Home > Entertainment > लक्ष्या आहे आजही प्रेक्षकांचा हास्य सम्राट

लक्ष्या आहे आजही प्रेक्षकांचा हास्य सम्राट

लक्ष्या आहे आजही प्रेक्षकांचा हास्य सम्राट
X

महाराष्ट्राचा लाडका अभिनेता लक्ष्या अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यांची आज जयंती आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता म्हणून आजही प्रेक्षकांच्या मनामनात त्याचे स्थान आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ रोजी मुंबई येथे झाला. कौंटुबिक जवाबदारी असल्याने त्यांनी सुरवातीला लॉटरीची तिकिटे विकण्यास सुरुवात केली. गिरगावात गणेशउत्सवात सांस्कृतिक उपक्रमात, नाटकांत ते उत्साहाने स्गभाग घेत. रंगमंचावर त्यांचा वावर त्याचा अगदी सहज होता. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना स्पर्धेत सहभाग घेत अनेक पुरस्कार जिंकले. काहीकाळ मराठी साहित्य संघ येथे त्यांनी प्रॉडक्शन कंपनीत कर्मचारी म्हणून काम केले. त्यानंतर रंगमंचावर नाटकात त्यांनी काम केली.

लक्ष्मीकांत यांनी १९८४ मध्ये "लेक चालली सासरला" या चित्रपटाततुन मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर धुमधडाका आणि दे दणादण या चित्रपटातून आपल्या विनोदी अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले. अशोक सराफ, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे त्रिकुट जमले. मराठीसृष्टीत ९० च्या दशकांत लक्ष्मीकांत बर्डे आणि अशोक सराफ यांनी मराठी चित्रपट सृष्टीला वेगळ्याच उंचीवर नेले. धुमधडाका, थरथराट, दे दणादण, अशी हि बनवाबनवी, हमाल दे धमाल, गोडी गुलाबी, जनता जनादरन, आपला लक्षा, खतरनाक, देखणी बायको, गंमत जमत, शेम टू शेम, झपाटलेला, पछाडलेला अशा शंभरहून अधिक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. तर गीत, गुमराह, हम आपके है कौन, क्रिमिनल, हमेशा, हम तुम्हारे है सनम, साजन, बेटा, आरजू, अनाडी, हंड्रेड डेज यांसह अनेक हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडली.

लक्ष्मीकांत बर्डे, अशोक सराफ आणि सचिन पिळगांवर यांचा 'अशी हि बनवाबनवी' हा चित्रपट सर्वात लोकप्रिय मराठी चित्रपट ठरला. त्यांनी अनेक अभिनेत्री सोबत काम केले, मात्र त्यांची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या सोबत अनेक चित्रपटात सोबत काम केले.

लक्ष्मीकांत बेर्डे विनोदी अभिनेता म्हणून सर्वाना आवडत होते, परंतु त्यांनी हा विनोदी साचातुन बाहेर येण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 'एक होता विदूषक ' या गंभीर विषयीवर चित्रपटातही आपल्या अभिनयाची झलक दाखवली. मात्र ती प्रेक्षकांना भावली नाही, आपला लक्ष्या हा आपल्यासाठी हास्य अभिनेताच आहे.त्याच्या अभिनयाची शैली, सवांद, त्याचे हसणे, त्याचे गोधळलेल्या भावातून निर्माण होणारे विनोद अक्षरशः प्रेक्षकांना खिळवून ठेवत असे. आजही लक्ष्मीकांत यांना मराठी चित्रपट सृष्टीचा बादशहा म्हंटले जाते. दुर्देवाने लक्ष्मीकांत याचं १६ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले. मराठी चित्रपटांना वेगळा जॉनर त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दिले.

Updated : 26 Oct 2023 9:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top