Mahar Soldiers : इतिहासातील दुहेरी मापदंड आणि भीमा-कोरेगावचा आत्मसन्मानाचा लढा
तुम्हाला आमचं माणूस म्हणून जगणं मान्य नव्हतं तुम्ही आमचा इतिहास कसा मान्य करणार? पराक्रमाची जात पाहणारा इतिहास काय असतो ? वाचा विजय परसराम खिल्लारे यांचा वस्तुस्थिती मांडणारा लेख
X
ज्यावेळी भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळी भारतातील लोक त्यांच्यासाठी काम करायचे त्यामध्येच Battle of Saragarhi सारागढी हे युद्ध इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. इंग्रजांसाठी काम करणाऱ्या 21 Sikh soldiers 21 शीख सैनिकांनी अफगाणिस्तानच्या 10000 सैनिकांना धूळ चारली होती. या 21 सैनिकांनी देशाला स्वातंत्र्य करण्यासाठीही हे युद्ध केलं नव्हत तरीही आपण त्यांच्या पराक्रमाचा अभिमान बाळगतो. यावर चित्रपट सुद्धा निघाले आहेत, 'Battle of Saragarhi' and 'Kesari' बॅटल ऑफ सारागढी, केसरी आणि हे चित्रपट तेवढेच लोकांनी डोक्यावर सुद्धा घेतले. पण भीमा कोरेगावच नाव काढलं की काही लोक काल्पनिक आहे म्हणून बोलतात. 500 सैनिक 28 हजार सैनिकांना कसे मारू शकतात असे तर्क लावतात. परंतु सारागढी मध्ये 21 सैनिक 10000 सैनिकाला मारू शकतात हे ते मान्य करतात. पण Bhima Koregaon भीमा कोरेगाव म्हटलं की त्याला जातीचा लवलेश दिसतो. त्यांचा तर पुरावा सुद्धा आहे. ज्या महार सैनिकांनी पेशव्यांच्या सैनिकांची चिरफाड केली होती. त्यांच्या सन्मानार्थ तो विजय स्तंभ उभा आहे.
पहिल्या महायुद्धात आणि अंगलो अफगाण वार मध्ये इंग्रजांच साम्राज्य वाचवण्यासाठी भारतातील नव्वद हजार भूमिपुत्रांनी इंग्रजांसाठी लढले होते. यामध्ये जे सैनिक मृत्युमुखी पडले होते त्यांचे नाव इंडिया गेट वर लिहिलेले आहेत. आपण त्यांचा सुद्धा सन्मान करतो आणि करायलाच पाहिजे. परंतु भीमा कोरेगाव चे नाव आलं की आपण त्यांना विलन ठरवतो. ते 500 महार स्वतःच्या आत्मसन्मानसाठी लढले होते त्या काळातील परिस्थिती पाहून. ज्या लोकांना माणूस म्हणून नाकारलं होत तर त्यांनी नक्कीच उठाव करायला पाहिजे होता आणि त्यांनी तो केला आणि माजोरडी पेशवाई नष्ट केली.
अजून आपण इतिहासामध्ये गेलो तर Battle of Haifa 1918, मध्ये युद्ध झालं होतं. इजराइल मधील Haifa शहर ऑटोमन तुर्की यांच्या ताब्यात होत. त्याला स्वातंत्र्य करण्यासाठी आणि ते शहर जिंकण्यासाठी ब्रिटिश सैनिकांमध्ये असलेल्या राजपूत सैनिकांना युद्ध करण्यासाठी पाठवलं होतं. या युद्धामध्ये आपले 44 सैनिक मृत्युमुखी पडले. पण युद्ध ब्रिटिशांनी जिंकलं. दिल्लीमध्ये या सैनिकांच्या सन्मानार्थ Haifa चौक निर्माण केला आहे. 2019 मध्ये इस्रायलचे प्रधानमंत्री भारतामध्ये आले होते तेव्हा त्यांच्यासोबत प्रधानमंत्री मोदी सुद्धा त्या चौकामध्ये केले होते आणि त्या सैनिकांना मानवंदना दिली होती. हे सैनिक देश स्वातंत्र्य करण्यासाठी लढले नव्हते ते तर इंग्रजासाठी लढले होते. तरी देशाचे प्रधानमंत्री Prime Minister Modi त्यांना मानवंदना देतात. कारण ते भारतीय होते.
पण पेशवाई मध्ये आमच्या पूर्वजांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली होती. पाठीला झाडू आणि तोंडाला मडकं बांधलं होत. कुत्र्याच्या पलीकड त्यांना वागणूक दिली जात होती. त्याविरुद्ध त्यांनी उठाव केला पेशवाई विषय त्यांच्या मनामध्ये अतिशय चीड होती . ती त्यांनी भीमा कोरेगाव च्या युद्धामध्ये दाखवून दिली. 500 शूर महार सैनिकांनी पेशवाईच्या भल्यामोठ्या सैनिकाची चिरफाड केली. आमचे पूर्वज हे आत्मसन्मानासाठी लढले होते.
पण आमच्या पूर्वजांना खलनायक ठरवण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठी हे वरचे इतिहासाचे उदाहरण मी दिलेले आहे. तुम्हाला आमचं माणूस म्हणून जगणं मान्य नव्हतं तुम्ही आमचा इतिहास कसा मान्य करणार. पण आम्हाला सार्थ अभिमान आहे त्या 500 शूर सैनिकचा ज्यांनी पेशवाई नष्ट केली.
आमच्या पूर्वजांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न करण्याअगोदर इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर बरं होईल. तुमचे पूर्वज निजामशाही आदिलशाही मध्ये त्यांची गुलामी करायचे. इंग्रज आल्यानंतर इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारले. देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा स्वतंत्र भारतामध्ये याला तुम्ही तयार नव्हते. प्रसंगी लष्कराच्या बळावर तुम्हाला देशांमध्ये विलीन करायला भाग पाडलं आहे. तेव्हा सुद्धा तुम्हाला दर महिन्याला भारत सरकार तर्फे पैसे दिले जायचे थोडक्यात मानधन 1972 ला Indira Gandhi इंदिरा गांधीने या राजा महाराजांचे तनखे बंद केले. या गोष्टीवरून खरंच तुम्हाला देश एकसंध हवा होता का हे स्वतःला प्रश्न केला तर बरं होईल.
जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत आमच्या पिढ्यान् पिढ्या त्या विजयस्तंभ येथे शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी जाईल आणि ओरडून सांगेल की आमच्या पूर्वजांनी कसा पराक्रम केला होता. आणि जातीवादी पेशवाई नष्ट केली. त्या 500 शूरवीर महार सैनिकांना विनम्र आदरांजली.
जय भीम

विजय परसराम खिल्लारे
विजय परसराम खिल्लारे सध्या मिलिंद कॉलेज आर्ट छत्रपती संभाजीनगर येथे M.A सायकॉलॉजी हे शिक्षण घेत आहे.





