Home > मॅक्स ब्लॉग्ज > त्सुनामी भाग २ – राजकारण की रिअँलिटी टीव्ही ?

त्सुनामी भाग २ – राजकारण की रिअँलिटी टीव्ही ?

त्सुनामी भाग २ – राजकारण की रिअँलिटी टीव्ही ?
X

महिनोनमहिने वातानुकूलित स्टुडिओमध्ये बसून बातम्या देणा-या टीव्ही चॅनेल्सच्या वृत्तनिवेदकांना निवडणूकीच्या काळात बाहेर पडावंच लागतं. देशातल्या विविध भागात गेल्यानंतर आम्हाला केवळ तिथली परिस्थीती सांगायची नसते तर मतदारांचा कौलही जाणून घ्यायचा असतो. “हवा” काय चालली आहे? हा प्रश्न असतोच त्यातच राजकीय “हवा” ही दोन प्रकारची असते. एक म्हणजे एखाद्या पक्षाच्या बाजूने उघडपणे मतदारांमध्ये पोषक वातावरण असते आणि दुसरी हवा म्हणजे अंडर करंट. यामध्ये मतदार शांतपणे एखाद्या पक्षाच्या बाजूने अंतस्थ कौल देत असतात.

२०१४च्या निवडणूकीत आपल्याला एक निश्चित निर्णय दिसला होता. या निवडणूकीत विजयी झालेल्या भाजपाला एकूण मतदानापैकी ३१ टक्के मतं मिळूनही ज्याचं वर्णन लाट असं कऱण्यात आलं होतं. एखाद्या सत्ताधारी पक्षाने मिळवलेली ही निचांकी मते होती. पण तरीही आकड्यांच्या बाबतीत हा मोठा विजय होता म्हणून आपण त्याला राष्ट्रीय लाट असे म्हणतो. पण

खरे तर ही उत्तर पश्चिम भागातील लाट म्हणायला हवे होते. कारण ही अरबी समुद्रापासून ते गंगटोक आणि हिमालयापर्यंत होती. या भौगोलिक पट्ट्यातील १३ राज्यांत ( पंजाब आणि जम्मु काश्मिर वगळून) भाजपा आणि मित्रपक्षांनी २९८ पैकी २७१ जागा जिंकल्या होत्या. या राज्यांत भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी ही ४० टक्क्यांची होती. गुजरातमध्ये सर्वाधिक ५९ टक्के मते मिळाली होती. त्या तुलनेत देशातील उर्वरित राज्यांमध्ये ज्यात दक्षिण आणि पूर्वी राज्यांचा समावेश आहे. भाजप आणि मित्रपक्षांना २४५ पैकी केवळ ६५ जागा जिंकता आल्यानं मर्यादित प्रतिनिधीत्वावर समाधान मानावं लागलं होतं.

निवडणूक विश्लेषणाबाबतचे असे अपघात फाऱ क्वचित घडतात. कॉंग्रेसच्या डेटा टीमचे प्रमुख प्रविण चक्रवर्ती यांच्या मते २०१४च्या निवडणूकीचे वर्णन ब्लॅक स्वान असे करावे लागेल. हा निकाल अनेक पातळ्यांवर धक्कादायक होता. पण आता नरेंद्र मोदी यांच्या टीमला एका विशिष्ट प्रभावित अशा भौगोलिक प्रदेशात पुन्हा एकदा (त्सुनामी) सुनामो आणणं शक्य़ आहे का. 2019 ची निवडणूक ही 2014 चा आरसा सिद्ध होऊन काही नाट्यमय निकाल पहायला मिळणार का हा प्रश्न आहे.

