Home > News Update > लॉकडाऊन आणि मनोरंजन

लॉकडाऊन आणि मनोरंजन

लॉकडाऊन आणि मनोरंजन
X

लॉकडाऊन होऊन एक महिना अधिक उलटला आहे. आणि अजूनही ते संपण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. या लॉकडाऊन मध्ये सगळ्यात जास्त साथ कुणी दिली असेल तर ती "इंटरनेट सेवा". कारण आपल्या सगळ्यांचं काम किंवा मनोरंजन करणारे हे एकमेव माध्यम सध्या आपल्यापुढे आहे . ज्यांना वर्क फ्रॉम होम आहे त्यांना तर इंटरनेट ची गरज लागणारच. पण या व्यतिरिक्त पुढे काय?

आपल्या दैनंदिन जीवनात एक अतिशय महत्वाचा घटक आहे ,त्याच्याशिवाय आपलं आयुष्य हे अगदी व्यर्थ आहे . ते म्हणजे "मनोरंजन". आपल्या रोजच्या दगदगीच्या आयुष्यात मनोरंजन हा आपला आपला ताण घालवणारा असतो . आपण आठवड्याला सिनेमाला जातो, नाटकाला जातो, सांगीतिक, नृत्य अश्या कार्यक्रमाला जातो. कारण मनोरंजन हा आपला अभिवाज्य घटक आहे आणि तो असलाच पाहिजे . कारण त्याने कसं आणि का जगायचे हे अधिक सोप्या भाषेत समजते. पण या लॉकडाऊन च्या काळात साधं मॉर्निंग वॉक बंद झालंय तर मग सिनेमा, नाटक हे तर दूरची गोष्ट.

याचसाठी दूरदर्शन ने हि रामायण आणि महाभारत ह्या गाजलेल्या मालिका परत सुरु केल्या आहेत आणि त्याला प्रतिसाद हि उत्तम आहे. पण जेंव्हा पासून डिजिटल प्लॅटफॉर्म (OTT- over the top) ची निर्मिती झाली तेंव्हा पासून घरबसल्या तुमच्या हातात जगभरातलं मनोरंजन सामावलं. नेटफ्लिक्स , ऍमेझॉन प्राईम, हॉटस्टार असे अनेक. या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म ने ज्या पद्धतीने पारंपरिक "TV संस्कृती" ला फाटा देत एक तगडा पर्याय निर्माण केला आणि तो नक्कीच मनोरंजन विश्व बदलणारा आहे. नेटफ्लिक्स ने तर यात फार अग्रेसर पद्धतीने काम केलंय. त्याचमुळे नेटफ्लिक्स चा चाहता वर्ग हा वाढत चाललाय. जगभरातले सिनेमे, माहितीपट, ओरिजिनल सिरिज ज्या आपण फेस्टिवल किंवा इंटरनेट वर तासंतास शोधून बघायचो ते नेटफ्लिक्स ने अश्या उत्कृष्ट दर्जाचे डिजिटल साहित्य थेट आपल्या हातात दिलं. कमी वेळात OTT चे महत्व वाढवण्यासाठी काही कारणं जबाबदार आहे ती म्हणजे.

1. जागतिक दर्जाचे साहित्य (कन्टेन्ट) अगदी मुबलक किंमतीमध्ये.

2. जगभरातल्या प्रादेशिक भाषांतील अभिनव आणि कल्पक कथा आणि त्याची वास्तववादी मांडणी

3. प्रक्षेपणाची सोयीस्कर साधनं म्हणजे फोन, स्मार्ट TV,लॅपटॉप इ.

लॉकडाऊन च्या काळात OTT हा लोकप्रिय मनोरंजनाचा मार्ग ठरत आहे. भारतामध्ये इंटरनेटचा वापर जनता कर्फु च्या आधी सरासरीच्या 9% होता तो लॉकडाऊन च्या काळात सरासरीपेक्षा 13 % ने वाढला. हेच चित्र संपूर्ण जगभरात आहे. युरोप मध्ये याची इतकी मागणी वाढली की डेटा ट्रॅफिक न होण्यासाठी युरोप कमिशनने नेटफ्लिक्स ला आपली व्हिडिओ streaming Quality हि कमी करायला सांगितली, नेटफ्लिक्सनेही लगेचच 25% ने ती कमी केली. (High defination to standard quality ).

मागच्या 3 महिन्यात नेटफ्लिक्स ला तबल 1 करोड 60 लाख नवीन Subscriber मिळाले. हि आकडेवारी मागच्या संपूर्ण वर्षापेक्षा दुप्पट आहे. जगाची आकडेवारी बघता हा आकडा सगळ्यात जास्त आहे आफ्रिका, मिडल ईस्ट आणि युरोप यामध्ये जवळ जवळ 70 लाख, त्याचबरोबर कॅनडा - अमेरिका मध्ये 23 लाख, लॅटिन अमेरिका मध्ये 29 लाख आणि आशिया - पॅसिसिक मध्ये 36 लाख अश्या नवीन Subscriber ची नोंद झाली. 2019 पेक्षा 27% जास्त आर्थिक फायदा नेटफ्लिक्स ला फक्त या 3 महिन्यात झाला आहे. ( $344 मिलियन). या अश्या वाढत्या मागणीत कुठलीही तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून नेटफ्लिक्स ने 2000 लोकांचा अतिरिक्त सपोर्ट स्टाफ घेतला आहे . एका निरीक्षणानुसार सकाळी 10 पासून ते संध्याकाळी 4 पर्यन्त चा काळामध्ये जास्तीत जास्त लोक डिजिटल प्लॅटफॉर्म चा वापर करत आहेत. यामध्ये वयोगट पहिला तर 34 वर्षाच्या पुढचे यांची 11% ने आणि 25 ते 34 यात 2% ने वाढ झाली आहे. लॉकडाऊन च्या आधी भारतामध्ये सरासरी 46 मिनिटे दरदिवशी नेटफ्लिक्स चा वापर व्हायचा आता तो 86 मिनिटं दरदिवशी इतका होत आहे.

पण हा वाढता लॉकडाऊन लक्षात घेता OTT वर स्पर्धा दिसत आहे .जास्त Subscriber ची वाढ झाली पण त्यांच्याकडे असलेले अतिरिक्त कन्टेन्ट संपत आहे. नवीन कन्टेन्ट साठी त्यांची धडपड सुरू आहे .यासाठी योग्य ती खरेदीहि सुरु आहे, यामध्ये सर्वात लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे नेटफ्लिक्स ने सामाजिक बांधीलकी दाखवत बिनरोजगाराची परिस्थती बघता जगभरातल्या फिल्म वर्कर आणि तंत्रज्ञानाना तबल $145 मिलियन ची मदत देऊ केली आहे .

या नकारात्मक काळात आपलं मन गुंतवून ठेवण्यासाठी घरी बसल्या बसल्या आपण जगभरातील मनोरंजन बघत आहोत आणि त्यातून काही शिकन्याचाही प्रयत्न करत आहोत. येणार काळातहि याची गरज लागणार आहे हे समजून आपलं मनोरंजन करण्यासाठी सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म हे सेवाबद्ध आणि सज्ज राहतील यात शंका नाही.

-प्रशांत वि कांबळे

Updated : 3 May 2020 10:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top