Home > मॅक्स ब्लॉग्ज > Maharashtra Municipal Elections : उद्धव ठाकरेंची कमिटमेंट आणि पवारांची सेटलमेंट !

Maharashtra Municipal Elections : उद्धव ठाकरेंची कमिटमेंट आणि पवारांची सेटलमेंट !

पवारांच्या हातून पुणे गेलं... ठाकरेंच्या हातून मुंबई गेली... सामान्य माणसाच्या हातून महाराष्ट्र आणि अवघा देश जाण्याच्या मार्गावर आहे. भाजपने सर्व यंत्रणा काबीज केलेल्या असताना पक्षांवर, नेत्यांवर विसंबून न राहता सर्वसामान्य माणसाला लढावं लागेल - श्रीरंजन आवटे

Maharashtra Municipal Elections : उद्धव ठाकरेंची कमिटमेंट आणि पवारांची सेटलमेंट !
X

Maharashtra municipal elections निवडणुका निष्पक्ष होत नाहीत, हे सत्य असल्याने विश्लेषण करण्याला मर्यादा आहेत तरीही शरद पवारांची आणि उद्धव ठाकरेंची तुलना केली तर काय दिसते? Sharad Pawar's NCP, Uddhav Thackeray's Shiv Sena (UBT)

BJP भाजपने दोघांचेही पक्ष फोडले.

अक्षरशः उभी फूट.

दोन्ही पक्षांची चिन्हं गेली.

न्यायालयीन खटल्यांचे निकाल अजूनही प्रलंबित.

दोन्ही पक्षप्रमुखांनी परिस्थिती कशी हाताळली?

लोकसभेत जिद्दीने लढणारी महाविकास आघाडी विधानसभेपर्यंत खचली आणि महापालिका निवडणूक येईपर्यंत तर पूर्ण मोडकळीस आली. उद्धव तरीही लढत राहिले मात्र पवार तह करण्याचे प्रयत्न उघडपणे करू लागले. उद्धव यांची कमिटमेंट दिसली तर पवार सेटलमेंट करत राहिले. स्वाभाविकच त्याचे परिणाम आता दिसताहेत.

लोकसभेला १० जागा लढवून ८ जिंकणाऱ्या पवारांच्या गटाला यंदा ८ नगरसेवक निवडून आणता आले आहेत. पवारांच्या गटाला २२ महापालिकांमध्ये 0 जागा आहेत! ठाकरेंचा मुंबईत पराभव झालेला असला तरी त्यांनी दिलेला लढा कौतुकास्पद होता आणि आहे.

पवारांच्या हातून पुणे गेलं. ठाकरेंच्या हातून मुंबई गेली. सामान्य माणसाच्या हातून महाराष्ट्र आणि अवघा देश जाण्याच्या मार्गावर आहे.

अशा परिस्थितीत मार्ग कमिटमेंट्सह लढण्याचा की सेटलमेंट करण्याचा, याचा निर्णय फक्त पक्षांना घ्यावा लागतो असं नाही तर तो तुम्हाला आणि मलाही घ्यावाच लागेल. भाजपने सर्व यंत्रणा काबीज केलेल्या असताना पक्षांवर, नेत्यांवर विसंबून न राहता सर्वसामान्य माणसाला लढावं लागेल अन्यथा खोल खाईत कोसळण्याची भीती आहे !



Updated : 17 Jan 2026 11:31 AM IST
Next Story
Share it
Top