पण सध्याच्या परिस्थीतीत हे शक्य होईल असे वाटत नाही. कारण 2019 ची निवडणूक ही 2014 च्या निवडणूकीपेक्षा वेगळी आहे. तेव्हा भाजपा ही आव्हानात्मक भूमिकेत होती आणि मनमोहन सिंह यांच्या सरकारविरोधातील वाढत्या नाराजीचा त्यांना लाभ घेता आला. आता सत्ताधारी असलेल्या मोदींना 2014 पूर्वीचा कॉंग्रेसविरोधी राग आळवता येणार नाही. त्यातच उत्तर आणि पश्चिम भारतात होत असलेलं परिवर्तन आणि एका एका जागेनं कमी होणारं बहुमत ही बाब आहे. तर विरोधी पक्षांनी यावेळी एकत्र येवून दिलेला शह महत्त्वाचा आहे. उत्तर प्रदेशसारख्या अति लोकसंख्येच्या राज्यात अखिलेश यादव आणि मायावती यांनी एकत्र येवून केलेली आघाडी याचे मोठे द्योतक आहे.

निव़डणूकीच्या गणितांमध्ये एकत्र आघाड्यांचे महत्त्व तुम्ही टाळू शकत नाही हा गेल्या आणि आत्ताच्या निवडणूकीतला मुख्य फरक आहे. तेव्हा भाजपाला कदाचित सत्ता स्थापन करता आली नसती जर नरेंद्र मोदी हा त्यांचा पंतप्रधानपदाचा चेहरा समोर ठेवला गेला नसता. युपीए २ वरील जनतेच्या रागाला गुजरातच्या मोदींनी आपल्य़ा आक्रमक प्रचाराने दिशा दिली.

मात्र २०१९ मध्ये ही बाब त्यांच्या पथ्यावर पडणार नाहीय. कारण अख्खी निवडणूक केवळ एकाच माणसाच्या भोवती केंद्रीत झालीय. मोदींची अतिभव्य करण्यात आलेली प्रतिमा आणि प्रसारमाध्यमांवर चोवीस तास केवळ मोदीच चालत असल्याने देशात दुसरा कोणताही उमेदवार अथवा प्रचाराचा मुद्दाच नसल्याचे चित्र लोकांना दिसते आहे. अध्यक्षीय निवडणूकीची पद्धत ही देशातल्या ५४३ मतदारसंघांवर पद्धतशीरपणे लादली गेलीय.

या निवडणूकीत लोकसभा सदस्य हा मुद्दा गौण ठऱत जातीची अथवा अन्य गणितं बाजूला सारून केवळ राष्ट्रवाद, मजबुत नेता, कणखर नेतृत्व हे सांगितंल जातंय. देशातल्या सर्व प्रसारमाध्यमांतून ३६० अंशात केवळ मोदींनाच सर्वोच्च नेता म्हणून दाखवलं जातंय मग ते टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मिडिया असो किंवा व्हॉटसअप वरील मेसेजेस असू देत.

उदाहरण द्यायचे तर मी उत्तर प्रदेशातील फुलपूरमधील एका चहाच्या टपरीवर बसलो होतो. तिथे अजय यादव नावाचा २२ वर्षीय तरूण भेटला. तो वाणिज्य शाखेचा पदवीधर होता आणि गेल्या वर्षभरापासून तो नोकरीच्या शोधात होता.

“मोदी सरकार रोजगार निर्मीतीच्या आश्वासनामंध्ये फोल ठरल्याचे त्यांने सांगितले”. मग मी त्याला विचारले की कोणाला मत देणार? तर तो म्हणाला, “काही पर्याय आहे का मोदी शिवाय”. मग मी त्याला विचारले की, मोदींना का मत देणार? तर तो म्हणाला की, “सर त्यांनी तर पाकिस्तानला धडा शिकवलाय”. पण पाकिस्तानला धडा शिकवून तुला नोकरी मिळाली का? असे विचारता तो म्हणाला, “ते सर्व ठिक आहे सर, आधी देशाचा विचार केला पाहिजे”. अजयने सांगितले की, हम देशभक्त नावाच्या एका व्हॉटसअप ग्रुपवरून त्याला ही सर्व माहिती मिळते. पाकिस्तानच्या बालकोटमध्ये पाचशे दहशतवादी मारल्याचेही त्याला तिथेच समजले. मुस्लिमविरोधी पुर्वग्रहदुषित संदेश असेच परसरवले जातात.

