Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोना काय सांगतोय ऐका?: संजीव चांदोरकर

कोरोना काय सांगतोय ऐका?: संजीव चांदोरकर

कोरोना काय सांगतोय ऐका?: संजीव चांदोरकर
X

कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट लवकरात लवकर सरावी हीच सदिच्छा. पण करोना आपल्या सर्वाना जे काही सांगून जाणार आहे. ते शहाणपण मात्र, आपल्यापुरतेच नाही तर पुढच्या पिढयांच्या मनावर सतत कोरले गेले पाहिजे.

सूक्ष्मदर्शकाला देखील न दिसणारा "कोरोना"चा विषाणू पृथ्वीवरच्या एकूण एक प्रौढ माणसांना सांगतोय. मी स्त्री-पुरुष लिंगभेद जाणत नाही. मी माणसांचे वय, वर्ण, भाषा जाणत नाही. मी धर्म, जात, पंथ जाणत नाही. मी तुमच्यातील गरीब, श्रीमंत जंत नाही. मी राष्ट्र, आणि माणसांनी आखलेल्या राष्ट्रांच्या सीमा जाणत नाही. खरेतर मी तुम्ही कृत्रिमपणे तयार केलेल्या मानवनिर्मित कोणत्याच आयडेंटिटिज जाणत नाही.

आम्ही क्षुद्र विषाणू एका बाजूला आणि तुम्ही पृथीतलावरची सर्वात प्रगत / उत्क्रांत प्राणी ७०० कोटी माणसे एका बाजूला आहे. हिम्मत डाव लावण्याची? तुमच्याकडे ट्रिलीयन्स ऑफ डॉलर्स आहेत. म्हणून तुम्ही सुरक्षित नाहीत.

तुमच्याकडे संहारक शस्त्रे, क्षेपणास्त्रे आहेत. म्हणून तुम्ही सुरक्षित नाही. तुमच्याकडे कमांडोंचे सैन्य, प्रवेशदारांवर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा कडेकोट बंदोबस्त असून देखील तुम्ही सुरक्षित नाही.

तुम्ही फक्त आपल्या कुटुंबापुरती स्वच्छता सुनिश्चित करून पुरेशी नाही.

सर्वानाच स्वच्छ आणि आरोग्यदायी जगण्यासाठी पाण्यासकट सर्व पायाभूत सुविधा पुरवणे हे मानवतावादी नाहीये; तर तो तुमच्या (त्यांच्या नव्हे) जीवन मरणाचा प्रश्न आहे. ७०० कोटी माणसांनो सुटे सुटे नाही. सामुदायिकपणे धडे गिरवा. नाहीतर मी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या नावाने येईन !

Updated : 15 March 2021 5:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top