Home > मॅक्स ब्लॉग्ज > महापरिनिर्वाण दिन : आंबेडकरवादी राजकीय विचारच देशाला तारू शकतात !

महापरिनिर्वाण दिन : आंबेडकरवादी राजकीय विचारच देशाला तारू शकतात !

उद्योगाकडे समाजातील तरुणांनी आपला मोर्चा वळवला पाहिजे. समाजातून दोन कवी, दोन भाषणकर्ते, दोन गट, दोन नेते कमी झाले तरी चालतील पण एलॉन मस्क, बिल गेट सारखे दोन उद्योजक निर्माण होणे काळाची गरज आहे.

महापरिनिर्वाण दिन : आंबेडकरवादी राजकीय विचारच देशाला तारू शकतात !
X

डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन... ६ डिसेंबर सिंहावलोकनाचा दिन, वज्र संकल्पाचा दिन, अधिठ्ठाणचा दिन कारण आंबेडकरवादी समाज म्हणून आपण काय वाटचाल केली त्याचे सिंहावलोकन करून कृतिशील अभिवादनाचा हा दिन.

डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण नंतर सात दशके समाज त्यांच्या विचारावर मार्गक्रमण करतोय. देश राजकीय दृष्टीनं स्वातंत्र्यांच्या पहिले पाच दशके एक पक्षीय होता, पुढे तो दोन पक्षीय, नंतर दोन गटीय व आता वन नेशन वन पार्टी दिशेने वाचाल करीत आहे. अशा परिस्थितीत आंबेडकरवादी राजकीय विचारच देशाला तारू शकतात. पण राजकीय दृष्ट्या आम्ही महाराष्ट्रात साधी मान्यताप्राप्त राज्य पक्ष म्हणून सुद्धा मान्यता मिळवू शकलो नाही. शासन कर्ते होणे, देशपातळीवर परिवर्तनाच्या राजकीय लढ्या नेतृत्व करणे हे तर खूप लांब चा पल्ला गाठावयाचा आहे हे वास्तव चित्र आहे.

ऐक्य एक जातीय नव्हे तर बहुजनांचे सर्वांचे, राष्ट्र म्हणून सर्वांचे कारण आंबेडकरवाद हा राष्ट्रवाद आहे तो प्रत्येक भारतीयांचा आहे ह्या विचारास केंद्र मानून राष्ट्र एकतेचा नारा देण्याची वेळ आहे. शिक्षित बना ची स्थिती सोचनीय आहे. ग्रामीण भागत केवळ ५ टक्के लोकसंख्या पदवीधर आहे. साक्षरतेच्या जुन्या संकल्पना सोडून पदवी साक्षरता शत प्रतिशत करावी लागणार आहे. केवळ पदवीधर नव्हे तर शिक्षण क्रांती देशात झाली पाहिजे तेव्हां च बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

सरकारी नोकरी आरक्षण संपुष्टात आणल्या जात आहे, त्याचे परिणाम शिक्षण वर होत आहे. शिक्षण आणि नोकरी यांचा चुकीचा संबंध आपण निर्माण केला आहे. नोकरी नाही तर शिकून काय लाभ असा चुकीचा समज तरुणांनी करून घेतला आहे. बुद्धी च्या विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे त्याचा नोकरीशी संबंध नाही. तेव्हा तरुणांनी जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी आता पुढे आले पाहिजे आंतरराष्ट्रीय दर्जेदार विद्यापीठातून शिक्षण घेणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य बनले पाहिजे. देशात मोक्याच्या जागा कमी होत असल्या तरी जागतिक संस्था UN WTO world bank ADB सारख्या ४० पेक्षा अधिक जागतिक संस्थेत स्पर्धा परीक्षा तयारी करून जागतिक स्तरावर स्पर्धा करून जागतिक अधिकारी पदे पटकाविण्यासाठी तरुण पुढे यावे यासाठी आज महापरिनिर्वाण दिनी संकल्प केला पाहिजे.

नोकरी कमी होत आहेत. तर उद्योगाकडे समाजातील तरुणांनी आपला मोर्चा वळवला पाहिजे. समाजातून दोन कवी, दोन भाषणकर्ते, दोन गट, दोन नेते कमी झाले तरी चालतील पण एलॉन मस्क, बिल गेट सारखे दोन उद्योजक निर्माण होणे काळाची गरज आहे.

आंबेडकरवादी समाजात एकदम निराशाजनक चित्र आहे असे नाही जगाच्या पाठीवर सर्वात वेगवान प्रगती करणारा विज्ञान निष्ठ समाज म्हणून आंबेडकरवादी समाज पुढे येत आहे. पण बोटावर मोजण्या येवढ्या संख्येने प्रगती होत आहे. प्रगती व्यक्ती केंद्रित आहे, मागे राहिलेला समाज मागे राहतो की काय याची भीती वाटत आहे. आज समाजातून आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण घेतलेली लाखो तरुणांची बेस्ट ब्रेन फळी तयार होणे आवश्यक आहे जी बुद्धीजीवी पाढी पूर्ण समाज व देशाला नेतृत्व प्रदान करेल.

आज त्याग समर्पण करण्यात तरुणांची आवश्यकता आहे. जे डॉ. बाबासाहेबांचे विचार पूर्ण देशात पेरण्यासाठी पुढे येतील आंबेडकरवाद हा एक जिल्ह्याचा पॅटर्न नाही तर राष्ट्रीय विचार आहे याची पेरणी करतील, नेतृत्व करतील. समाजात नकारात्मकता पसरविणाऱ्या बाबी प्राधान्य न देता शिक्षण, आर्थिक, उद्योगीक राजकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी समाज शक्ती वापर होणे आवश्यक आहे. संविधान अंमलात आणणारी व्यवस्था आपल्या ताब्यात घेणे आवश्यक आहे.

संविधान सभेत शेवटच्या संबोधण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशवासियांना दिलेल्या संदेशात लोकशाही व स्वातंत्र्य रक्षणाची जबाबदारी आंबेडकरवादी पडली आहे. सामाजिक लोकशाही, आर्थिक लोकशाही प्राप्त करून स्वतंत्र, समता, बंधुत्व आणि न्याय यावर आधारित समाजव्यवस्था उभारण्यासाठी आंबेडकरवादी लोकांना पुढे यावे लागेल.

महापरिनिर्वाण दिनी केवळ एक मेणबत्ती पेटून अभिवादन न करत कृतिशील अभिवादन, वज्र संकल्प, अधिष्ठान दिवस करून उच्यशिक्षित त्यागी तरुणाची नव्या पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे यावे समजात व देशात महासत्ता बनवावी हेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कृतीशील अभिवादन होय.


दीपक कदम प्रमुख

आंबेडकरवादी मिशन

9270765551

9270865551

Updated : 6 Dec 2025 12:45 AM IST
Next Story
Share it
Top