त्यानंतर मी वळलो दिल्लीच्या गीता कॉलनी या झोपडपट्टीत राहणा-या रिक्षा ड्रायव्हर विनोद मंडल याच्याकडे. त्याने २०१५ मध्ये विधानसभेच्या निवडणूकीत आपलं मतदान केले होत.

“स्वच्छ पाण्याच्या पुरवठ्याबाबत त्याची तक्रार असली तरी विजेचं बिल कमी झाल्याचं तो सांगतो”. मग आता तू कोणाला मत देणार ? असे मी त्याला विचारले. तर तो म्हणाला, “मोदी, सर त्यांच्यात खूप शक्ती आहे.” मग त्याने मला मोबाईलमधला एक व्हिडीओ दाखवला त्यात मोदींचा बाहुबलीच्या वेशातला फोटो होता आणि लिहिले होते “मोदी है तो मुमकिन है”. मग मी त्याला राहूल गांधी, कॉंग्रेस आणि न्याय योजनेबाबत विचारले. तर तो माझ्याकडे स्तब्धपणे पाहत रहिला. मग म्हणाला, “कॉंग्रेसला सत्तर वर्षे संधी दिलीय सर मोदींना आणखी पाच वर्षे द्यायला काय हरकत”.

नव्वद कोटी मतदारांपेक्षा अधिक मतदार असलेल्या देशातील अजय आणि विनोद हे दोन केवळ प्रातिनिधिक आहेत. खरं तेर दोघांच्या मतावर कोणत्याही निष्कर्षाप्रत जाणे योग्य नाही. कारण भारत हा खूप विशाल आणि विविधता असलेला देश आहे. पण गेल्या आठ आठवड्यात भारताच्या विविध भागांत फिरताना लक्षात आले की, आता एक देश एक नेता अशी मानसिकता नागरिकांची होते आहे. सत्य आणि आभास यातला फरक ओळखायच्या भानगडीत फारसे कुणी पडत नाहीय. देशातील लोकांना आयुष्मान भारत. उज्वला या योजनांचं काय झालं याचा विचार करायला वेळ नाही? कारण त्यांच्या डोळ्यात स्वप्न आहे नव्या भारताचं आणि कणखर नेतृत्वाचं.

पण २०१९ च्या अनिश्चिततेच्या निवडणूकीत स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजपाला हे पुरेसे आहे का ? कर्नाटक वगळता दक्षिणेत पक्ष अजूनही कमकुवत आहे. उत्तर प्रदेशातील सपा बसपा आघाडी अजूनही मजबूत आहे. पश्चिम बंगाल आणि ओरिसामध्ये विद्यमान खासदारांना स्थानिक प्रश्नांना आणि ममता बॅनर्जी आणि नवीन पटनायक सारख्या राजकीय धुरंधरांना सामोरे जावे लागतंय. पण मोदींनी प्रचाराचा लावलेला धडाका आणि भाजपाने देशात सगळीकडे येणार तर मोदीच हा चालवलेला प्रपोगंडा गाजतोय. कित्येकदा अजिंक्य असल्याचा समज हा अंतिम निकालावर परिणाम करणारा दिसतो.

देशातील डझनापेक्षा जास्त राज्यामध्ये फिरल्यानंतर एका राज्यात मात्र मोदी मोदी चा नारा कमी प्रमाणात ऐकु आला तो म्हणजे पंजाबमध्ये. हे सीमेवरील राज्य देशातल्या अन्य राज्य़ांच्या तुलनेत राष्ट्रीय सुरक्षा आणि पाकिस्तान यांच्याबाबतीत फार सजग नाही की काय असा प्रश्न पडला. मात्र अमृतसर मधील प्रसिद्ध गियानी चहावाल्याला भेटताच तो म्हणाला गोळीच्या निशाण्यावर आम्हाला जगावे लागते. त्यामुळे आम्हाला सीमेवर शांतता हवी आहे. युद्ध आणि बॉम्ब नकोत.

Updated : 11 May 2019 12:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top