Home > मॅक्स ब्लॉग्ज > "शिवसेना संपली नाही, नव्याने जन्म घेत आहे"

"शिवसेना संपली नाही, नव्याने जन्म घेत आहे"

राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यापुढे शिवसेनेला पुन्हा उभे करण्याचे आव्हान आहे. ४० आमदारांनी बंड केले असले तरी येत्या काळात शिवसेनेसाठी जमेच्या गोष्टी कोणत्या, याचे विश्लेषण केले डॉ. विनय काटे यांनी...

शिवसेना संपली नाही, नव्याने जन्म घेत आहे
X

राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यापुढे शिवसेनेला पुन्हा उभे करण्याचे आव्हान आहे. ४० आमदारांनी बंड केले असले तरी येत्या काळात शिवसेनेसाठी जमेच्या गोष्टी कोणत्या, याचे विश्लेषण केले डॉ. विनय काटे यांनी...

उद्धव ठाकरे जे बोलले ते जमिनीवरच्या कट्टर शिवसैनिकाच्या काळजाला भिडणारे आहे. त्यांनी दिलेला आमदारकीचा राजीनामा हा उत्तम निर्णय आहे. मध्यावधी होवू की 2024 मध्ये, येत्या विधानसभा निवडणुका भाजपला अजुन अवघड होणार आहेत.

शिवसेना सरंजामांचा पक्ष नाही. आताचे शिवसेनेचे 90% आमदार (बंडखोर धरून) कुठल्याही सहकारी संस्था, शिक्षणसंस्था, कारखाने, बँका वगैरे ताब्यात ठेवून मतदारसंघ बांधून आलेले नाहीत. मातोश्रीच्या आदेशावर आणि पक्षाच्या तिकिटावर शिवसैनिक त्यांना निवडून देतात. भाजपसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार हे asset असतात, तर शिवसेनेचे बंडखोर liability असणार आहेत. पुढच्या निवडणुकीत यातले बहुतांश बंडखोर राजकीय क्षितिजावर दिसणार नाहीत. शिवसेना कुणालाही निवडून आणायची क्षमता आजही ठेवून आहे.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आणि संयमी नेते आहेत आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. हिंदुत्व सोडून मराठी माणूस हा मुद्दा घेवून सेनेने परत स्वतःला बांधायला घ्यावे. शिवसेनेचा घात हिंदुत्वाने केला आहे हे त्यांनी आता तरी समजून घ्यावे. शिवसेना संपली नाही, नव्याने जन्म घेत आहे.

जे घडले ते उत्तम घडले हे सेनेने ध्यानात घ्यावे आणि एकदा प्रबोधनकारांचा वारसा पुढे चालवून पहावा... यश निश्चित आहे!Updated : 30 Jun 2022 3:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top