखाली मानवतेचा "बळीराजा" करणार्‍या इथल्या सर्वसत्ताधीशाच्या बंद करुन घेतलेल्या कानांपर्यंत का बरं नसावा पोहचत?

हा आक्रोश कान असलेल्या बहिर्‍या सत्तेपर्यंत पोहचो!अन्.....

भारत धर्मराज्य होण्यापरिस माणसांचं-माणूसकीचं राज्य होवो!

माणूसकीचं गाणं गाणार राज्य होवो!!!

क्रांतिबा;हेच तर तुला आमचं क्रांतिकारी अभिवादन.....!!!!

-जयवंत हिरे

Updated : 11 April 2021 2:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top